व्हीएस न्यूज - महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने ,भक्ती -शक्ती निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षास्टॅंड चे उदघाटन गुरुवारी (दि. ६) रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला रिक्षाचालकांनी फेटे परिधान करून या रिक्षास्टॅंड चे स्वागत केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे ,नगरसेवक सचिन चिखले ,उत्तम केंदळे ,पंकज भालेराव ,कमल घोलप, शर्मिला बाबर ,पौर्णिमा सोनवणे ,माजी नगरसेवक सुलभा उबाळे ,तानाजी खाडे ,ऊर्मिला काळभोर ,घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत आणि त्यांनी स्वतःचे रिक्षास्टॅंड निर्माण केले आहे. हे शहराच्या दुष्टीने अभिमानाची बाब आहे. रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. महिलांच्या रिक्षास्टॅंडवर वाचनालय ,पाणपोई आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील ,असे आश्वासन महापौरांनी दिले.
बाबा कांबळे म्हणाले कि ,महाराष्ट्र रिक्षा पंचायती आणि घरकाम महिला सभेच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स बॅच ,परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या .यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षा चालक झाले असून ,आता महिलाही रिक्षा चालवणार आहे. महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे त्यांनाही हक्काचे रिक्षास्टॅंड मिळावे यासाठी महिलांचे देशातील पहिले रिक्षास्टॅंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वसंध्येला या रिक्षास्टँडचे उदघाटन झाले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्षा सरस्वती गुजलोर ,यमुना काटकर ,विजयालक्ष्मी हडपद ,जयश्री मोरे,जयश्री साळुंखे,संगीता कांबळे,आयेशा सोळाशे
अक्षता गावडे ,सविता ओव्हाळ ,रेखा ठेळके, कविता मैदाड ,रुपाली तिकोने ,दीपाली तिकोने ,मीना रंधवे यांनी परिश्रम घेतले.