Breaking News

पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. |
V. S. News
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई पुरंदरे प्रदीर्घ आजाराने निधन

व्हीएस न्युज - ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी गेली चार दशके काम केलेल्या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई बळवंत पुरंदरे (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, तर पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदिशक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

निर्मलाताई यांचा जन्म ५ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्या माहेरच्या माजगावकर. ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांच्या त्या भगिनी होत. पुरंदरे यांनी पुणे जिल्ह्य़ातील आयआयएम ट्रस्टच्या माध्यमातून फुलगाव येथे निराश्रित विद्यार्थ्यांसाठी बाल सदनाची स्थापना केली होती. गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेडय़ा-पाडय़ांतील अनेक हातांना एकत्र बांधले. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून त्या थांबल्या नाहीत, तर तिथे शिकविण्यासाठी शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी तेथील महिलांसाठी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच वनस्थळी संस्थेचे कार्य विस्तारले. तसेच हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारल.

त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला चांगलीच परिचित आहे. डॉ. अच्युतराव आपटे यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सहायक समितीमध्ये निर्मलाताई सुरुवातीपासूनच सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठय़ा शहरांमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. स्नेहयात्रा हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रसिद्ध आहे.

...Read More

V. S. News
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान

व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा (Sports Medicine) विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयक एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी २०१७- १८ चा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कॉमनवेल्थ गेम २०१७ चा सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष पंढरीनाथ काळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्नल डॉ. दीप शर्मा, प्राध्यापिका डॉ. करुणा दत्ता, आदी उपस्थित होते.

कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी खडतर परिस्थितीतीवर मात करून कुस्तीला नवेस्थान निर्माण करून दिले. त्याच्या यशस्वी कारकीर्दीचा आढावा डॉ. डी. एस. भामरे विभाग प्रमुख क्रीडा चिकित्सा यांनी दिला. खेळाडूच्या आरोग्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभागामध्ये क्रीडा चिकित्सा बाह्यरुग्ण विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे. याचा फायदा खेळाडूना नक्कीच होईल. खेळाडूनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी केले. "

कुस्तीपटू उत्कर्ष काळे ने कुस्तीत केलेल्या यशस्वी कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याला पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपले नाव जागतिक पातळीवर झळकत रोहो" असे अधिष्ठाता डॉ भवाळकर यांनी आपल्या मनोगतात म्हंटले.

सदर कार्यक्रम कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील यांचा मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

क्रीडा चिकीत्सा विषयक परिसंवाद कार्यक्रमामध्ये खेळाडूचा आहार, व्यायाम, दिनचर्या, भौतिकोपचार, विविध व्याधी, दुखापती, विविध तपासण्या, योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परीक्षण, क्रीडा सराव आदी घटकांच्या माध्यमातून खेळाडूच्या आरोग्यासाठी आवश्यकते मार्गदर्शन व उपचार का गरजेचे आहेत आणि ते कोणकोणते या प्रमुख उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध तज्ञानी यावेळी मार्गदर्शन केले यामध्ये क्रीडा चिकित्साशास्त्रची व्याप्ती विषयी – डॉ. डी. एस. भामरे, भोतिकोपचार पध्दती - डॉ बासू, खेळाडूचा ताणतणाव व तणावमुक्ती - डॉ आलोख देवधर, आहार मार्गदर्शन - डॉ. सुयश भंडारी, स्पोर्ट्स फिजियोलॉजी - कर्नल डॉ दीप शर्मा, स्पोर्ट्स ऍन्थ्रोपोमेट्री आणि बायोमेकॅनिक्स विषयक - डॉ उर्वशी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉक्टर्स, आहार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, सर्जन व भावी डॉक्टर्स विद्यार्थी असे एकूण १५५ सहभागीर्थी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड : बीव्हीजी ग्रुपच्या मालकाची १६ कोटींची फसवणूक

व्हीएस न्युज - बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. आकर्षक परताव्याच्या आमिषातून कंपनीत १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र त्याचा परतावा किंवा समभाग न देता फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव रामदास गायकवाड (वय ४६, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २६ ते ३१ मार्च २०११ दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी गायकवाड यांना आरोपी जाधव दाम्पत्याने कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दिले. गुंतवणुकीस करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लॅबोरोटिज लिमिटेड, अनघा फार्मा प्रा. लि. या कंपन्यांमध्ये १६ कोटी ४५ लाख चार हजार ३६६ रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख ९५ हजार ३७४ रुपयांची सावा मेडिको लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात एक कोटी ५३ लाख ९५ हजार २३७ रुपयांचे समभाग दिले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता जाधव दाम्पत्याने फसवणूक केली.

अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

...Read More

V. S. News
पुणे:निजेरियन तस्करकडून ८८ लाखाचे कोकेन जप्त.

व्हीएस न्युज - पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८८ लाख रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे. शोलोडॉये सॅम्युअल जॉय (वय-४४ रा. उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.

कपड्यांचा व्यवसाय असल्याचे सांगून तो व्यावसायिक व्हिसावर फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतात आला होता. काही काळ तो मुंबईत राहिला होता. त्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यातील उंड्री परिसरातील रावत कॅप्सस्टोन सोसायटीत एका फ्लॅटमध्ये रहात होता. तो रहात असलेल्या फ्लॅटमध्ये कोकेनच्या छोट्या-छोट्या पुड्या तयार करून त्या उच्चभ्रू वस्तित राहणाऱ्या नशेखोरांना विकत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरक्षीक विजय टेकाळे यांनी पथक तयार करून जॉय याचा शोध घेतला.जॉय अतिशय शिताफीने अमली पदार्थांची तस्करी करत होता,त्यामुळे मागील २० दिवस पोलिस त्याच्या मागावर होते. जॉय रहात असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८७ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन, ३ लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाईल, तीन घड्याळ, वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ९१ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टेकाळे, पथकातील कर्मचारी अविनाश शिंदे, राहूल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरी : मातोश्री ग्रूप आणि शहरातील शिवसैनिकांनी केली मातोश्री वर गुरुपौर्णिमा साजरी

व्हीएस न्युज - गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री निवासस्थानी जाऊन पिंपरी येथील मातोश्री ग्रूप आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले.

या दरम्यान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन तुळशीहार,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी शिवसेना भंडारा गोदिंया जिल्हा संपर्कप्रमूख निलेश धूमाळ, मातोश्री ग्रूप संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, शिवसेना विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर, विभागप्रमूख प्रदिप दळवी,विभागसंघटक अंकुश कोळेकर, बाळासाहेब गायकवाड,जितू कुलकर्णी,मारुती म्हस्के, दत्ता गिरी,सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
फेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हीएस न्युज - फेसबुकवरुन झालेली मैत्री पुण्यातील एका महिलेला जिवावर बेतली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधा अगरवाल (वय-40) असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आनंद निकम (वय-31) याला अटक केली आहे. दोन लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी राधाची हत्या केल्याचे आनंदने कबूल केले आहे.

काय आहे हे प्रकरण?

पुण्यातील रेंज हिल्स भागात आनंद निकमचा चहाचा स्टॉल आहे. आनंदने चार महिन्यांपूर्वी राधा हिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. राधाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री वाढत गेल्याने दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. राधा ही श्रीमंत घरातील असल्याचे आनंदला माहीत होते. त्यात आनंदच्या डोक्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज होते. आनंदचा राधाच्या दागिन्यांवर डोळा होता. कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडून दागिने चोरावे, असा त्याचा प्लान होता.

वर्षा विहारासाठी आपण ताम्हिणी घाटात फिरायला जाऊ आणि फोटो सेशन करु, असे आनंदने राधाला सांगितले. विशेष म्हणजे फोटो चांगले यावेत यासाठी अंगावर भरपूर दागिणे घालून ये, असेही आनंदने तिला सांगितले होते. राधानेही आनंदवर विश्वास ठेवून 22 जूनला राधा हिच्या स्कूटरवरुन दोघे पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटात गेले. तिथे पोहोचल्यावर आनंदने राधाचे फोटो काढायला सुरुवात केली. वेगळे फोटो काढण्याच्या बहाण्याने राधाचे हात झाडाला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर त्याने चाकूने राधाचा गळा कापला. राधाच्या अंगावरील असलेले दागिणे घेऊन तो पसार झाला.

राधा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या 19 वर्षांच्या मुलाने मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी राधाचा कॉल रेकॉर्डची माहिती मिळवून तपास सुरू केला असता तिने शेवटचा फोन आनंद निकमला केल्याचे समोर आले. पोलिसांनी आनंदचा शोध घेतला. पोलिसांनी 11 जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले. आनंदच्या घरातून राधाचा मोबाइल आणि स्कूटर सापडली. आनंदने दिलेल्या माहितीनुसार ताम्हिणी घाटातून राधाचा मृतदेह 12 जुलैला पोलिसांनी ताब्यात घेतला.

...Read More

V. S. News
स्वच्छतेसाठी विनानिविदा कंत्राट; जनजागृतीसाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा पालिकेचा घाट

व्हीएस न्युज - केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान २०२०' अंतर्गत केल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घातला आहे. विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने जनजागृती करण्याचे काम सूरज अॅडव्हर्टायझिंग या खासगी एजन्सीला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. थेट पद्धतीने काम देण्याच्या पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे.

हे काम देताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता वैद्यकीय विभागामार्फत निश्चित केलेल्या दरानुसार हे काम थेट पद्धतीने सूरज अॅडव्हार्टायझिंग या खासगी एजन्सीकडून करून घेतले जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीला २५ लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या 'आरोग्य विषयक शासकीय योजनांची अंमलबजावणी व आरोग्य विषयक जनजागृती' या लेखाशीर्षावरील उपलब्ध तरतुदीतून हा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.

पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हा ठराव मान्य केल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. जनजागृतीसाठी नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करता सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील एजन्सीला हे काम देत सर्वसामान्य नागरिकांकडून कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून केला जात आहे. स्थायी समिती बहुमताच्या जोरावर कामे न करता नियमाप्रमाणे कामे करावी, अशी अपेक्षाही विरोधी पक्षाच्या सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. देशभरात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत असून 'स्वच्छ भारत अभियान २०२०' राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता जागृतीविषयीची घोषवाक्ये, चित्रे, भिंतीवर रंगवून घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फेत दर वर्षी आरोग्यविषयक योजना, वैद्यकीय, आरोग्य, पर्यावरणविषयक जागृती तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसासाठी महत्त्वाचे चौक, सरकारी इमारती, विविध गृहरचना संस्था यांच्या सीमाभिंतींवर यावर वॉल साइन बोर्डाचे (भिंत रंगविणे) कामकाज केले जाते. त्याच पद्धतीने या अभियानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. .

खर्चाला मान्यता देण्यात आलेली कामे -

विविध भागांत विकासकामे करणे - ८७ कोटी

पालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदी : ६ कोटी ४९ लाख

मोशी, देहू, आळंदीत पेव्हिंग ब्लॉक, गटारांचे काम : २९ लाख ४२ हजार

क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांचा भोजन खर्च : १८ लाख

भोसरी, इंद्रायणीनगरमधील स्केटिंग ट्रॅकची कामे : १ कोटी

३० लाख - पिंपळे निलखमधील लिनिअर गार्डन विकसन : १ कोटी

क्षेत्रीय कार्यालतून कचरा गोळा करणे : २५ लाख

शालेय खरेदी - १० कोटी ५० लाख

वैद्यकीय विभागातील फर्निचर खरेदी : ६२ लाख

क्रीडा शिष्यवृत्ती : ६ लाख

...Read More

V. S. News
फिर्याद देताना दोन गटात साने चौक पोलीस चौकीसमोर तुफान हाणामारी; दहा जणांना अटक

व्हीएस न्युज - दारु पिल्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या २५ ते ३० जणांच्या दोन गटात पोलिस चौकीसमोरच तुफान हाणामारी झाली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भिमशक्तीनगर साने चौक पोलीस चौकी समोर घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यु.बी.ओमासे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतिश किसन जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर आणि संदिप भारत डुकळे या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर कैलास गेणबा डुकळे (रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) हा आरोपी अद्याप फरार आहे. या सर्वांविरोधात भा.द.वि.क ३५३,३२३,१४३, १६०, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दारु पिण्याच्या कारणावरुन २५ ते ३० जणांच्या दोन गटात भांडण झाले होते. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास दोनही गटातील लोक हे साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिस चौकीच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर या गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्ती केली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच जमाव बंदीच्या आदेशाचा भंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी वरील दहा जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
तब्बल १०१ किलो गांजा जप्त ; भोसरी पोलिसांची कारवाई

व्हीएस न्युज - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ई क्षेत्रीय कार्यालय शेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला तब्बल १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीच्या १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली.

अतिक युनूस शेख (वय २७, रा. दिल्ली नाका, मोगल टेकडी, ता. संगमनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर) पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील ई क्षेत्रीय कार्यालायशेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
शेळ्या चोरून चालवायचा मटणाचे दुकान; तिघांना केली भोसरी पोलिसांनी अटक.

व्हीएस न्युज - शेळ्या चोरून स्वतःचे मटणाचे दुकान चालवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भोसरी पोलिसांनी दोन साथीदारांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक कार असा एकुण ६ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

अल्तमश कुरेशी (वय- १८) असे मुख्य आरोपीचे नाव असून, सोमेश तायड (वय-१९), रोहन रिठे (वय-२०) सर्व राहणार खडकी बाजार अशी दोन्ही साथीदारांची नावं आहेत. दोन्ही आरोपी महाविद्यालीयन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी अल्तमशचे कासारवाडी येथे मटणाचे दुकान आहे. तो अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. परंतु , तो एक सराईत गुन्हेगार असून त्याने मोटार आणि दुचाकी चोरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरी करताना तो मोटारीत शेळ्या चोरून आणत, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या पाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

दरम्यान, साथीदार सोमेश आणि रोहन यांच्यासह तो नाशिक फाटा इथे चोरीची मोटार विक्रीसाठी आल्याची माहिती समीर रासकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा मोटार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरलेल्या शेळ्या अल्तमशच्या मटणाच्या दुकानात नेऊन हलाल करत आणि तेच मटण ग्राहकांना विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कामगिरी भोसरी पोलिसांनी केली आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी : महाडाच्या बांधकाम साईटवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू

व्हीएस न्युज - महाडाच्या बांधकाम साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करताना क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने एका कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवर घडली. राजकुमार अशोक घोसले (वय २४, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राजकुमार हे क्रेनवर उभे राहून प्लास्टरचे काम करत होते. यावेळी क्रेनचे अचानक ब्रेक फेल होवून ती खाली कोसळली. याबरोबरच राजकुमार ही खाली कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर दोन कामगार देखील जखमी झाले आहेत. सध्या त्यांनी प्रकृती स्थीर आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
सावधान!! पुण्यातील मुठा नदी पात्रात मगर.

व्हीएस न्युज - पुण्यातील नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरात मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी पात्रात उतरू नका. अशा स्वरुपाची सुचना नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून काढण्यात आली आहे. नदीपात्रत मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहराला वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार ही धरणात पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्याने पुणेकर नागरिकाची काही प्रमाणात पाणी संकटातून मुक्तता झाली असताना. ही धरण 100 टक्के भरल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नसताना. धरण क्षेत्रापासून काही किलोमीटर अंतर असलेल्या नांदेड, शिवणे ग्रामपंचायत भागातून जाणार्‍या मुठा नदी पात्रात मगर आढळल्याची घटना घडली आहे.

यावर खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील धरण क्षेत्रात मगर आढळल्याची बाब समोर आली होती. आता यावर प्रशासन नेमकी काय उपाययोजना करते हे पाहावे लागणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!