Breaking News

पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे |
V. S. News
भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून ज्येष्ठाला मारहाण

व्हीएस न्युज - बेपत्ता विवाहितेच्या चौकशीसाठी तिच्या वयोवृद्ध वडिलांना भोसरी पोलीस ठाण्यात बोलावून सर्व नातेवाईकांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

वयोवृध्द इसमाला मारहाण करणाऱ्या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षकाचे नाव विकास देशमुख असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरुवारी (दि. १३) एक विवाहित महिला एक वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली होती. सगळीकडे शोधाशोध करूनही महिला सापडत नसल्याने सासरच्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या वडिलांना गावी देखील याबाबत कल्पना देण्यात आली. वडिलांनी देखील सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती मिळून आली नाही.

या प्रकरणाच्या तपासासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक विकास देशमुख यांनी महिलेच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी महिलेचे वडील नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आल्यानंतर देशमुख यांनी त्यांना कोणावर संशय आहे का, असे विचारले. त्यावर त्यांनी महिलेचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध असून त्याच्यासोबत गेल्याचा संशय वाटत असल्याचे सांगितले. ही माहिती देताच ही माहिती एवढ्या उशीरा का सांगितली म्हणत देशमुख यांनी बेपत्ता महिलेच्या वडिलांना मारहाण केली. तसेच बारा तासांच्या आत मला महिला आणि तिचा मुलगा इथे पाहिजे असे सांगून त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून काढले. या घटनेमुळे सर्वच स्थरातून संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना विचारले असता त्यांनी, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. मात्र याप्रकरणी वडिलांनी सुरुवातीला ही माहिती देणे अपेक्षीत होते. ती दिली नाही म्हणून त्यांच्यावर थोडा दबाव आणल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र संबंधीत अधिकाऱ्याने मारहाण केली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.

...Read More

V. S. News
नेहरुनगरमध्ये दुचाकी घेऊन देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

व्हीएस न्युज - दुचाकी घेऊन देतो असे सांगून एका महिलेकडून कागदपत्रे आणि २८ हजार ६०० रुपये घेऊन तिला दुचाकी घेऊन न देता तिघाजणांनी मिळून फसवणूक केली. ही घटना मंगळवार (दि.१३ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.४ डिसेंबर) दरम्यान नेहरुनगर येथील राजीव गांधी शाळे शेजारील इमारतीमध्ये घडली.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेचे बंधू अभिशेक सुभाष पाटील (वय २१, रा. वारंगवाडी रोड, डी.वाय.पाटील कॉलेज आंबीगाव तळेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेंद्र सुरेश जैसवाल (रा. राजीव गांधी शाळेशेजारील पांढऱ्या रंगाची इमारत, रुम नं.३, नेहरुनगर, पिंपरी) आणि त्याचे इतर दोघा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१३ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.४ डिसेंबर) या दरम्यान फिर्यादी अभिषेक यांच्या बहिणीला आरोपी महेंद्र आणि इतर दोघा आरोपींनी नवी दुचाकी घेऊन देतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांचे घरभाडे अॅग्रीमेंट, आधार कार्ड आणि पॅनकार्ड घेतले. त्यानंतर एकूण २८ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून घेऊन त्यांना दुचाकी घेऊन न देता त्यांची फसवणूक. आरोपींनी महिलेचे पैसेही परत केले नाही तसेच देलेल्या कागदपत्रांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केला.

याप्रकरणी महेंद्र आणि त्यांच्या दोघा साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून अटक करण्यात आलेले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
विजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील

व्हीएस न्युज - तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्यांच्यात सकारात्माक सक्षमता निर्माण करण्यानची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी दिली. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून प्रतिबंधात्मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्येच भांडणे लागावीत हाच त्यांचा हेतू असतो, अशा शक्तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे.

प्रत्येेक नागरिक हा ‘पोलीस’ असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्यांना काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले. प्रारंभी विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

...Read More

V. S. News
तरुण पिढीला अध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागावी – आर. के. पद्मनाभन

मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवास उत्साहात सुरुवात

व्हीएस न्युज - आत्ताची तरुण पिढी काहीशी भरकटत चालली आहे. त्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवायला हवा. तसेच त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागायला हवी. त्यामुळे संस्कृतीचा विकास होईल, असे मत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केले. महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५७ वा संजीवन समाधी महोत्सवास सोमवारी (दि. १७) सुरुवात झाली. महोत्सवाचे उदघाटन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी आयुक्त ते बोलत होते.

यावेळी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, विश्वस्त विनोद पवार, अॅड. राजेंद्र उमाप, आनंद तांबे, विठ्ठल भोईर, विघ्नहरी देव महाराज, विश्राम देव, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “माझी आजवर सर्वात जास्त पोलीस सेवा तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात झाली. तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात काम करताना संस्कृती आणि अध्यात्माचे वातावरण असलेले जाणवते. त्यातून मलाही काही प्रमाणात अध्यात्माची गोडी लागली आहे. आताही पिंपरी चिंचवड शहराचा पहिला पोलीस आयुक्त म्हणून मोरया गोसावी नगरीची सेवा करताना आनंद होत आहे.

आपण प्रत्येकजण आपल्या समाजाला अध्यात्मिक देणे लागतो. तो वसा मोरया गोसावी देवस्थान समर्थपणे पार पाडत आहेत, असे हेमलता काळोखे म्हणाल्या. उपस्थितांच्या हस्ते २०१९ च्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक विश्राम देव यांनी केले. आभार आनंद तांबे यांनी मानले.

...Read More

V. S. News
शाळेतून हरवलेल्या ६ वर्षीय मुलीचा दोन तासात शोध

व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका हरवलेल्या चिमुकलीला अवघ्या दोन तासात शोधून काढले आहे. गेल्या आठ दिवसात पोलिसांनी हरवलेली मुले शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. ही घटना ताजी असताना रविवारी दिघी परिसरातून सहा वर्षीय ईश्वरी राम भागवत शाळेच्या परिसरातून हरवली होती. तिचा अवघ्या दोन तासात दिघी पोलिसांनी शोध घेतला.

याच आठवड्यात १० वर्षीय मुलगा घरातून निघून गेला होता, त्यानंतर आई वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मात्र मुलगा हा आपल्याच परिसरात मित्रांसोबत फिरत होता. तर शुक्रवारी भोसरी परिसरातून साडेचार वर्षीय मुलगी खेळता-खेळता घरातून निघून गेली होती. तिला शोधण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती.

दरम्यान, दिघी परिसरातल्या मोजे शाळेत ईश्वरीची आज सकाळी चित्रकलेची परीक्षा होती. साडेदहा वाजता परीक्षा संपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे शाळेच्या बाहेर येऊन थांबली. परंतु, आज रविवार असल्याने तिला घ्यायला बस येणार नव्हती. ईश्वरी अर्धा किलोमीटर पुढे निघून गेली. तिला रस्ता समजला नाही.

अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने तिचे वडील राम भागवत हे शाळा परिसरात ईश्वरीला घेण्यासाठी आले. परंतु ईश्वरी कुठेच दिसत नव्हती. सर्व मुले शाळेतून निघून गेली होती. वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र ईश्वरी सापडली नाही. तब्बल एक तास तिचा शोध सुरू ठेवला. अखेर दिघी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी वडील राम हे गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लावंड, पोलीस अधिकारी अशोक तरंगे, महिला पोलीस अधिकारी कदम यांच्या पथकाने ईश्वरीचा शोध घेण्यासाठी ३ अधिकारी आणि १२ कर्मचारी कामाला लावत स्वतः शोध घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली. दुपारी एकच्या सुमारास दिघी पोलिसांना ईश्वरीला शोधण्यात यश आले. ईश्वरी साई पार्क परिसरात सापडली. ईश्वरीला पाहताच आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

पालकांनी सतर्क राहावे

पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गेल्या आठ दिवसात मुले शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले, तर अशा घटना टाळता येतील.

स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त

...Read More

V. S. News
‘मुळशी पॅटर्न’ पाहताना कुख्यात गुंडाला पुण्यातील थिएटरमधून अटक

व्हीएस न्युज - गुन्हेगारी विश्वावर आधारीत ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा सुरु असताना पोलिसांनी पुण्याच्या मंगला थिएटरमधून कोल्हापूरातील एका कुख्यात गुंडाला अटक केली. थिएटरच्या स्क्रीन नंबर ३ मध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाचा खेळ सुरु असताना रात्री ११.३०च्या सुमारास पोलीस थिएटरमध्ये शिरले. चित्रपटाचा खेळ थांबवून लाईट सुरु केल्या व मॅनेजरच्या मदतीने त्या गुंडाला ताब्यात घेतले.

उमेश भाऊसाहेब अरबाळे (२६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कोल्हापूर इंचलकरंजीचा राहणारा आहे. हत्या, दरोडा, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तो हवा होता. शनिवारी रात्री कोल्हापूर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना संशयित गुन्हेगार शहरामध्ये असल्याची माहिती दिली.

हर्षवर्धन ठाकूरदेसाई यांच्या हत्या प्रकरणात उमेश भाऊसाहेब अरबाळे तिसरा गुन्हेगार आहे. ११ डिसेंबरला सहा जणांनी मिळून ठाकूरदेसाई यांची हत्या केली. उमेशही त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होता. हत्या केल्यानंतर पुण्यामध्ये लपून बसला होता. चित्रपटगृहावर धाड टाकून अशा प्रकारे अटकेच्या केलेल्या कारवाईमुळे चित्रपट पाहणाऱ्या अन्य प्रेक्षकांना त्रास झाला नाही. काही मिनिटांमध्ये आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस बाहेर निघाले असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

...Read More

V. S. News
पुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक

व्हीएस न्युज - पुणे दहशतवादी विरोधी पथकाने एका संशयित दहशतवाद्याला चाकण परिसरातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित हा स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असल्याचे समजते.

हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय ४२, मुळ रा. रोपर, पंजाब, सध्या रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुणे दहशतवादी विरोधी पथकाने अतिशय गुप्तपने हरपालसिंग याला रविवारी (दि.२ डिसेंबरला) चाकण येथून अटक केली. यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुस ही जप्त करण्यात आले.

सोमवारी (दि.३ डिसेंबरला) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी (दि.१०) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशतवाद्यांची टोळी बनवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या तयारीत होता. तो इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करुन देशातील तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास भडकवत होता. तसेच दहशतवादी कारवायांसाठी तो सोशल मीडियाचा वापर करुन शस्त्र जमवण्याचे काम ही करत असल्याचे समोर आले आहे.

पुणे दहशतवादी विरोधी पथकाला हरपालसिंग हा पाकिस्तान आणि विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय आहे. तसेच पंजाबच्या सरहद पोलीसांनी मोईन नावाच्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. लवकरच पुढील कारवाईसाठी पुणे दहशतवादी विरोधी पथक त्याला ताब्यात घेणार आहेत.

...Read More

V. S. News
‘एक दिवस उद्यानात’ उपक्रमांतर्गत सहलीत विद्यार्थ्यांनी केली धमाल

व्हीएस न्युज - विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लीटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने आयोजित केलेल्या ‘एक दिवस उद्यानात’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी धमाल केली. तसेच निसर्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधीही दवडली नाही.

शाळेच्यावतीने दरवर्षी एकदिवसीय सहलीचे आयोजन केले जाते. यंदा जुनी सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांची सहल नेत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. एवढेच नाही तर शिक्षकांकडून गोष्टी ऐकूण घेण्याची संधीही विद्यार्थ्यांनी सोडली नाही. विद्यार्थ्यांनीही मुखोद्गत असलेल्या गोष्टी सर्वांना ऐकविल्या. विद्यार्थ्यांनी योगा केला, गाणी गायली. मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी विद्यार्थ्यांसाठी कृतियुक्त शब्दांचा खेळ घेतला. विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत धमाल केली.

शिक्षिका राजश्री..... आणि अंजुम पिरजादे यांनी विविध गाणी गात विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थी शुभम घोरपडे आणि कुणाल साळवी यांनी कार्टूनची वेषभूषा करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत आणि मनोरंजन केले. निसर्गाच्या अगदी जवळ जात निसर्गाची विविध रूपे विद्यार्थ्यांनी अनुभवली. आपण राहत असलेल्या जवळच्या परिसराची मिळालेली माहिती आपल्या स्मरणात ठेवून विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकप्रकारे मैत्री केली असल्याचेच यावेळी जाणवत होते.

शाळेच्या शिक्षिका, तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत सहकार्य केले. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, राजश्री येन्गुन्दूल, अंजुम पिरजादे आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

...Read More

V. S. News
रामदास आठवलेंवरील हल्ल्याचा निषेध; पुण्यात रस्ता रोको

व्हीएस न्युज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा निषेध नोंदविण्यात आला. पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आला. मुख्य चौकातील वाहतूक अडवल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.

यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, रामदास आठवले यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून त्याचा पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो. रामदास आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणीही धेंडे यांनी यावेळी केली. तर ‘मी लोकप्रिय नेता असल्याने कदाचित कोणीतरी एखाद्या मुद्द्यावरुन नाराज असेल त्यामुळे माझ्यावर हल्ला केला असावा, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. तर याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. या प्रकारानंतर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी गोसावीला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.

...Read More

V. S. News
पिंपरी व आकुर्डी न्यायालयात शेकडो खटले निकाली

व्हीएस न्युज - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ८) पिंपरी न्यायालयात व आकुर्डी मनपा न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो खटले निकाली काढण्यात आले. आकुर्डी न्यायालयामध्ये न्यायाधिश मे. माधुरी खनवे यांच्या हस्ते उदघाटन झाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार होते. तसेच आकुर्डी न्यायालय लोकन्यायालयाचे उदघाटन ज्येष्ठ विधीतज्ञ सोपान माने यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा अॅड. मनीषा महाजन होत्या. यावेळी पिंपरी न्यायालयातील प्रभारी मुख्य न्यायाधीश एस. जी. अग्रवाल, सहन्यायाधीश ए.यु. सुपेकर व सह न्यायाधीश एन. टी. भोसले, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड.गोरख कुंभार,महिला सचिव अॅड. स्मिता लांडे पाटील,सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर अॅड.महेश टेमगिरे, सदस्य अॅड.निलेश ठोकळ,अॅड. सुनील रानवडे, अॅड. पुनम राऊत, अॅड.केशव घोगरे, अॅड.विलास कुटे,अॅड.सुनील कड, अॅड.सुदाम साने , अॅड. सुरज खाडे, अॅड.पद्मावती पाटील, अॅड. निखील बोडके,अॅड. किशोर आरडकर, अॅड. गणेश राऊत, अॅड.संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, न्यायालयाबाबतीतील सर्व प्रश्न सोडविण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वपरीने मदत करेल अशी हमी दिली. पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुनील कडुसकर यांनी पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत असे आवाहन केले.

पॅनल परिक्षक म्हणून अॅड. सागर आडागळे,अॅड. जयश्री कुटे, अॅड. प्रतीक्षा खिल्लारी,अॅड. संगीता कुशालकर, अॅड.मनाली सावंत,अॅड. दिलीप शिंगोटे, अॅड. मोनिका गाढवे,अॅड. शिवाजी महानवर, यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. गोरख कुंभार यांनी केले तर आभार अॅड. महिला सचिव अॅड. स्मिता लांडे यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड : वडमुखवाडीत गळा चिरून तरुणाचा खून

व्हीएस न्युज - वडमुखवाडीत एका हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ :३० च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर गवळी (वय २० रा. नानाश्री हाॅटेल, वडमुखवाडी) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी शेखर बाळासाहेब दींडे (वय ३२ नानाश्री हाॅटेल, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजू सखाराम पावडे (वय १९) अनिकेत मानसिंग राजपूत (वय २३) आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गवळी हा आचारी म्हणून वडमुखवाडीतील नानाश्री हाॅटेलमध्ये कामगार होता. गुरुवारी रात्री ११:३० सुुमारास जेवताना किरकोळ वादातून ज्ञानेश्वर चे आरोपी राजू पावडे अनिकेत राजपूत यांच्या बरोबर भांडण झाले. यामुळे रागाच्या भरात एकाने लोखंडी सळई (राॅड) ज्ञानेश्वर च्या डोक्यात घातली. डोक्यात गंभीर झाल्याने ज्ञानेश्ववर हा जागेवरच मयत झाल्यामुळे आरोपींनी प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने धडापासून शीर वेगळे केले. माञ शरीराचे तुकडे करण्यासाठी वेळ नसल्यामुळे घाबरून त्यांनी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

दिघी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!