Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेसंत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजनमहानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन

मुंबई

तंबाखूचं व्यसन करण्यापासून रोखायला हवं होतं – शरद पवार

· 156 reads

तंबाखूचं व्यसन करण्यापासून रोखायला हवं होतं – शरद पवार

व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ४० वर्षांपूर्वी या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जाण्यापासून आपल्याला कोणीतरी रोखायला हवं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. इंडियन डेन्टल असोसिएशनने २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगावर पुर्णपणे नियंत्रण आणण्याचा निर्धार केला आहे.

जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास सुरु केलेल्या शरद पवारांनी कार्यक्रमात आपले मत मांडले. यावेळी त्यांनी आपल्याला कॅन्सर झाल्यावर झालेला त्रास, उपचार घेताना झालेल्या वेदना सांगितल्या. ‘सर्जरीमुळे आपल्याला प्रचंड त्रास झाला. आपले दात काढण्यात आल्याने तोंड पुर्णपणे उघडण्यास त्रास होत होता. बोलताना आणि अन्न गिळतानाही असह्य वेदना व्हायच्या’,असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना शरद पवारांनी इंडियन डेन्टल असोसिएशनला लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

Your ad here

२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांना कॅन्सर असल्याची माहिती मिळाली होती. उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना भारतातील काही तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी कृषीमंत्रीपद सांभाळणा-या शरद पवारांना ३६ वेळा रेडिएशन ट्रिटमेंट घ्यायची होती. हे प्रचंड वेदनादायी होतं असं एकदा शरद पवारांनी सांगितलं होतं. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शरद पवार आपल्या मंत्रालयात काम करत असत. नंतर २.३० वाजता अपोलो रुग्णालयात केमिओथेरपी घेत असत. यावेळी एका डॉक्टराने तुमच्याकडे फक्त सहा महिने असून महत्वाची कामे उरकून घ्या असं सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी मला आजाराची चिंता नाही, तुम्हीही करु नका असं म्हटलं होतं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करणारे शरद पवार लोकांना तंबाखूच व्यसन न करण्याचं आवाहन करत असतात.

Your ad here