Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेसंत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजनमहानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन

पिंपरी

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार - वैशाली काळभोर

· 172 reads

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार - वैशाली काळभोर

व्हीएस न्यूज - भाजपाने निवडणूकीपुर्वी भाववाढ स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सर्व नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करु. शेती मालाला भाव मिळवून देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करु. देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी चार कोटी युवकांना रोजगार देऊ. गरीब व अल्पउत्पन्न गटातील कुटूंबांना मोफत घरे देऊ. महिला सक्षमीकरणासाठी नविन योजना अमलात आणू. नद्यांचे संर्वधन, सुशोभिकरण करुन जलपर्यटनास चालणा देऊ. अशा शेकडो घोषणा केल्या होत्या. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर उलट गोरगरिब नागरिकांना तासनतास बँकेच्या रांगेत उभे करुन खाते काढून घेतले आणि आता डिजिटललायजेशनच्या नावाखाली अनेक प्रकारचे टॅक्स आकारुन गरीबांच्या पैशांवर सरकारने डल्ला मारला आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे नविन रोजगार तर नाहीच उलट आहे तेच कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र राज्यात व विशेषता पिंपरी चिंचवड मध्ये दिसत आहे. युपीए सरकारने दिलेल्या घरकुल योजना गुंडाळण्याचे काम भाजपा करीत आहे. नद्यांचे संर्वधन तर दुरच नदी पात्रातील अतिक्रमण देखील भाजप सरकारला काढता आले नाही. अशा निष्क्रिय भाजपा सरकारला जनता आगामी निवडणूकीत घरी बसवेल. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात जनजागृती करुन तीव्र आंदोलन छेडणार आहे. असे वैशाली काळभोर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये गॅस दरवाढी विरोधात केंद्र व राज्य सरकारचा आंदोलन करुन निषेध केला. यावेळी महिलांनी ‘ना तेरी है, ना मेरी है। ये सरकार लुटेरी है।।’ अशा घोषणा दिल्या. दोन दिवसापुर्वी घरगुती गॅस, सिलेंडरच्या किंमतीत 48 रुपयांची वाढ केली. या दरवाढीमुळे महिला भगिनींना कुटूंबाचा मासिक खर्च चालविणे अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीकडे कुच करीत असताना वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे आणि शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्यासह सर्वच पदार्थाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. या गॅस वाढीचा व पेट्रोल, डिझेल वाढीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी मंगळवारी (दि. 5 जून) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि चिंचवड गावातील चापेकर चौकात चुल पेटवून पिठलं,भाकरी करुन निषेध केला.

Your ad here

यावेळी माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका संगीता ताम्हाणे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, संघटिका कवीता खराडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, लता ओव्हाळ, माजी नगरसेविका शकुंतला भाट, गंगा धेंडे, सुप्रिया पवार, संगीता जाधव, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगला ढगे, रंजना कसबे, प्रिती मोकाशी, निलीमा कळंब, मंदा पेटकर, मिनल नवले, शिल्पा बिडकर, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, रामदास मोरे, नरेंद्र जाधव, दत्ता ओव्हाळ, आंनदा यादव, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.

Your ad here