व्हीएस न्युज - पुण्यातील कॉसमॉस बँकेतील खाती परदेशातून हॅक झाल्याचा आरोप होत आहे. परदेशी हॅकर्सनी एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांचा अपहार केल्याचा दावा बँकेने केला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉंगकॉंगमधून आपल्या बँकेतील खाती हॅक केली आणि तब्बल 95 कोटी रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार कॉसमॉस बँकेने पोलिसात केली आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मालवेअर व्हायरसचा वापर करुन कॉसमॉस बँकेच्या व्हिसा आणि डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे हॅकरने 12 हजार व्यवहार केले. बँक खात्यांमधून परदेशात तब्बल 78 कोटी रुपये, तर भारतात अडीच कोटी रुपये वळते केल्याचा आरोप होत आहे. 80.5 कोटी रुपये 11 ऑगस्टला वळते केल्यानंतर 13 ऑगस्टला असाच प्रकार घडला.
कॉसमॉस बँकेतील खात्यांवरुन हाँगकाँगच्या हँसेन बँकेमधे असलेल्या ए. एल. एम. ट्रेडींग कंपनी या नावाने असलेल्या बँक खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये वळते करण्यात आले. असे एकूण 94 कोटी 42 लाख रुपये कॉसमॉस बँकेतील खात्यांमधून काढून घेण्यात आले. पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावर असलेल्या बँकेच्या मुख्यालयातील ए. टी. एम. स्वीच सर्व्हरवर मालवेअरच्या सहाय्याने हल्ला करुन हॅकिंग करण्यात आलं. बँकेकडून चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
कसा झाला अपहार?
दोन बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी स्विचिंग सिस्टिम असते. मात्र कॉसमॉस बँकेची फसवणूक करण्यासाठी आभासी स्विचिंग सिस्टिम मालवेअरच्या सहाय्याने तयार करण्यात आली. या आभासी स्विचिंग सिस्टिमने कॉसमॉसच्या व्हिसा आणि डेबिट खात्यांमधून 11 ऑगस्टला अवघ्या दोन तास तेरा मिनिटांमधे 12 हजार व्यवहार झाल्याचं दाखवलं.
आभासी स्विचिंग सिस्टिमने मागणी करताच कॉसमॉस बँकेच्या यंत्रणेने पैसे वळते केले. मात्र नंतर ही स्विचींग सिस्टिम खोटी असल्याचं लक्षात आलं. या 12 हजार व्यवहारांमधून तब्बल 80 कोटी 50 लाख रुपये एटीएमधून काढण्यात आले. या 80 कोटींपैकी 78 कोटी रुपये हे वेगवेगळ्या 21 देशांमधील एटीएम खात्यांमधून काढण्यात आले, तर अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढण्यात आले.
कॅनडातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आल्याची माहिती आहे. तर भारतात काढण्यात आलेले पैसे हे प्रामुख्याने मुंबई आणि इंदूरमधून काढण्यात आले. दुसऱ्या प्रकारात कॉसमॉस सहकारी बँकेच्या खात्यांमधून हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेत 13.5 कोटी रुपये 13 ऑगस्टला वळते करण्यात आले. त्यासाठीही आभासी स्विचिंग सिस्टिमचा उपयोग करण्यात आला. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याचा अंदाज आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
व्हीएस न्युज - धीरज रामसिंग तामचीकर यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वीजेएनटी सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वीजेएनटी सेल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने, प्रवक्ते फजल शेख, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक नगरसेवक मुलचंद भाट, विजय लोखंडे, शकुंतला भाट, विशाल काळभोर, इम्रान शेख, विनोद कांबळे, सचिन माने, विश्रांती पाडाळे, मनिषा गटकळ, बाळासाहेब पिल्लेवार, निलेश पुजारी, साऊल शेख, सरोदा तामचीकर, धीरज तामचीकर, अमर गंभिरे, विजय दळवी, विलास महाजन विष्णू सरगर, भालदार गुलामअली, दिनेश पटेल, अरूणा बनसोडे, वर्षा तामचीकर, भुपेंद्र तामचीकर, श्रीकांत राठोड, रितेश तामचीकर, गणेश तामचीकर, सर्जेराव जगताप, विजय भाट, आकाश राठोड, देवी थोरात, प्रमोद ठाकूर, सोमश तामचीकर, विकी भाट सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, सैफ खान, सुर्यकांत पात्रे, अमर कांबळे, योगेश आयवळे, गणेश शिंदे, शिवदास चिलवंत, शिवाजी सुरवसे, निर्मला माने, शादाब खान, देवी थोरात, विलास भाट, जहिर खान, सुनाज भाट, नरेंद्र तामचीकर, अशोक तामचीकर, सुनील अडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्युज - पिंपळेसौदागरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोफत शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव, गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात वाकड, गणेशनगर आणि थेरगाव भागातील नागरिकांसाठी रविवारी (दि. १२) हे शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये ३०० हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. वाकड, गणेशनगर, थेरगाव भागातील नागरिकांसाठी थेरगाव, गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात रविवारी शिबीर घेण्यात आले.
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक मयूर कलाटे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महिला प्रभाग अध्यक्षा सुप्रिया गव्हाणे, माजी स्वीकॄत सदस्य गोरक्षनाथ पाषाणकर, विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश काटे, विशाल काळभोर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, विशाल पवार, प्रशांत सपकाळ आदी या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विशाल वाकडकर, सुनिल गव्हाणे, गोरक्षनाथ पाषाणकर, संतोष गोडांबे, अक्षय शेडगे, विशाल झुंबरे, जुबेर शेख, किशोर पाटोळे, चेतन विटकर, धैर्यशील धर्मे व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. थेरगाव येथील पडवळनगरमध्ये दुसरे आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्याचे आयोजन आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर महाराज ववले, विशाल काळे, सागर खवळे यांनी केले. या शिबिरात साडे चारशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
व्हीएस न्युज - मराठा आरक्षणामध्ये आत्मबलीदान केलेल्या काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे तसेच पोलिस कर्मचारी शाम काटगावकर यांना निगडीतील भक्ती शक्ती उद्यान येथे रविवारी (दि. 29) शहर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या पक्षांच्या वतीने आणि विश्व श्रीराम सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. असे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी नगरसेविका शमिम पठाण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्युज - नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मान ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर.के. पद्मनाभन यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. उद्या यासंदर्भात आदेश निघणार आहे. त्याबरोबर राज्यभरातील आणखी काही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचीही खांदेपालट होणार आहे. त्यात पुण्यालाही नवे आयुक्त मिळणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच पिंपरीच्या नव्या पोलिस आयुक्तालयात दोन नंबरचे पद असलेले अतिरिक्त आयुक्त व तीन नंबरवरील दोन उपायुक्तांची बदली झाली आहे.त्यानंतर प्रतीक्षा होती ती आयुक्तांचीच. ती सुद्धा उद्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी,महामार्ग) पद्मनाभन यांची बदली पिंपरी-चिंचवड येथे होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्याबरोबर राज्यातील चार पोलिस आयुक्तांचीही बदली होणार आहे. त्यात नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन यांचा समावेश आहे.त्यांची बदली पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून होणार असल्याचे समजते. तर, विद्यमान आयुक्त रश्मी शुक्ला या पद्मनाभन यांची जागा घेण्याची शक्यता आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख व तडफदार असा लौकिक असलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक यांची नवी मुंबईचे आयुक्त म्हणून बदली होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर, असेच डॅशिंग अधिकारी असलेले ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांना राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर नेमले जाणार आहे.तर राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रभारी पोलिस महासंचालक विवेक फणसळकर हे परमवीरसिंह यांची जागा घेणार आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) डॉ.भुषणकुमार उपाध्याय हे डॉ. वेंकटेशन यांच्या जागी जातील,असे समजते. तर, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना लगेच बदलीचे ठिकाण देण्यात आलेले नाही.
व्हिएस न्युज - आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत चाललेल्या दोन वारकरी महिलांना एका अज्ञात टेम्पोचालकाने धडक दिली. या अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शिताफीने तपास करत टेम्पोचालकाला अटक केली. पांडुरंग बबन पनमंद (वय ४२, रा. सैराज कॉम्प्लेक्स, राजगुरूनगर, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. जनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०, दोघी रा. परळी वैजनाथ, बीड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या वारकरी महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई आणि सुमनबाई अंबाजोगाईमधील एका दिंडीत अंबाजोगाई ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडीत निघाल्या होत्या. ४ जुलै रोजी दिंडी मोशी येथील हॉटेल अथर्वसमोर मुक्कामाला थांबली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रातःविधीसाठी जात असताना अज्ञात टेम्पोने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शी कोणीही नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या प्रकरणाचा तपास करत पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे आणि पोलीस शिपाई सुहास जगताप यांनी मोशी, कुरळी, चाकण भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये त्यांनी एकूण २०६ वाहनांची तपासणी करून गुन्ह्यातील टेम्पोचा शोध घेतला. टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.२७) काढलेल्या आदेशान्वये भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील राज्यातील ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन तडफदार पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नम्रता पाटील यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) पदावर कार्यरत होत्या. तर विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर येथे कार्यरत होते. दोन्ही तडफदार पोलीस अधिकारी उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाले आहेत. या निवडीनंतर पोलीस आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हीएस न्युज - विश्रांतवाडी येथील एका शाळेत भर वर्गात विद्यार्थ्याचे केस कापल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षिका यांच्यावर बाल न्याय अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील एका शाळेत पिडीत मुलगा हा सहावीच्या वर्गात शिकतो. त्याचे केस वाढल्यामुळे त्याला अनेक वेळा केस कापून येण्यास सांगितले होते. पण, तो केस कापून येत नव्हता. तसेच, त्याच्या पालकांना देखील नोटीस पाठविण्यात आली होती. पण, ते देखील शाळेत आले नाहीत. त्यामुळे १७ जुलै रोजी भर वर्गात शिक्षिकेने विद्यार्थ्याचे केस कापले होते. त्याचा राग मुलाला आला होता.
घडलेला हा सर्व प्रकार विद्यार्थ्यानं पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे त्या दिवशी तक्रार दिली. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी चौकशी करून मुख्याध्यापिका, शिक्षिका यांच्यावर गुन्हा दाखल केला असून केस कापणाऱ्या शिक्षिकेला शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - सावित्री बाई फुले सभागृह पिंपरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी "नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स एन्ड डेव्हलपमेंट कॅर्पोरेशन" , 'स्किल कौन्सिल ऑफ ग्रीन जॉब ' , व " कॅमशाला (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पिंपरी चिंचवड म. न. पाच्या आरोग्य विभागामध्ये जे सफाई कर्मचारी काम करतात त्यांना काम करताना स्वतःच्या आरोग्याची व सुरक्षतेची काळजी कशी घ्यावी यासाठी दि. ९ जुलै ते १३ जुलै असे ५ दिवस प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये कॅमशालाचे प्रमुख मनोहर क्रिष्णा , कॅमशालाचे जनरल मॅनेजर ओपेशन्सस आणि स्किल कौन्सिल ऑफ ग्रीन जॉब चे प्रमाणित ट्रेनर स्मिता सिंग , शिवराज जाधव यांनी मार्गदर्शन केले. १३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड मनपा चे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्तिथीत १०० हुन अधिक कर्मचाऱ्यांची "अजय हेलथ केअर" यांच्या ४ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. व सर्व कर्मचाऱ्यांना कॅप , रिफ्लेक्टिव्ह जॅकेट , मास्क,हँडग्लोव्हस च्या किट चे वाटप करण्यात आले . या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे , आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर , आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना आणि सुशील मलये आदी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या मागोमाग मुंबई-पुणे हायवे निगडी ते दापोडी पर्यंत विशेष स्वच्छता मोहिम डी.एम.एंटरप्रायझेस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ३ वर्षे राबवत असून यावर्षी देखील विशेष स्वच्छता मोहिम संस्थेमार्फत दि. ०७/०७/२०१८ रोजी सकाळी ६:०० ते दुपारी ३:०० पर्यंत राबविण्यात आली.
सदर मोहिमे अंतर्गत डी.एम. एंटरप्रायझेस मार्फत २ ट्रक, १ टेम्पो, १ रोड स्विपर मशीन तसेच ८० पेक्षा जास्त सफाई कामगार, ड्रायव्हर, ७ सुपरवायझर, संस्थेचे पदाधिकारी तसेच म.न.पा चे अधिकारी व सफाई कामगार यांच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यासाठी सदर कंपनीला वाहतुक शाखेचे विशेष सहकार्य लाभले. तसेच म.न.पा चे अतिरिक्त आयुक्त मा. दिलिप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मा. मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी सौ. आशा राऊत व म.न.पा. अधिकारी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याअनुषंगाने आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने निगडी ते दापोडी हा पालखी मार्ग स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छते मोहिमेत म.न.पा. चे सहा. आरोग्याधिकारी मा. महादेव शिंदे, मा. ज्ञानेश्वर सासवडकर व म.न.पा. कर्मचारी तसेच संस्थेचे संचालक संतोष पाटील, संजय पवार, संभाजी गायकवाड, महेश पाटील, धनंजय पाटील, उदय कलगुटकर व पदाधिकारी यांच्या मार्फत स्वच्छता मोहिम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
पिंपरी ः शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल 279 गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेत परिमंडळ तीनमधील 50 अधिकारी आणि 400 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम गुरुवारी रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व पोलीस ठाण्यात ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये 31 तडीपार गुंडांना चेक केले. त्यापैकी एकजण आढळून आला असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. 44 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील 15 आरोपी पोलिसांच्या हाती लागले. माहितगार 152 गुन्हेगारांना तपासण्यात आले, त्यातील 50 जण सापडले. रेकॉर्डवरील व इतर 57 गुन्हेगार तपासले असता 20 गुन्हेगार आढळून आले. वॉरंट बजावण्यात आलेल्या 29 आरोपींपैकी 02 आरोपी मिळाले. तसेच 22 संशयितांवर कारवाई करण्यात आली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणाऱ्या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालवणाऱ्यांना तपासण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागांमध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहीम राबविली. मिळालेल्या 279 गुन्हेगारांपैकी 77 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 68, 69 प्रमाणे कारवाई करण्यात आली. 113 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 आरडब्ल्यू अंतर्गत कारवाई करण्यात आली. 76 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 110,112, 117 अंतर्गत कारवाई करण्यात आली. 102 प्रमाणे 10 तर मुंबई प्रोव्हिजन ऍक्ट कलम 85 (1) प्रमाणे 03 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. या अचानक राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा काही प्रमाणात दरारा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
- दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खडकी पोलिसांनी शिताफीने सापळा रचुन अटक केली तर तिघे मात्र फरार झाले. गुरुवारी रात्री त्रिकोणी गार्डन येथे या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. अटक आरोपींकडुन पोलिसांनी धारदार शस्त्रे व दरोड्यास लागणारे साहित्य जप्त केले.
अरबाज समीर खान (वय20), शहादाब रहमत खान (वय-23दोघे रा. जुना बाजार खडकी) तसेच दाऊद दिलावर शेख (वय-21, रा. इंदिरानगर वसाहत खडकी) यांना अटक केली असुन त्यांचे सहकारी अल्तमेश उर्फ पापा शब्बीर कुरेशी (रा. कासारवाडी ) इसाक हकीम शहा (रा. शादलबाबा दर्गा शेजारी येरवडा) व एक अल्पवयीन हे पोलिसांच्या हातुन पसार झाले. त्यांचा पोलिस कसुन शोध घेत आहेत. घटनेची माहिती याप्रमाणे बिट मार्शलचे पोलिस कर्मचारी माटे व साळवी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत अशी खबर मिळाली की काही लोक हत्यारांसह त्रिकोणी गार्डन नेहरुरोड येथिल पाण्याच्या टाकी खाली जमले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक ठाकुर पोलिस उप निरिक्षक महाडीक हे पोलिस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी पोहचल. सापळा रचुन अरबाज शहादाब व दाऊदला जेरबंद केले तर रेकॉंर्डवरील अट्टल गुन्हेगार कुरेशी शहा व एक अल्पवयीन हे पोलिसांच्या हातुन निसटले. पोलिसांनी त्यांच्या कडील तलवार, रॅंम्बो चाकु, तिन मोबाईल, स्क्रुड्रायवर, बनावट नंबरप्लेट व गुंगीचे औषध असे 6 हजार 650 रुपये किंमतीचे ऐवज साहित्य जप्त केले. फौजदार शिवाजी भोसले अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002