व्हिएस न्यूज -पिंपरी-चिंचवडमधल्या एका भोंदूबाबाने गुप्त धन मिळवून देतो, पुत्रप्राप्ती होईल अशी आश्वासनं देत पाच बहिणींवर एका भोंदूबाबाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच मुलींवर या भोंदूबाबाने बलात्कार केला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय-३२ रा. खैरेवाडी जि. रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबा चे नाव आहे. त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ याने फिर्यादी यांचे कुटुंबास सांगितले की, तुमच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होवू नये म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर नात्यातील एका महिलेने करणी केलेली आहे. घराच्या एका खोलीत गुप्त धन असून त्यामध्ये सात पेटया धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असा खजिना आहे. तसेच तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी, गुप्तधन मिळविण्यासाठी आणि एका मुलीचा जीव वाचविण्यासाठी मला तुमच्या घरामध्ये तीन उतारे आणि नग्न पूजा करावी लागेल, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या सगळ्यासाठी ३ लाख रुपये खर्च आणि ११ हजार रुपये दक्षिणा दयावी लागेल. तीन उतारे तुम्ही १५ दिवसामध्ये सुरु केले नाही तर तुमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचा जीवाला धोका आहे. असं म्हणून या भोंदूबाबाने पैसे उकळले. कथित त्रास असलेली मुलगी आणि तिच्या बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने हा भोंदूबाबा खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने दार लावून घेतले. त्यानंतर एका मुलीवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास आई वडिलांना माझ्या देवी शक्तीने आणि काळया जादूने मारुन टाकेन अशी धमकी दिली. उतारा काढताना त्याने या मुलीसोबत तीनदा बलात्कार केला. तसंच इतर बहिणींवरही बलात्कार केला असे फिर्यादीने सांगितले आहे. आता याप्रकरणी या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
व्हिएस न्यूज -चालू बाजार मूल्यतक्ता (रेडीरेकनर) दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांची स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी रेडीरेकनरवर भाष्य केले. गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे यंदा हे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुण्यात मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्व भागातील आणि क्षेत्रातील व्यक्तींच्या आकर्षणाचे शहर पुणे आहे. पुण्यातील बांधकामांची संख्या वाढत असून दर्जेदार बांधकामे करण्याचे श्रेय बांधकाम व्यावसायिकांचे आहे. गौण खनिज उत्खनन, मुद्रांक शुल्क तसेच बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही थोरात यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज -पुणे शहरातील विविध भागात मागील सहा महिन्यांमध्ये 25 दुचाकी चोरणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका प्रोफेशनल डान्सरचाही समावेश असून या सर्व आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
संजय हरीष भोसले ऊर्फ सोन्या (वय 20 रा. शेवाळवाडी), हृषिकेश बाबासाहेब डोंगरे ऊर्फ बिटू (वय 19 रा. शेवाळवाडी), अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु (वय 19 रा. नऱ्हे आंबेगाव) आणि अजित कैलास कांबळे ऊर्फ विठ्ठल (वय 21 रा. शेवाळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगरपट्टा चौकात असलेल्या वाहन पार्किंगमध्ये चारजण संशयितपणे फिरत असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चौघेजण गाड्यांची पाहणी करताना दिसले. त्या चौघांकडे चौकशी केली असता, शहरात 25 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. या चोर्या मौजमजा करण्यासाठी केल्या असून यातील आरोपी अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु हा तरुण प्रोफेशनल डान्सर आहे. त्या आरोपीने अनेक स्टेज शो आणि काही माहितीपटांमध्येही काम केले आहे. आरोपींकडे अजून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली केली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करित आहेत.
व्हिएस न्यूज -वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याच त्याचा चांगला परिणाम होणार नाही,” असे सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी पठाण यांना दिले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त व्क्तव्य केलं होतं. या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे.
काय म्हणाले होते वारिस पठाण?
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू,” असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
विश्व हिंदू परिषदेचे उत्तर
पठाण यांच्यावर चहूबाजूने टिका होत असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनेही याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदुना धमकावून परिणाम होणार नाही. इतिहास काळापासून जे काही हिंदू समाजावर संकट आली आहेत. त्याची हिंदू समाज चिंता करायला सक्षम आहे,” असा थेट इशाराच परांडे यांनी वारीस पठाण यांना दिला.
व्हिएस न्यूज - लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून ११ वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० फेब्रुवारी ला ओम ला हरिपाठ आला नाही म्हणून आरोपी भगवान पोव्हणे याने त्याला काठी ने बेदम मारहाण केली. यात फुफ्फुस आणि हृदयाच्या मधोमध मार लागला. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथे कीर्तन असल्याने आरोपी पोव्हणे याने ओमसह सर्व मुलांना घेऊन त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर ओम ची तब्बेत बिघडली. महाराजांनी ओम ची आई कविता यांना फोन वरून मुलाची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले.
तेव्हा, आई तातडीने त्या ठिकाणी गेली आणि मुलाला घेऊन आली. परंतु, प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याच्यावर कविता काम करत असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू केले. तो कोमात गेला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याच्या छातीचा एक्सरे काढण्यात आला त्यात त्याच्या छातीत पाणी झाल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा त्याला पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय. पाटील रुग्णालयात हलवले, त्याच्या छातीतून दोनशे मि.ली पाणी काढण्यात आले आहे. दरम्यान, तो अतिदक्षता विभागात असून ओम कोमात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भगवान महाराज पोव्हणे याच्यांवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला एका सप्ताह मधून अटक करण्यात आली आहे. ओमची प्रकृती बरी व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
व्हिएस न्यूज - जुन्नर परिसरातील हडसर किल्ल्यावर श्री शिवजयंतीनिमित्त दुर्ग स्वच्छता मोहिमेसाठी मुंबईतील एका गटाबरोबर आलेल्या युवतीचा दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. सिद्धी सुनील कामठे (वय २०, सध्या रा. चिंचपोकळी, मुंबई, मूळ रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.
जुन्नरहून तेरा किलोमीटर अंतरावर हडसर किल्ला आहे. हडसर किल्ल्यावर ठाण्यातील सह्य़ाद्री ट्रेकर्स फाऊं डेशनकडून श्री शिवजयंती निमित्त दुर्ग स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. या मोहिमेत गिर्यारोहण संस्थेतील ३५ सदस्य सहभागी झाले होते. गिर्यारोहकांच्या गटात सिद्धी होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गिर्यारोहकांचा गट अवघड अशा पायवाटेवरून किल्ल्यावर जात होता. त्यावेळी गवतावरून सिद्धीचा पाय घसरला आणि काही कळण्याच्या आत ती दरीत पडली.
या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सिद्धीला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.,
व्हीएस न्यूज -पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात भरधाव वेगात असलेली मोटार (व्हॅन) चहाच्या दुकानात शिरली. ही घटना(२०फेब्रु )आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भरधाव वेगातील व्हॅन चालक हा दुचाकीला वाचवताना त्याचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन थेट चहाच्या दुकानात शिरली.
चहा प्यायला थांबलेल्या व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी नाही, परंतु, घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
व्हिएस न्युज - १९ फेब्रुवारी रोजी जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उ्साहात साजरी केली जाते, त्याच प्रमाणे यंदाही मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त काळेवाडी येथील एम.एम. शाळे पासून ते एच.ए. कॉलनी येथे स्तिथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत टू व्हीलर रॅली कडण्यात आली. अनेक शिवप्रेमींनी या रॅली मध्ये सहभाग घेतला.
छञपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या हस्ते पूष्प हार अर्पण करण्यात आला व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर,शहर कार्याध्यक्ष गोरख पाटील, अधिकराव भोसले, बाळासाहेब शिरसाठ, संजय गायके, आभिजीत गोफण, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, महेश गूळगोंडा, दिपक भक्त, माऊली जाधव, विशाल बाविस्कर, नरसिंग माने, प्रदिप दळवी, अंकूश कोळेकर, निलेश भोरे, राहूल कदम, सागर तायडे, बबलू कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - बुद्ध प्रेरणा बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट, पिंपरी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट येथे बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष फारुख सत्तार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली त्यावेळेस पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी व त्यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) राजेंद्र निकाळजे यांना संविधानाची प्रत देऊन अध्यक्ष फारुख सत्तार कुरेशी यांच्या हस्ते त्यांचं सत्कार करण्यात आला.
या वेळी ट्रस्ट चे सचिव ॲड. बी.के. कांबळे, भारतीय जन्मत न्यूज पोर्टल चे डायरेक्टर प्रमोद गरड, संदिपान झोंबाडे, संतोष कसबे व सर्व सभासद उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - कर्जरोखे काढण्याचा उद्योग कोणाच्या भल्यासाठी .. स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने .. पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या मिळकतींना अडीच पट करवाढ आणि प्रतिमाणसी प्रतिदिन चाळीस लिटर पेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या नळजोड धारकांना वाढीव पाणीपट्टी आकारण्याचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावाला शहरातील मिळकतधारकरांचा तीव्र विरोध आहे.ही करवाढ सर्वसाधारण सभेने शंभर टक्के फेटाळावी. अन्यथा मिळकतधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारऱ्या पवना धरणात गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असतानाही आयुक्तांच्या आडमुठपणामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी गळती रोखून बेकायदेशीर नळजोड शोधून त्यावर कारवाई करण्याऐवजी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेच्या मुदत ठेवींच्या व्याजापोटी २०० कोटीहून जास्त रक्कम मिळत असताना कर्जरोखे काढण्याचा उद्योग नेमका कोणाच्या भल्यासाठी करणार आहे. याचे उत्तर करदात्या नागरिकांना मिळाले पाहिजे.( दि. १७ ) सोमवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की,२००७ सालापूर्वीच्या सर्व रहिवाशी ,व्यापारी, वाणिज्य, औद्योगिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना अडीच पट करवाढ करण्यात आली आहे. ही करवाढ गुरुवारी (२० फेब्रुवारी )होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने जरी फेटाळली, तरी मी माझ्या अधिकारात ही करवाढ लागू करेल, आयुक्तांच्या या मनमानीपणाचा तीव्र निषेध शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकात केला आहे. शहरातील नागरिकांना माफक दरात रस्ते,वीज,ड्रेनेज सुविधा,स्वच्छता,कचरा व्यवस्थापन, प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य सुविधा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. शहरामध्ये पाच लाखांहून जास्त मिळकती असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. परंतु अद्यापही हजारो मिळकतींची आणि नळ जोडणींची नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मिळकतधारकांवर आयुक्त अन्यायकारक अडीच पट करवाढ लागू करीत आहे केंद्र सरकारने मागील पाच वर्षात नोटाबंदी,जीएसटी सारख्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचा जीडीपी कमी झाला आहे. त्याचा मुख्यत्वे औद्योगिक पट्ट्यावर जास्त परिणाम झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योजक व कामगारांचे शहर आहे. औद्योगिक मंदीचा परिणाम कामगारांच्या उत्पनावर झाला आहे संथगतीने सुरु असलेल्या विकास कामांमुळे मागील तीन चार महिन्यापासून खोदून ठेवलेले शहरातील बहुंतांशी रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. शहरभर धुळीचे साम्राज्य आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली डिजिटल सुविधा देण्यासाठी अनेक योजना आयुक्तांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दूरसंचार वाहिन्यांचे नेटवर्क,वायफाय,किऑस्क यंत्र,डिजिटल बोर्ड,फेस्टिवल ऑफ फ्युचर,सिटीझन हॅकेथॉन, स्टार्टअप पिचफेस्ट,स्पिकर सिरीज या योजना म्हणजे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय. असे प्रकल्प म्हणजे नागरिकांना 'मुंगेरी लाल के हसीन सपने 'दाखविण्याचा प्रकार आहे.
व्हीएस न्यूज : भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सुरू झालेल्या ‘इंडो- फ्रेंच नॉलेज समिट’च्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. पुढील वर्षी(२०२१) ४ आणि ५ मार्चला ही परिषद होणार असून, फ्रान्स आणि भारत सरकारचे उच्चस्तरीय अधिकारी, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग असेल.
फ्रान्सच्या मुंबईतील महावाणिज्य दूत सोनिया बार्बरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या नवसंकल्पना केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, फ्रेंच दूतावासातील अधिकारी ऑलिव्हर फुडूम, फिलिप गुलियन आदी या वेळी उपस्थित होते. अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशी नऊ प्रमुख क्षेत्रे आणि संबंधित विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाईल, विद्यापीठांशी सामंजस्य करार केले जातील, विविध विषयांवरील एकत्रित संशोधन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील ठराव केले जातील.
बार्बरी म्हणाल्या, ‘भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ आहेत. अवकाश विज्ञान, संरक्षण अशा क्षेत्रांत एकमेकांचे सहकार्य घेत आहेत. दोन्ही देशांसाठी विद्यापीठे आणि संशोधन हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करणे शक्य आहे. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचे ठरले. या पूर्वीच्या दोन परिषदांमध्ये सुरू झालेले प्रकल्प पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या परिषदेत सादर केले जातील. ही परिषद फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठ अन्य संस्थांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, नव्या विषयांसंदर्भातील अभ्यासक्रम, काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेता येतील. या पूर्वीच्या दोन परिषदांमुळे एव्हिएशन, इलेक्ट्रिक मोबिलिटी संदर्भातील दोन अॅडव्हान्स्ड सेंटर निर्माण झाली. त्यामुळे या परिषदेतूनही शिक्षण, संशोधन, विज्ञानासंदर्भातील महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
पहिल्यांदाच विद्यापीठात परिषद
फ्रान्सच्या अध्यक्षांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या वेळी फ्रान्स दूतावासातर्फे ही परिषद आयोजित केली होती. पहिली परिषद २०१८ मध्ये दिल्लीत आणि २०१९ मध्ये फ्रान्समधील लिऑन येथे झाली. आता २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारी परिषद पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठात होणार आहे.
व्हीएस न्यूज - कानशिलात लगावल्याच्या कारणावरून चाकण एमआयडीसी मध्ये वर्कशॉप मालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हरीशचंद्र किसन देटे (वय-४५) असे खून झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे. तर जीवन दत्ता डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह ऐकून पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद वशिष्ट कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीशचंद्र किसन देटे यांचे चाकण एमआयडीसीमध्ये व्ही.एच.डी नावाचे वर्कशॉप आहे. त्याठिकाणी आरोपी जीवन डोंगरेची पत्नी काम करते. सोमवारी सकाळी आरोपी पत्नीला वर्कशॉपमध्ये सोडवण्यासाठी आला होता. तेव्हा, काही कारणामुळे मयत हरिशचंद्र देटे आणि आरोपी जीवन डोंगरे यांच्यात भांडण झाले. हरिशचंद्र यांनी आरोपीच्या दोन कानशिलात लागवल्या. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. परंतु, कानशिलात लगावल्याचा राग मनात असल्याने जीवन डोंगरे हा स्वस्त बसला नाही. त्याने आपल्या पाच ते सहा साथीदारांसह हरीशचंद्र यांचे पुन्हा वर्कशॉप गाठत धिंगाना घातला. वर्कशॉपचे मालक हरीशचंद्र हे बाहेर आले. त्यावेळी थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण करत मुख्य आरोपी जीवन डोंगरे याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. जखमी देठे यांना तत्काळ चाकणच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला.
या घटनेमुळे चाकण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार करत आहेत. आरोपी हा भाड्याने रिक्षा घेऊन चालवत असे असंही पोलिसांनी सांगितले आहे
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002