Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेसंत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजनमहानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन

पिंपरी चिंचवड

खासदारकीसाठी श्रीरंग बारणे व आढळरावांना ‘हिरवा कंदील’– अनंत गीते

· 62 reads

खासदारकीसाठी श्रीरंग बारणे व आढळरावांना ‘हिरवा कंदील’– अनंत गीते

व्हीएस न्यूज - राज्यातील निवडणूका कधी होतील हे सांगता येणार नाही. मात्र खासदरकीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी खासदार श्रीरंग बारणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हिरवा कंदील दिला आहे, असे शिवसेना नेते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. तसेच त्यांनी खासदार बारणे यांना देशातील कोट्यवधी शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढदिवसाच्या व पुढील खासदरकीसाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले माजी महापौर हनुमंत भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार, मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्कार, शकुंतला माटे – जीवनगौरव पुरस्कार, डॉ. दिलीप कामत – वैद्यकीय भूषण, इकबाल खान – शिक्षण गौरव, अमित भिंगुर्डे – उद्योग रत्न, लक्ष्मण म्हेत्रे – उद्योग रत्न, एस. आर. शिंदे – मैत्री भूषण, सुरेंद्र शेळके – गिर्यारोहण गौरव, तेजश्री अडिंगे – कला भूषण, श्रीचंद्र आसवाणी – उद्योग भूषण, बब्रुवान नथुजी वाघ महाराज – अध्यात्मिक गौरव, बाळासाहेब मरळ – अध्यात्मिक गौरव, प्रदीप वाल्हेकर – स्वच्छता दूत हनुमंत माळी – गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गोखले वृंदावन सोसायटी चिंचवड या सोसायटीला आदर्श सोसायटी पुरस्कार देण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांना संसदेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल बारणे यांचा विशेष सत्कार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गीते बोलत होते.

Your ad here

यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरसंघटिका सुलभा उबाळे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, भगवान वाल्हेकर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे, नारायण बहिरवडे, नगरेसवक राहुल भोसले, शशिकीरण गवळी, मधुकर बाबर, भगवान वाल्हेकर, सचिन चिखले, सचिन भोसले, मारुती भापकर, शिवसेना पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुशीला पवार, रवी नामदे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राम गावडे, उमेश गोलांडे, धनाजी बारणे, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर आदी उपस्थित होते.

अनंत गीते म्हणाले, मी ६ वेळा संसदेत गेलो. सध्या शिवसेनेचे १८ खासदार संसदेत आहेत. त्यातील मंत्रिपद मिळालेला मी एक भाग्यवान आहे. पुढच्यावेळी हे भाग्य कुणाला लाभणार हे सांगता येणार नाही. पण बारणे आणि आढळराव पाटील एकमेकांना समजून घेतील असा विश्वास आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वर्षाच्या शेवटी आपण वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचा दंडक शिवसेना प्रमुखांनी घालून दिला होता, तो दंडक आजही सुरू आहे. शिवसेना एक कुटुंब आहे. आपण त्या कुटुंबाचा एक घटक आहोत. एखादा कार्यकर्ता समाजासाठी झोकून देतो तेंव्हा समाजाने सुद्धा त्या कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी, असेही ते म्हणाले.

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले की, बारणे म्हणजे कर्तव्यदक्ष खासदार अशी दिल्लीत ओळख निर्माण झाली आहे. लोकसभेत सर्वाधिक वेळा भाग घेणारे खासदार म्हणून बारणे ओळखले जातात. खासदार बारणे लोकांच्या गराड्यात राहणारा खासदार आहेत. आम्ही सतत विचारांचे आदान प्रदान करतो. लोकसभेत सर्वात अधिक चर्चेत भाग घेणारे खासदार शिवसेनेचेच आहेत. दिल्लीत गेल्यावर करायचं काय हा प्रश्न इतर खासदारांपुढे असतो तर शिवसेना खासदारांपुढे जनतेचे प्रश्न असतात. निवडणुकीची भीती शिवसेनेला नाही. शिवसेनेला केवळ लढायचे आणि जिंकायचे एवढेच माहिती आहे. राजकारणात जागरूक आणि दक्ष राहणे गरजेचे आहे, असेही आढळराव म्हणाले.

चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे म्हणाले, कित्येक वर्षांपासून चापेकर बंधूंचे पोस्टाचे तिकीट काढण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष घातले आणि काहीच दिवसात हा प्रश्न सुटला. काम हाती घेतल्यास ते तडीस न्यायचे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी आपल्या कामात प्रत्येक वेळी प्रामाणिकपणा दाखवला आहे. बारणे पुन्हा निवडून येणार यात काही शंकाच नाही, असेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संसदेत जाऊन जनसेवा करण्याची संधी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आजवर मी काम करत असताना केवळ माणसे जोडत गेलो. माणसे तोडण्याच काम कधीच केल नाही. मला आव्हाने पेलायला आवडतात. सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना बळ देत जनसेवा केली, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजन खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे रवी नामदे, गजानन चिंचवडे, बशीर सुतार, धनाजी बारणे, मारुती बहिरवाडे यांनी संयोजन केले.

Your ad here