Breaking News

पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे |
V. S. News
देहूरोड परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी

व्हीएस न्युज - गेल्या वर्षभरात देहूरोड परिसरातून मोबाईल फोनची जबरीचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मयुर सुनिल महाजन (वय १९, रा. त्रिवेणीनगर तळवडे) व त्याचा अल्पवयीन साथीदार आणि अविनाश प्रकाश लोखंडे (वय २०, रा. विष्णु समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी देहूरोड व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना पोलीसांनी सापळा रचून देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय ३१ रा. सध्या साई मंदीरामागे, वेणूनगर वाकड) याला त्याच्या मुळ गावातून आंबेजोगाई, जिल्हा बिड येथून पोलीसांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून विविध कंपन्यांचे एकूण १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम न पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रविण दळे, फारूक मुल्ला, मयुर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांनी केली.

...Read More

V. S. News
मृत्यू दाखल्यासाठी ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिका शिपायाला पकडले

व्हीएस न्युज - ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.

महेश आनंद जातेगावकर (वय ४२, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रस्ता) असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. तक्रारदार जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिपाई जातेगावकर याने तक्रारदाराकडे ८०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारादाराने तडजोडीत ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

ससून रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेताना जातेगावकरला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
ज्ञानदीप बालकाश्रमातील अनाथ मुलांन सोबत यूथ आयकॉन ग्रुप ने केले नविन वर्षाचे स्वागत.

व्हीएस न्युज - यूथ आयकॉन या ग्रुपने दिघी परिसरातील विश्वशांती सामाजिक प्रतिष्ठाण संचलित ज्ञानदीप बालकाश्रमातील अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांना वही ,पेन ,पेन्सील इ. शैक्षणिक साहित्याचे तसेच खाऊचे वाटप करून व केक कापून नववर्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आले.

नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे, काय-काय धमाल करायची याचे नियोजन एक महिना पूर्वीच करण्यात येते. हॉटेल, कॅफे, पब, डिस्को आणि अशा ब-याच ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्याचे वेड आजच्या तरुणाईला आहे. पण चकाकत्या दुनियेत अनाथ बांधवांसोबत नवीन वर्ष साजरा करणारे क्वचितच मिळतात.

अनाथ मुलांच्या मनात अनाथाची भावना न राहता आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशातून अशा अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले . डॉल्बी , फटाके, हॉटेल, पार्टी आणि इतर आरास करत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा ट्रेंड सुरु असताना अनाथ मुलांसोबत नव वर्ष साजरा करणे खरचं कौतुकास्पद कामगिरी आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

यूथ आयकॉन ग्रुप चे प्रसाद माने , विकास सुर्यवंशी, सुनिल कुरंदळे, छाया सुपेकर, रामकृष्ण जोशी , शुभम पिंगळे , मुकेश वाघमारे ,अक्षय कदम, शुभम लांडगे, पुजा दामले , मनिषा आघाव , निखिल जामदार , अंजली पोटे , सिद्धांत डोळस, देवयानी यादव, ओंकार शिंदे, श्रवण पाटील आदी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांसमोर नवीन आदर्श घालून दिला आहे.

सहभागी झालेले सर्व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे , कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

...Read More

V. S. News
हिंजवडी : सुसगाव येथील कबीला हॉटेल मालकाकडून तरुणीशी गैरवर्तन, जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण.

व्हीएस न्युज – 31 डिसेंबर म्हणजेच न्यू इयर पार्टी करण्यासाठी आलेल्या तरुणीशी हॉटेल मालकाने आणि त्याच्या मित्रांनी असभ्य वर्तन केले. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 1) पहाटे बाराच्या सुमारास सुसगाव येथे घडली.

वैभव मधुकर प्रभाकर (वय 23, रा. औंधरोड, स्नेहल अपार्ट, खडकी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कबीला हॉटेल चा मालक चांदेरे, त्याचा मित्र पप्पू व सौरभ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत 31 डिसेंबरला रात्री पार्टी करण्यासाठी सुसगाव येथील कबीला हॉटेलमध्ये आले होते. मध्यरात्री 12 च्या सुमारास काही अनोळखी इसमांनी वैभव यांचा मित्र इमाद यांच्या मैत्रिणीला जाणीवपूर्वक धक्का मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी वैभव गेले. त्यावेळी हॉटेल मालक चांदेरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून वैभव यांना बांबूने, कमरेच्या पट्ट्याने व लोखंडी पंचने मारले. यामध्ये वैभव जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नंग्या टाकल्या, परवाना परत बहाल करायचे दिले तोंडी आश्वासन - युवराज दाखले.

व्हीएस न्युज - महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे हे भ्रष्टाचारी यंत्रणांना पाठीशी घालीत असून, या भ्रष्टाचारी यंत्रणांचे मूळ हे संजय ताकसांडे आहेत. ताकसांडे यांनी सूडबुद्धीने शिवसेना नियुक्त विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांचे ‘न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना रद्द केलेला आहे.

तो त्वरित सौंदणकर यांना परत करावा, अन्यथा महावितरणाच्या प्रशासनास काळे फासण्यात येईल, असा इशारा तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिला होता.

याची दखल घेत गुरुवार (दि. २७) रोजी महावितरणाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधिक्षक अभियंता राजेश पवार व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषनस्थळी संतोष सौंदणकर यांची भेट घेतली. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी आपल्या मागण्यांची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल व न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना परत करण्याचे आश्वासन सौंदणकर यांना दिले आहे. आश्वासनाची दखल घेत सौंदणकर यांनी उपोषण सोडले आहे.

महावितरणाने तात्काळ सौंदणकर यांना परवाना परत करावा व यामागे खरे सूत्रधार यांना उजेडात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे युवराज दाखले यांनी महावितरण प्रशासनास दिला आहे.

...Read More

V. S. News
भोसरी येथून वसुली करणार्‍या तोत्या पोलीस निरीक्षकाला अटक.

व्हिएस न्युज – गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. 26) घडली.

राजेंद्र मोहन पाटेकर (वय 55, रा. वैजयंती निवास, संत तुकाराम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजेंद्र ने सोपा आणि भरमसाठ पैसा कमावण्यासाठी पोलीस निरीक्षक बनण्याची शक्कल का लढवली असेल? नेमकं काय आले असेल राजेंद्र च्या मनात आणि त्याने का मारली असेल तोत्या पोलीस निरीक्षक बनून वसुली करण्याची मजल? हॉटेल व्यावसायिक का आणि कशासाठी पोलिसांना फुकट जेवण देतात?पान टपरी वाला बेकायदेशीर गुटखा विक्री तर नसेल ना? खरेखुरे पोलीस तर अश्या प्रकारे वसुली तर करत नसतील ना? अनेक प्रश्नांना वाचा फोडणारी हि घटना आहे.

नागरिकांच्या मनातला पोलिस हा कसा आहे हे या घटनेतून निदर्शनात येते आणि पोलिसांची नागरिकांच्या मनात असलेल्या छावीचा गैरफायदा घेऊन राजेंद्र तोत्या पोलीस निरीक्षक झाला? .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, पान टपरी यांना आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. हॉटेलमध्ये फुकट खाणे, किराणा दुकानदार, पान टपरी चालक व इतर व्यावसायिकांकडून पैसे उकळत होता. आरोपीवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त आर के पद्‌मनाभन, अपर आयुक्‍त मकरंद रानडे, सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलिस कर्मचारी दीपक खरात, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
हिंजवडी : बावधन येथे आढळा अनोळखी मृतदेह, दगडाने ठेचून निर्घृण केला खून.

व्हीएस न्युज - बावधान येथे पुणॆ मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.

मृतदेहांची ओळख पटली नाही. खून झालेल्या व्यक्ति व्यक्तीचे अंदाजे वय ४५-५० वर्षे आहे. चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पँन्ट असा पोषाख आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावधान येथे पुणॆ मुंबई महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर बुधवारी सकाळी एक व्यक्ति मृत अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांकडून माहीत मिळताच पोलीस पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. खून झालेली व्यक्ति कामगार असल्याची शक्यता वार्तावलि जात आहे.

...Read More

V. S. News
बाणेर येथून महिलेचे तब्बल पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र हिसकावून नेले

व्हीएस न्युज - दूचाकीवरून जाणा-या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना काल मंगळवारी (दि.25) आठच्या सुमारास बाणेर रोड वरील युनियन बॅंकेपुढे घडली.याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलीसह बाणेर येथून त्यांच्या दुचाकीवर धनुकडे वस्तीच्या मार्गाने त्यांच्या घरी जात होत्या.दरम्यान पाठीमागून दूचाकीवर दोघेजण आले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे पावणे 2 लाखांचे मंगळसुत्र जोरदार हिसका मारून चोरून नेले.याप्रकरणी दोन अज्ञात दूचाकीस्वारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:श्रुंगी पोलीस करत आहेत.

...Read More

V. S. News
महापालिका इमारत रंगीत एलईडींनी लखलखणार

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याअंतर्गत रंगीत एलईडी दिव्यांचा वापर करून रंगीबेरंगी प्रकाशयोजना केली जाणार आहे. त्याकरिता 33 लाख 40 हजार 135 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील विकास कामे करताना उभारले जाणारे पूल, इमारती व उद्याने सर्वसामान्यांचे आकर्षण ठरू शकेल, यासाठी स्थापत्य व विद्युत विभागाच्या वतीने त्याची सजावट केली जाते. महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेला भारतरत्न जे. आर. डी. टाटा हा दुमजली उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर घालतो. हा उड्डाणपूल आणखी आकर्षक व्हावा, यासाठी या पुलाला रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंग बदलत्या दिव्यांचे प्रकाशझोत शहरवासियांबरोबरच याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. याशिवाय रावेत येथील बास्केट ब्रीज खास तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. पिंपरी महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असून, दररोज लाखो प्रवाशांची या महामार्गावरून ये-जा होत असते. या इमारतीचे काही वर्षांपूर्वी विस्तारीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय सण, महापालिका वर्धापन दिन अशा विविध प्रसंगी या इमारतीला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे ही इमारत कायम नागरिकांचे आकर्षण ठरावे, याकरिता इमारतीला एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्याकरिता सुमारे 34 लाख रुपये खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीबद्दल शहरावासियांबरोबरच याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कायम कुतूहल असते. त्यामुळे अशाप्रकारची विद्युत रोषणाई केल्यास, ही इमारत शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालणार आहे.

– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड.

...Read More

V. S. News
‘आमिर, नसीरुद्दीन यांनी भारत सोडून निघून जावं’ – शंकर अभ्यंकर

व्हीएस न्युज - नसीरुद्दीन शाह म्हणतात देशातलं वातावरण पाहून मला मुलांची चिंता वाटते. मागे एका कार्यक्रमात आमिर खान म्हटला होता की त्याच्या पत्नीला हा देश असुरक्षित वाटतो. या दोघांनी खुशाल देश सोडून निघून जावं असा सल्ला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी दिला आहे.

पुण्यात भाजपा संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद यांच्यातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हिंदी कवितांवर आधारीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांनी हे मत मांडलं. याच कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्काने गौरवण्यात आले.

नसीरुद्दीन शाह यांनी देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. देशात माणसाच्या मृत्यूपेक्षा गायीच्या मृत्यूला जास्त महत्त्व आहे असे त्यांनी म्हटले त्यावरून वाद सुरु असतानाच आता शंकर अभ्यंकर यांनी नसीरुद्दीन शाह आणि आमिर खान या दोघांनाही देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे.

ज्यांना हा देश असुरक्षित वाटत असेल त्यांनी या देशाचा इतिहास तपासावा. देशाच्या राष्ट्रपतीपदावरही मुस्लिम व्यक्ती होते हे विसरु नये असेही शंकर अभ्यंकर यांनी सुनावले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याही आठवणींवर भाष्य केलं. अनेक वर्षे राजकारणापासून दूर राहूनही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षात ठेवले गेले. ही बाब महत्त्वाची आहे असेही अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारण करताना कायमच सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवले. सत्तेच्या उच्च पातळीवर असताना ही निरागस जाणीव ठेवणारे असे ते राजकारणी होते असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

...Read More

V. S. News
पसार परवाना नसताना बेकायदेशीर रित्या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनवर कायदेशीर कारवाई करा - युवराज दाखले.

व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात पसार परवाना नसताना सर्रासपणे बेकायदेशीर रित्या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तिरोडा-गोरेगाव चे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तांना मंगळवारी केली.

निवेदनात दाखले म्हणतात की " सुरक्षारक्षक एजन्सी कडून पोलिस पडताळणी न करता सुरक्षारक्षक पुरवले जातात, कामगारांना पगार वेळेवर दिला जात नाही व काही घरगुती कारणामुळे सुरक्षारक्षक कामावर रुजू नसल्यास त्याला कामावरून कमी करण्यात येते आणि कामगारांनी पगार मागितल्यास त्याला मारहाण करून शास्त्राच्या धाक दाखवने व स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

प्रविण फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (निगडी पुणे) या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपनीकडे पसारा परवाना नसल्याचा या तक्रार अर्जात उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना काही दुष्काळी भागातील कामगार जे पोटाची खळगी भरण्यासाठी सुरक्षारक्षकाचे काम करतात अश्यांना न्याय द्यावा आणि बेकायदेशीर सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई येत्या आठ दिवसात करावी व कारवाई केल्याचा अहवाल सादर करावा अन्यथा अन्यायग्रस्त सुरक्षारक्षक घेऊन निदर्शने करू असा इशारा दाखलेंनी दिला.

...Read More

V. S. News
कचरा गोळा करण्यासाठी महापालिका आकारणार दरमहा शुल्क; ‘असे’ आकारले जाणार शुल्क

व्हीएस न्युज -पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार 19 डिसेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 8 एप्रिल 2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 जारी केला आहे. दुकानदारांकडून दरमहा 90 रुपये, शोरूम, गोदामे, उपहारगृह आणि हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 120 रुपये, हॉटेलसाठी दरमहा 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 50 खाठापेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा 120 रुपये आणि 50 हून अधिक खाठा असलेल्या रुग्णालयासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

शैक्षणिक, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा 90 रुपये, मंगल कार्यालयांना दरमहा 300 रुपये आणि फेरीवाल्यांकडून 180 रुपये शुल्क दरमहा घेतले जाणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास पहिल्यांदा 60 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यावेळी चूक केल्यास 120 रुपये आणि तिसऱ्यांदा चूक केल्यास 180 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

त्यांनतर प्रत्येक चुकीसाठी 180 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा चूक केल्यास दहा हजार आणि तिसऱ्यावेळी चूक केल्यास 15 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी 15 हजार रुपये दंड असणार आहे. तसेच कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!