Breaking News

पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे |
V. S. News
देहुगावात किरकोळ वादातून दोघांना टोळक्याची मारहाण

व्हीएस न्यूज - किरकोळ वादातून दोघांना सहा जणांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता देहुगाव येथील महालक्ष्मी चौकातील संत तुकाराम इमारती जवळ घडली.

याप्रकरणी सचिन काळोखे, बबलू काळोखे, सख्या विजय काळोखे, प्रशांत साळुंखे, हर्षद काळोखे, अमित हगवणे (सर्व रा. काळोखे वाडा, देहुगाव) यांच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दीपक रावसाहेब मोहिते (वय 27 रा. देहुगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा त्याच्या मित्रा सोबत कॅरम खेळत बसला होता. यावेळी झालेल्या किरकोळ वादातून सचिन हा त्याच्या मित्रांना तेथे घेऊन आला व त्याने शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने, सिमेंट ब्लॉक यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिपकचा मित्र अजय गायकवाड हा भांडणे सोडविण्यास गेला असता त्यालाही टोळक्याने जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही निगडी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
एसटीची तोडफोड करून चालकाला मारहाण

व्हीएस न्यूज - टेम्पोचालकाने एसटी बस थांबवून एसटीची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वाकडमधील शनि मंदिराजवळ घडली असून संबधित टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
एसटी चालक सचिन जाधव (वय-38, रा. दौड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैजनाथ कदम (वय 27, रा. पडवळनगर, थेरगाव, पुणे) या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे बोरविली ते सासवड एसटी बस घेऊन जात होते. दरम्यान, वाकड शनि मंदिराजवळ महामार्गावर कदम याने एसटीला टेम्पो आडवा लावला. एसटी थांबवून दगड मारून तोडफोड केल. तसेच, शिवीगाळ व हाताने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
पैशावरून एकाची आत्महत्या ; पत्नीसह सात जणांवर गुन्हा


व्हीएस न्यूज - लोन काढण्यास भाग पाडून एकाला सात जणांनी मारहाण करून गळफास घेवून आत्महत्या करण्यास भाग पाडले. गळफास घेण्यापुर्वी त्यांनी पत्नीसह सात जणांच्या नावांनी चिठ्‌टी लिहून ठेवली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

हाजीमंलग काशिमसाहब मुल्ला असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यानुसार त्यांची पत्नी सपना हाजीमंलग मुल्ला (वय-29), रंजना प्रकाश शिर्के (वय-50), अतिश प्रकाश शिर्के (वय-32), सुजाता अतिश शिर्के (वय-28), प्रकाश शिर्के (वय-55, सर्व रा. साई संकुल सोसायटी, रहाटणी), संदीप वाघमारे (वय-35), विकास म्हस्के (वय-35) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा भाऊ नबीलाल मुल्ला (वय-41, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत फौजदार सुनिता गोडे यांनी माहिती दिली. हाजीमंलग मुल्ला यांना आरोपींनी पैशांची मागणी करत लोन काढण्यास भाग पाडून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्का बसलेल्या मुल्ला यांनी शुक्रवारी घरामध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. मुल्ला यांनी आत्महत्या करण्यापुर्वी पत्नीसह आरोपींच्या नावाने चिठ्‌टी लिहून ठेवली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतू, त्यांना लोन का काढण्य़ास सांगितले हे अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे गोडे यांनी सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
प्रॉपर्टी प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

व्हीएस न्यूज - स्टार इंडिया ग्रूप आणि वर्किंग जर्नालिस्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे आयोजित केलेल्या तिन दिवशीय प्रॉपर्टी व बॅंकिंगच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त मिळाला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक विजय फुगे, फॉर्च्यून ग्रूपचे संचालक मकरंद पांडे, बांधकाम व्यावसायिक नितीन धिमधिमे, राजेश अगरवाल, राजेश मेहता , दिनेश जहांगीरदार, नितीन सोमाणी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार म्हणाले कि, प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच छताखाली नामांकित व दर्जेदार गृहप्रकल्प पाहण्यास मिळते. अशी प्रदर्शने शहरात वारंवार भरवली पाहिजेत. फॉर्च्यून ग्रूपकडे ३१ जानेवारी पर्यंत बुकिंग केल्यास एकतोळा सोने मोफत दिले जाणार असल्याची माहिती संचालक मकरंद पांडे व नितीन धिमधिमे यांनी दिली. या प्रदर्शनात ५० नामवंत बिल्डर्स सहभागी झाले आहे.

...Read More

V. S. News
देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाने देशाप्रती राष्ट्र प्रेमाची भावना वृध्दींगत होईल - ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव

व्हीएस न्यूज निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक 107 मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झालेअसल्याने देशाप्रती राष्ट्र प्रेमाची भावना प्रत्येक शहर वासियांच्या मनात वृध्दींगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रिडा, कला साहित्य व सांस्कृती समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकिर, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अ” प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे,“ ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ई ”प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, नगरसदस्या आनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप,झामाबाई बारणे, आशा धायगुडे शेंडगे, सुजाता पालांडे, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, माधुरी कुलकर्णी, सिमा चौगुले, माधवी राजापुरे, आरती चौंधे, गीता मंचरकर, सुवर्णा बुरडे,नम्रता लोंढे, नगरसदस्य राजू मिसाळ, उत्तम केंदळे, कुंदन गायकवाड, निलेश बारणे, राहुल जाधव, शैलेश मोरे, अमित गावडे, सचिन भोसले, बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव ढाके, लक्ष्मण उंडे, राजेंद्र गावडे, विलास मडिगेरी, बाबू नायर, माजी महापौर आर.एस.कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, आयुबखान पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, विजय खोराटे, आशा राऊत, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे,संदिप खोत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक पवन साळवे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, रवींद्र दुधेकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, सदस्य श्री.शेलार, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे माजी नगरसेवक राजेश पिल्ले, मारुती भापकर, विजू लांडे, निलेश पांढारकर, सामाजिक कार्यकरते सचिन ढोबळे, संजीवनी पांडे, सारंग कामतेकर, अमित गोरखे यांच्यासह पदाअधिकारी,नगरसदस्य, नगरसदस्या, अधिकारी, कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.

यावेळी ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव म्हणाले, भक्ती शक्ती चौक हा भक्ती आणि श्क्तीचे प्रतिक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वात उंचीचा राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. शोर्य, विरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येवू अथवा तिरंग्यात शरिर झाकून येवू अशी शपत घेतात. कारगीलच्या युध्दा मध्ये विजय प्राप्त करुन तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली तेव्हा पासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे म्हत्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.

निवृत कर्नल सदानंद साळुंके म्हणाले, भक्ती शक्ती चौकातील देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासियांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कुठेही घाण करु नका. कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्व इतरांना ही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून स्वत: मधील देशभक्ती जागृत ठेवणे ही गजेचे आहे.

महापौर नितीन काळजे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या इतीहासात या एतिहासिक क्षणांची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वात (107 मीटर) उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहिल. स्वच्छ सर्वेक्षन 2018 मध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेवून शहर स्वच्छ मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक येणे कामी सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी त्यांनी केले. स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिन हा ख-या अर्थाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याचा दिवस असून त्यांनी आपल्या देशाला दिलेली सर्वात मोठी अनमोल देनगी म्हणजेच संविधान होय. सर्वांना समान हक्क व न्याय देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहरात उभारल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्र प्रेम जागृत झाले आहे. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणे प्रत्येक नागरिकाच्या मनात देश प्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या एतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. हे शहर आपले आहे, अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकास कामात सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील एकमेव स्वच्छ, सुंदर व विकसनशिल शहर म्हणून ओळखले जाईल, असे ते यावेळी म्हणाले.

शहरातील मनपा शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगातील वेशभुषा परिधान करुन तिरंगी रंगातील हजारो फुगे आकाशात सोडले. भक्ती शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाहून निघाला होता. सुमारे दहा हजार पेक्षा अधिक नागरिकांनी या एतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती शक्तीचा परिसर भारत माता कि जय व बंदेमातरम च्या घोषणेने दुमदुमूनगेला होता. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधीनी शाळेच्या पथकाने ध्वज गीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. या कार्यक्रमापूर्वी संदिप पंचवाटकर यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

००००

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ६ हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा तसेच पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ करण्याचा तुघलकी निर्णय स्थायी समितीने घेतला. या निर्णयामुळे करदात्यांना मोठा आर्थिंक भुर्दंड सोसावा लागणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून नागरिकांना वाढीव पाणीपट्टीची झळ बसणार आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यावर स्थायी समितीत चर्चा झाली. पाणीपट्टीचे प्रस्तावित दर अधिक असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. परंतु, पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणार्या उत्पन्नात मोठी तफावत असल्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाच टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. परंतु, पाच टक्के दरवाढ करण्याला शिवसेना नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादीच्या राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला.

सभापती सीमा सावळे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक १०९ कोटी रुपयांचा खर्च येतो. पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या धरणातून पाणी उचलणे, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा करणे, मीटर रीडिंगनुसार पाण्याचे बिल तयार करणे, त्याचे वाटप करणे या सर्व प्रक्रियेवर हा खर्च होतो. एकीकडे १०९ कोटींचा खर्च होत असताना नागरिकांनी वार्षिक ३४ कोटी रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, ही प्रशासनाची मागणी असते. परंतु, त्यातील अवघ्या २५ ते २६ कोटी रुपयांचीच वसुली होते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर महापालिकेला वार्षिक ८० ते ८५ कोटी रुपयांचा बोजा पडतो. अखेरिस, प्रति कुटुंबाला दरमहा सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचप्रमाणे मीटर रिडींगप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी करण्यासाठी प्रति कुटुंब प्रतिमहिना १०० रुपये, झोपडपट्टीतील प्रति नळजोडासाठी महिना ५० रुपये दर आकारण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांना प्रति एक हजार लिटरसाठी ५० रुपये, खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन्स, रुग्णालये आणि वसतीगृहांना प्रति एक हजार लिटरसाठी १५ रुपये, धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय आयुक्तांची मान्यता आणि ना नफा ना तोटा या तत्त्वावरील मंडळे तसेच महापालिकेच्या इमारतींना प्रति १ हजार लिटरसाठी १० रुपये आणि स्टेडियमला प्रति १ हजार लिटरसाठी २० रुपये दर आकारण्याचे आयुक्तांकडून प्रस्तावित करण्यात आले होते. या दरामध्ये स्थायी समितीने कोणतेही बदल केलेले नाहीत, असे सीमा सावळे यांनी सांगितले.

नवीन दरपत्रक -

सहा हजार ते १५ हजार लिटर पाण्याचा वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे आठ रुपये, १५ हजार ते २२ हजार ५०० लिटरपर्यंत पाणी वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे साडेबारा रुपये, २२ हजार ५०१ ते ३० हजार लिटरपर्यंत पाणी वापर करणार्यांकडून प्रति एक हजार लिटरमागे २० रुपये आणि ३० हजार १ लिटरच्या पुढे पाण्याचा वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे ३५ रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे. याचा मोठा भुर्दंड करदात्यांना सोसावा लागणार आहे.

...Read More

V. S. News
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


व्हीएस न्यूज - चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय आय एम एस ) मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फोर्ब्स मोटर्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक रामचंद्र होनप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की सचोटी आणि बांधिलकी या तत्वांशी एकनिष्ठ असलेल्या 'यशस्वी' सारख्या संस्थेत शिकण्याची संधी मिळणे ही खूप मोलाची बाब आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा विकास करताना आपण आपल्या सभोवतालच्यांचाही विकास करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे असे सांगितले.
यावेळी लष्कराच्या मराठा लाईफ इन्फन्ट्री च्या वाद्यपथकाने केलेले संचलन विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी कार्यक्रमाला 'यशस्वी' संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संस्थेच्या संचालिका प्रा. बी.एस.कुंटे, ई. आर. मूर्ती,संचालक मकरंद कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी,ग्रंथपाल पवन शर्मा यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
...Read More

V. S. News
नागरिकांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दीष्ट्ये पूर्ण होणार अशक्य – महापौर नितीन काळजे

व्हीएस न्यूज - शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उध्दिष्ट पूर्ण होवू शकत नाही तरी सर्व शहरवासियांनी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालय, हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मोहला मार्केट/मंडई या ठिकाणी स्वच्छ भारत सुदृड भारत या विषयावर स्पर्धा घेवून जनजागृती करण्यात आली. घेण्यात आलेल्या स्वच्छ स्पर्धे मध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धेकांना त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, अर्चना बारणे, सुवर्णा बुरडे, कमल घोलप, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, हॉटेल व्यवसायिक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, मार्केट कमिटी सदस्य, आदि उपस्थित होते.

यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, शहर स्वच्छ करण्यासाठी सर्व वयोगटातील शहरवासीयांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. शहरवासीयांनी स्वत:हून काळजी घेतली तर शहर स्वच्छ व सुंदर राहिल. स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराचा क्रमांक अव्वल स्थानी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पथनाट्य द्वारे जनजागृती करुन स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचवणा-या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.प्रास्तावीक सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले तर सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉटेल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संतोषनगर थेरगाव येथील हार्ड कॅस्टल रेस्टॉरंट, इंदिरानगर येथील पंचशिल हॉटेल, पिंपरी येथील जिंजर हॉटेल, माईंड स्पेस, मोरवाडी येथील बारबेक्यू नेशन्स हॉटेल, एमआयडीसी येथील फर्न रेसेडेन्सी हॉटेल यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक वाकड येथील सयाजी हॉटेल, कासारवाडी येथील कलासागर हॉटेल, एमआयडीसी पिंपरी येथील शिवाई हॉटेल, मोरवाडी येथील किज हॉटेल यांनी तर तृतीय क्रमांक आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील अन्नपुर्णा इटरिज यांनी मिळवीला.

या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माळवाडी, पिंपळेगुरव, तळवडे, मोहननगर मुले व कन्या, अजंठानगर मुले व कन्या या शाळांनी पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपरी महानगरपालिका शाळा निगडी मुले व कन्या, च-होली विद्यानिकेतन यांनी तर तृतीय क्रमांक खराळवाडी मुले व कन्या शाळेनी मिळवीला. या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉस्पीटल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य बिर्ला हेल्थ सर्व्हीसेस लि. आदित्य बिर्ला मेमो. हॉस्पिटल, यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक क्रेडल मॅटर्निटी एन्ड वुमन्स केअर यांनी तर तृतीय क्रमांक ओएसिस मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटल यांनी मिळवीला.

या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ गृहनिर्माण संस्था स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वडमुखवाडी च-होली येथील जेनेसीस सोसायटी, दिघी येथील पोलाईट पेनोरमा, आळंदीरोड भोसरी येथील क्षितीज डिस्टीनेशन, पिंपले सौंदागर येथील रोझलॅन्ड रेसिडेन्सी, वेणुनगर येथील पलाश को हौ सोसायटी यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपळे निलख येथील ग्लिटराटी अर्पाटमेंट यांनी तर तृतीय क्रमांक जवळकरनगर फेज3 येथील कल्पतरु इस्टेट यांनी मिळवीला. या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला मार्केट/मंडई संस्था स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक च-होली येथील कै. बाबुराव शंकरराव तापकीर भाजी मंडई यांनी पटकविला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2018 अंतर्गत घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यमुनानगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील फार्मसिविभागाने पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपरी येथील डी.वाय.पाटील एस.एस महाविद्यालयांने तर तृतीय क्रमांक चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाने मिळवीला. तर उत्तेजनार्थाचे बक्षिस सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाला देण्यात आले.

...Read More

V. S. News
शहर महिला कॉंग्रेसतर्फे महिलांसाठी आरोग्य व कराटे शिबीर

हळदीकुंकू समारंभात वाण

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड माहिला काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 22 जानेवारी ते 24 जानेवारी असे दोन टप्प्यात शहरातील महिलांसाठी हळदीकुंकूवाचे निमित्ताने सौभाग्यचे वाण म्हणून महिलांसाठी आरोग्याचे शिबीर घेण्यात आले. डॉ सविता बाजारे यांनी तपासणी केली. गणेशनगर पिंपरी मधील समाजमंदिरात आयोजित या शिबीराचा 40 महिलांनी लाभ घेतला.

कन्यादिन निमित्ताने शहरातील युवतीसाठी महिला कॉंग्रेसच्या वतीने स्वसंरक्षणासाठी कराटेची एक दिवस कार्यशाळा घेण्यात आली. राजेंद्र सोलोंके यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिक संस्था विरंगुळा केंद्र येथे आयोजित या कार्यक्रमास प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व पिंपरी चिंचवड निरीक्षक रेणू पाटील, युवती सेलच्या सहनिरीक्षक रुपाली कापसे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी प्रास्ताविक केले. महिला कॉंग्रेस उपाध्यक्ष संगिता काळसकर यांनी आभार मानले. भोसरी ब्लॉक अध्यक्ष उषाताई कळसे, सेक्रेटरी हुरबानो शेख, जनरल सेक्रेटरी मीना गायकवाड, सुनीता कामथे, अलका पाटील यांनी सहभाग घेतला.

...Read More

V. S. News
संशोधन क्षेत्रात तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा विक्रम पीसीसीओईआरच्या नावे – डॉ. हरिष तिवारी

रावेतच्या पीसीसीओईआर मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

व्हीएस न्यूज - पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयाची पहिली बॅच नुकतीच पास झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाचा वार्षिक निकाल पहिल्या पाचमध्ये राहिल. तसेच शैक्षणिक, संशोधन, प्लेसमेंट या तीन विभागात लक्षणीय प्रगती केली आहे. संशोधन क्षेत्रात मागील तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा राष्ट्रीय विक्रम नुकताच पीसीसीओईआरच्या नावे नोंदविण्यात आला आहे. यामध्ये पीसीईटीच्या सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन आणि प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना संबोधित करताना तिवारी बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्‌माकर विसपुते, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर आदी उपस्थित होते. तसेच प्रसिध्द गायक प्रशांत नासरी, विराग वानखेडे यांनी उत्कृष्ठ गीत सादर केले. ‘एक्सप्रेशन 2018’ या सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत नृत्य, संगीत, गायन सादर करण्यात आले या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनावर आधारीत लघुनाटिका सादर केली. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर आणि प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या हस्ते फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संघांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. प्रिया ओघे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कोथले, नोबल वर्गीस,कौस्तुभ नरवेकर, ओमकार केदार, ऋषभ जैन यांनी आयोजनात सहभाग घेतला. हुसेन पडगावाला, शाश्वीता मुळे, दीपशिखा श्रीवास्तव, कस्तूरी आजगावकर, चिराग शहा यांनी सुत्रसंचालन केले.

...Read More

V. S. News
ISIS च्या संपर्कात आलेल्या पुण्यातील तरुणीला काश्मीरमध्ये बेड्या

व्हीएस न्युज - प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका 18 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. सादिया शेख असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सादिया शेख बंडगार्डन रोडवरील एका शाळेत शिकत होती. सादियाला दहावीत 90 टक्के मार्क होते. अकरावीला तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आयसिसच्या संपर्कात आली होती. सीरियात मेडिकलला प्रवेश देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

आयसिससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न तिने सुरु केला. यासाठी मोहम्मद सिराजुद्दीन नावाच्या व्यक्तीने तिला मदत केली. मूळचा कर्नाटकातील असणारा सिराजुद्दीन हा राजस्थान मधील जयपूरमधे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. मात्र त्याचवेळी तरुणांना कट्टर इस्लामकडे ओढण्याचे त्याचे प्रयत्नही सुरु होते.

तिच्या वागणुकीत आणि पेहरावात बदल झाला होता. जीन्स-टी शर्ट सोडून ती हिजाब घालायला लागली. इतकंच नाही तर ती धार्मिक बाबीतही रुची घेऊ लागली होती.

ही बाब तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एटीएसशी संपर्क साधला. एटीएसने मौलवीच्या मदतीने तिचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या संपर्कात राहणार नाही, असं तिने त्यावेळी सांगितलं होतं. यानंतर ती सुधारल्याचं समजलं जात होत.एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतरही सादिया शेख पुन्हा आयसिसच्या संपर्कात आली. ती काश्मीरमध्ये असल्याची समजल्यानंतर काश्मीर पोलिसांनी याची माहिती 23 जानेवारीला पुणे पोलिसांना पत्राद्वारे दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी सादियाच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहे. ती सध्या कुठे आहे हे सांगू शकत नाही, अस तिच्या आईने सांगितल्याचं पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम म्हणाले.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!