Breaking News

पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. |
V. S. News
एमआयडीसीतील कचरा समस्येची प्रशासनाकडुन पाहणी

व्हीएस न्यूज भोसरी मधील पेठ क्रमांक दहामधील अग्निशमन केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीररीत्या सुरु केलेले कचरा विलगीकरण केंद्र तात्काळ बंद करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली होती. या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी औद्योगिक परिसराला भेट देत, विविध ठिकाणची पाहणी केली.

एमआयडीसीतील पेठ क्रमांक दहा मधील जागा अग्निशमन केंद्राकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या ही जागा मोकळी असल्याने, याठिकाणी इंद्रायणी नगर, भोसरी परिसरातील कचरा आणून वेगळा करण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर कचऱ्याच्या बेपर्वाईबद्दल पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. याचे सविस्तर वृृत्त प्रसिद्ध होताच, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , क प्रभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे आणि संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे औद्योगिक परिसराची पाहणी केली.

येत्या पंधरा दिवसांत औद्योगिक परिसरातील कचरा उचलण्याचे व आवश्‌यक त्याठिकाणी कचरा पेटी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कचरा उचलण्यासाठी चार गाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पेठ नंबर दहा मधील कचरा विघटन केंद्र बंद करून दुसरीकडे हलवण्यासाठी आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्‍वासन बोदडे यांनी यावेळी दिले. येत्या पंधरा दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

...Read More

V. S. News
घर वाचविण्यासाठी रिंगरोड बांधितांचा वचननामा जाहिर

व्हीएस न्यूज रिंगरोडसाठी नागरिकांची घरे पाडू देणार नाही आणि याबाबत कायम बचनबद्ध राहण्याचा निर्धार घर बचाव संघर्ष समितीने व्यक्‍त केला आहे. प्रत्येक घर वाचविण्याकरिता समिती वचनबद्ध राहणार असल्याचे सांगत संयोजकांनी या आंदोलनास बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवड येथे आयोजित एका बैठकीत घर बचाव संघर्ष समितीने याबाबतचा ‘वचननामा’ जाहीर केला आहे.

यावेळी बोलताना विजय पाटील म्हणाले, ”अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने समिती स्थापन करण्याचे योजिले आहे. परंतु, समितीचे स्वरूप, उद्देश, आणि लोकसमावेश याबाबत स्पष्टता नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्‍यता आहे. सात ऑक्‍टोबर 2017अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी कायदा संमत झाला आहे. बाधित नागरिकांना संबधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असून त्यावेळेत सर्व कागदपत्रे स्वायत्त संस्थांकडे जमा करणे आवश्‍यक आहे. प्राधिकरण समितीमुळे वेळेचा अपव्यय होणार आहे. रिंगरोड बाधित घरे नियमितीकरणासाठी प्राधिकरणाने वेळेत नियोजन करणे आवश्‍यक आहे. घरे अधिकृत करण्याच्या अध्यादेशामध्ये अनेक जटिल अटी- शर्थी आहेत. त्या शिथिल केल्या किंवा रद्द केल्या तरच घरे नियमित होऊ शकतात, असे पाटील म्हणाले.

चिंचवड येथे झालेल्या बैठकीत ‘रिंगरोड’ आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. चिंचवड, गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळेगुरव, कासारवाडी परिसरातील 40 समन्वयक बैठकीला उपस्थित होते. मुख्य समन्वयक विजय पाटील, राजेंद्र चिंचवडे, बाळासाहेब उबाळे, नरेंद्र माने, निलचंद्र निकम, सचिन काळभोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रेखा भोळे, नारायण चिघळीकर, रजनी पाटील, शिवाजी इबितदार, गोपाळ बिरारी, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर, योगेश विरोळे, बाळासाहेब उबाळे, विशाल पवार, रवी पवार, नरेंद्र माने, मयुर पवार, नितीन पचपिंड, प्रदीप गणगे, निलचंद्र निकम, सुनीता गायकवाड, वैशाली कदम, वैशाली भांगीरे, चंदा निवडुंगे, आबा राजपूत, मोतीलाल पाटील, प्रदीप पटेल, माउली जगताप, सागर बाविस्कर, उमाकांत सोनवणे, किरण पाटील, भाऊसाहेब पाटील, अमोल हेळवर, बजरंग पवार, माणिक सुरसे बैठकीला उपस्थित होते.

...Read More

V. S. News
क्रेडीट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेची 65 हजारांची फसवणूक

व्हीएस न्यूज बॅंकेतून बोलत असून आपले क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे असे खोटे सांगून एका महिलेची तब्बल 65 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13ऑक्‍टोबरला निगडी प्राधिकरणातील प्रतिक्षा बंगला येथे घडली. याप्रकरणी अनुराधा सूद (वय 52, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराधा यांना अनोळखी मोबाईल धारकाने फोन केला. मी बॅंकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगून फिर्यादीच्या कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या कार्डवरून ऑनलाईन माध्यमातून परस्पर खरेदी करून सूद यांची 65 हजार 496 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
अवघ्या साडेचार महिन्यातच अतिरिक्त आयुक्त हांगे यांची बदली

व्हीएस न्यूज अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू झाल्यानंतर हांगे यांची अवघ्या साडे चार महिन्यात बदली करण्यात आली. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे अच्युत हांगे आपल्या कार्यशैलीमुळे नेहमी चर्चेत राहिले. त्यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्याच्या नगर विकास विभागाने अच्युत हांगे यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी (दि. 24) जारी केला आहे. मुख्याधिकारी संवर्गाच्या अ श्रेणीतील हांगे हे एक जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वी नागपूर, अहमदनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून तर भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर या ड दर्जाच्या महापालिकेत आयुक्त म्हणून कामकाज पाहिले.

अतिवृष्टीच्या काळात मीरा-भाईंदरच्या महापौरांनी पाच वेळा मोबाईलवर संपर्क साधला असतानाही हांगे यांनी महापौरांचा फोन घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी हांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली होती. त्यामुळे त्यांची दीड वर्षांपूर्वी हांगे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. गेले वर्षभर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. अखेर, एक जुलै रोजी त्यांची पिंपरी महापालिकेत वर्णी लागली. पिंपरी महापालिकेतही विवादांनी त्यांचा पीछा सोडला नाही. साडेचार महिन्यांच्या काळात हांगे नेहमीच वादात राहिले. स्थायी समितीत नगरसेवकांना प्रत्युत्तर देणे, कनिष्ठांना शिवराळ भाषा वापरणे, गणेश विसर्जनासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे, अशा घटनांनी त्यांना कायमच वादात अडकवून ठेवले. तसेच, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनाही त्यांनी उद्धट भाषेत प्रत्युत्तरे दिली होती. त्यामुळे हांगे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांची बदली झाली असली तरी त्यांच्याजागी कोणाची नियुक्ती करायची याबाबत राज्याच्या नगर विकास विभागाने अद्याप आदेश काढलेले नाहीत, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

...Read More

V. S. News
प्रेम प्रकरणातून तरुणीवर चाकूने वार

व्हीएस न्यूज प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना काल (दि. 22) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेल जवळ घडली.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय 30, रा. पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुरय्या वजीर शेख (वय 26, रा, वाशी, ठाणे) या तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुरय्याचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तसेच सुरय्या हिची मैत्रिण गंगा मण्डल हिच्याशी देखील प्रेमसंबंध होते. दरम्यान गंगा सोबत बबलू सुत जुळाले असल्याची कुणकुण सुरय्या हिला लागली होती. त्यामुळे तीने गंगाला मुंबईला घेऊन जायचे ठरविले होते. याचा राग बबलूच्या मनात होता.

दरम्यान सुरय्या बबलूला भेटायला पिंपरी येथे आली असताना त्या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या वादातून बबलूने सुरय्याच्या गळ्यावर व अंगावर चाकुने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) उपचार सुरु आहेत. सुरय्या ठाणे येथे मजुरीची कामे करते. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

...Read More

V. S. News
वाकड परिसरात प्रवाशाला लुटले

व्हीएस न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाने प्रवाशाकडील पाच हजार रुपये लुटले. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री एक वाजता जगताप डेअरी चौकाजवळ साई चौकात घडली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात प्रमोद बोर्डे (वय 26 रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी रिक्षा चालक व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे. प्रमोद बोर्डे हे कामानिमीत्त मुंबईला गेले होते. मुंबईहून रात्री एकच्या सुमारास परतल्यानंतर त्यांना रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे ते पायी जात असताना एका अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना लिफ्ट देऊ केली. मात्र रिक्षात बसल्यानंतर रिक्षा चालक व रिक्षात बसलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी प्रमोद यांच्याकडील पाच हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
बालकाश्रमातून मुलगा बेपत्ता

व्हीएस न्यूज दिघी येथील ज्ञानदीप बालकाश्रमातून 12 वर्षाचा मुलगा काल, रविवारी (दि 22) सकाळपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गणेश विठ्ठल जाधव (वय 12 मूळ रा. कनकुरी, ता. गंगापूर, औरंगाबाद) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून गणेश हा काल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.

याप्रकरणी ज्ञानदीप बालकाश्रम येथील आर्यन नामदेव डोलारे (वय 19 ) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश हा काल सकाळी साडेअकरा वाजल्यापासून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. त्याची उंची चार फूट, रंग सावळा, चेहरा गोल, नाक दबलेले, अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट, निळी जीन्स असे असा पेहराव असून त्याला मराठी भाषा बोलता येते. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

...Read More

V. S. News
काळेवाडीतील ‘रस्ता गायब’, चौकशी करा

व्हीएस न्यूज काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील अठरा मीटरचा रस्ता गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकाराची तातडीने चौकशी करून अधिकारी तसेत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी मुख्य रस्ता ते राजवाडेनगरपर्यंतच्या अठरा मीटर रस्ता रुंदीकरण झाले असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. माहिती अधिकारात प्राप्त माहितीनुसार हा रस्ता जागा हस्तांतर रखडल्यामुळे विजयनगरमध्ये फक्‍त तीनशे ते चारशे मीटरपर्यंत विकसित झाला आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता 20 मे 2014 रोजी 52 लाख 50 हजारांना देण्यात आली. त्यानंतर एच. सी. कटारिया या ठेकेदाराची 49 लाख एक हजार961 रुपयांना निविदा मान्य केली.

सहा महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश 15 एप्रिल 2015 रोजी देण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. हे काम पंचवीस टक्के झाले असून, या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मानांकनानुसार योग्य व समाधानकारक असल्याचा दाखला ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिला आहे. त्यानंतर 14 ऑक्‍टोबर 2015 रोजी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता याच्या सह्या असलेले काम पूर्ण झाल्याचे दस्तऐवज आयुक्‍तांना देण्यात आले असून, त्यावर हे काम समाधानकारक व व्यवस्थित पूर्ण केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर महापालिकेच्या लेखा विभागाने ठेकेदाराला कामाचे पैसेही देऊन टाकले. महापालिकेच्या तिजोरीवर सामुहिक दरोडा घालण्याचा हा प्रकार असल्याचे युवराज दाखले यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूचा कहर

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे यंदाच्या वर्षी आतापर्यंत पुणे शहरात 930 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऑक्‍टोबर महिन्यातील अठरा दिवसांत डेंग्यूचे 92 रुग्ण आढळले आहेत. सध्या स्वाइन फ्लू कमी झाला असून, डेंग्यूने रुग्णाची संख्या वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीमध्ये डेंग्यूचे 64 रुग्ण आढळले होते. यानंतर आठ दिवसांमध्ये पुन्हा 28 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर पुणे शहरात जानेवारी – 8, फेब्रुवारी – 2, मार्च -4, एप्रिल – 5, मे – 3 आणि जूनमध्ये 6 असे सहा महिन्यांत 28 रुग्ण आढळून आलेले आहेत. या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव फार कमी असतो. पण, जूनमध्ये पाऊस पडला आणि डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस डासांचा उपद्रव सुरू झाला. एका जुलै महिन्यातच 58 रुग्ण आढळून आले. तर त्यानंतरच्या महिन्यात यामध्ये ते सहा पटीने वाढ दिसून आली. त्यामध्ये ऑगस्ट – 234, सप्टेंबर- 251 तर ऑक्‍टोबरमध्ये यामध्ये प्रचंड वाढ झाली असून 18 ऑक्‍टोबरपर्यंत 359 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कीटक प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 1079 संशयित रुग्णांपैकी 138 जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर चिकुनगुनियाचे 14 संशयित व मलेरियाचे 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऑक्‍टोबर महिन्याच्या अठरा दिवसांत 92 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यावरूरुन स्वाइन फ्लूप्रमाणे डेंग्यूचा धोकाही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

...Read More

V. S. News
प्रारब्धापेक्षा सतत कष्ट केल्यास यश निश्चित – शरद उपाध्ये

व्हीएस न्यूज प्रारब्धावर अवलंबून राहू नका. प्रारब्ध कसेही असोत, प्रारब्धापेक्षा प्रयत्नशील राहून सातत्याने कष्ट केल्यास यश हमखास मिळते, असे मत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील फॉर्च्यून ग्रुपच्या वतीने राशीचक्रचे 5088 यशस्वी प्रयोग व राशीभविष्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्योजक डॉ रमेश राऊत, अभ्युदय बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल निकम, उद्योजक विठ्ठल कारखानीस, कासारसाईचे माजी सरपंच शंकर शितोळे, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, उद्योजक मदन चिंचवडे, हिरालाल पाटील, संतोष दुबळे, फॉर्च्यूनचे संचालक नितीन धिमधिमे, मकरंद पांडे, सुरेश सातकर आदी उपस्थित होते.

उपाध्ये पुढे म्हणाले की, पत्रिका ही भूतकाळावर अवलंबून असते तर भविष्य घडविणे हे आपल्या हाती असते. भविष्य हा अध्यायनाचा व गमतीचा विषय आहे. ग्रह किंवा पत्रिकेवर अवलंबून न राहता उपासना वाढवून स्वकर्तृत्वाच्या बळावर जीवनात वाटचाल करा. यशस्वी व्हाल. आयुष्यात काहीच कमी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन रवी पंडीत यांनी केले. तर आभार नितीन धिमधिमे यांनी मानले.

...Read More

V. S. News
सांगवीत बालशिक्षण परिषदेचे तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्यअधिवेशनाचे (27 ते 29 ऑक्टोबर) आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्‍येष्ठ बालशिक्षणतज्‍ज्ञ प्रा. रमेश पानसे, म.बा.शि.प. कार्याध्यक्ष डॉ. दिनेश नेहेते, सांगवी केंद्राच्या अध्यक्ष मेघना बाक्रे, कार्याध्यक्ष नझीर जमादार, त्रिवेणी पावसे, नीता सणस आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र बालशिक्षण ही संस्था १९९४ साली स्थापन झाली. या संस्थेचे कार्य बालशिक्षणाचा शास्त्रीय विचार जनतेपुढे आणणे हे आहे. बालशिक्षण परिषद जनजागृतीचे कार्य, गेली २४ वर्षे सातत्याने करीत आहे. प्रकाशन, प्रशिक्षण, प्रदर्शन आणि व्याख्यानाद्वारे समाजातील सर्व घटकांना बालशिक्षणाची शास्त्रीय माहिती देण्याचा परिषद प्रयत्न करीत आहे, असे प्रा. पानसे यांनी सांगितले.

दरवर्षी परिषदेतर्फे बालशिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते,शिक्षक, संस्थाचालक, पालक, स्वखर्चाने उपस्थित राहतात. यावर्षीचे हे अधिवेशन 'संस्कृती हॉल' नवी सांगवी, पुणे येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी 'बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान'हा महत्वाचा विषय निवडण्यात आलेला आहे. या विषयावर अनेक शिक्षक, संस्थाचालक, कार्यकर्ते शोधनिबंध सादर करणार आहेत, अधिवेशनाचे स्वरूप पूर्णपणे बौद्धिक स्वरूपाचे असून, शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांचे प्रदर्शन हा ही एक महत्वाचा भाग असेल या अधिवेशनासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओद्वारे शुभसंदेश पाठवलेला आहे. उद्घाटनासाठी वसुधा कामत, माजी कुलगुरू एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ तसेच पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी बजरंग आवारी, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात गुणवत्तावाढ आणि कार्यसुलभतेसाठी तंत्रज्ञान - संस्थाचालकांचे अभिनव प्रयोग या विषावरील चर्चासत्र होणार असून त्‍यास शिवाजी माने, कोल्‍हापूर येथील नीतू बावडेकर, जयश्री घाटगे आदी सहभागी होणार आहेत. तसेच ग्राममंगलचे प्रसाद मणेरीकर यांचे व्याख्यान,बालशिक्षणाची वाटचाल याविषयावरील चर्चासत्रात प्रसाद जोशी, नेहा जमदग्नी, मंगला जोशी आदी सहभागी होणार आहेत.

शनिवारी (28 ऑक्टोबर) शोधनिबंध वाचन यामध्ये तंत्रज्ञान पर्यायी नव्हे, पूरक साधन याविषयावर चित्ररेखा जाधव, सुरेखा सोनार, रोहिणी घोंगडे आदी सहभागी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज मीठभाकरे असतील. त्‍यानंतरच्या सत्रामध्ये मृदुला धोंगडे, संजय अष्टेकर, वैशाली सूर्यवंशी, यांच्या शोधनिबंधाचे वाचन तर लोणावळा येथील मनःशक्‍ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांचे व्याख्यान, दुपारच्या सत्रात नीलेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रज्ञान वापर-इतरांचे प्रयोग-आपले शिक्षण याविषयावरील शोधनिबंध सादर होतील रेखा पाटील,नितीन माळी, रुपाली पाटील हे यामध्ये सहभागी होतील. अधिवेशनाचा समारोप रविवारी होईल. या कार्यक्रमास राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे व्यवस्थापक श्री. विवेक सावंत उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनातील उपस्थित सदस्यांसाठी निवास, भोजन व्यवस्था तसेच संपूर्ण जागा व कार्यक्रमव्यवस्था यासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या सांगवीतील शिक्षणसंस्थेने प्रायोजकत्व घेतेलेले आहे. सर्व शिक्षणप्रेमींनी तीनही दिवस अधिवेशनास उपस्थित राहून या विषयातील शिक्षणविषयक नवीन माहिती घ्यावी आणि बालशिक्षणाचे स्वरूप शास्त्रीयपद्धतीचे होण्यासाठी जमेल ते कार्य करून या चळवळीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रशांत शितोळे, प्रा. रमेश पानसे तसेच कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.

...Read More

V. S. News
छटपुजेनिमित्त मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती

व्हीएस न्यूज - विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपुजेनिमित्त मंगळवार (दि.24 ऑक्टोबर) ते शुक्रवार (दि. 27 ऑक्टोबर) पर्यंत मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य छटपुजा आणि इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या महोत्सवात नदी संवर्धनाचा संकल्प करीत ‘इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरतीचा’ मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. वाराणशी (काशी) येथील गंगेच्या घाटावर ज्याप्रमाणे गंगेची आरती करण्यात येते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, उपमहापौर शैलेजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि स्थानिक नगरसेवक आदी प्रमुख मान्यवरांसह शहरातील उत्तर भारतीय समाज बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे.

या महोत्सवानिमित्त रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोशीतील इंद्रायणी घाटावर उर्त्स्फुतपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये शामबाबू गुप्ता, अक्रम शेख, प्रमोद गुप्ता, सुनिल सिंह, संजय विश्वकर्मा, देवेंद्र पासवान, रामेश्वर गौड, फुलचंद राम, उमेश सिंह, राजकुमार गुप्ता, रोहित प्रसाद आदींनी सहभाग घेतला.

मंगळवारी (दि. 24) सायंकाळी स्नान ध्यान, बुधवारी (दि. 25) खरना, छोटकी छट (रसियाव रोटी), गुरुवारी (दि. 26) डाला छट व्रत (संध्या अर्ध्य) भव्य मातेची गंगा आरती, शुक्रवारी (दि. 27) पहाटे 5.30 वाजता सुर्योदय अर्ध्य, 6.32 वाजता सुर्यदर्शन गंगा आरतीने महोत्सवाची सांगता होणार आहे.

छटपुजेचे महत्व सांगतांना गुप्ता यांनी माहिती दिली की, छट पुजा हे संपुर्ण उत्तर भारतीय समाजात लोकआस्थेचे महापर्व समजले जाते. कार्तिक शुक्ल षष्टीला सर्व उत्तर भारतीय कुटूंब जल, जमिन आणि जगंलाचे रक्षण संवर्धन व्हावे यासाठी नदी किनारी येऊन वसुधंरे प्रति प्रेम भावनेने समर्पित होऊन सुर्य नारायणाची उपासना, पुजा करुन त्याचे गुणगाण गातात. मानवाच्या जीवनातील निर्सगाचे व नदीचे महत्व लक्षात घेऊन नदी घाटावर श्रध्दापुर्वक पुजा विधी करतात. महिला आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी या दिवशी निर्जला व्रत,उपवास धरतात. या काळात उपलब्ध असणारी फळे, फुले आणि घरात बनविलेल्या प्रसादाचा नैवेद्‌य दिव्यांसह गंगेला समर्पित करुन कुटूंबाचे, समाजाचे क्षेमकुशल उत्तम रहावे यासाठी प्रार्थना करुन उपवास सोडतात. देशभर उत्तर भारतीय समाज उद्योग व्यवसायामुळे जगभर विखुलला आहे. त्या त्या भागातील हे नागरीक जवळच्या नदीकिनारी हा उत्सव साजरा करतात. हिंदू धर्मियांबरोबरच मुस्लिम धर्मिय देखिल या उत्सवात सहभागी होत असल्यामुळे महोत्सवाला आता देशभर राष्ट्रीय एकात्मकतेची प्रतिक मानले जाते. अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!