Breaking News

पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. |
V. S. News
मुख्यसभेतून तुकाराम मुंढे यांचा काढता पाय

मुंढेच्या सभात्यागाने सत्ताभारी भाजप अडचणीत

व्हीएस न्यूज - पीएमपीएमएलसंदर्भात बोलाविलेल्या मुख्यसभेस पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे उपस्थित राहिले खरे; मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवण्यास सुरूवात करताच त्यांनी थेट सभेतूनच निघून जाणे पसंत केले. मात्र, त्यानंतर मुख्यसभेत चांगलाच गोंधळ उडाला. प्रश्‍नांची उत्तरे देण्याची वेळ येताच कोणालाही न सांगता मुंढे यांनी काढता पाय घेतल्याची टिका करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी तुकाराम मुंढे पळपुटे असल्याची जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच सभा सुरू असताना; सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सभापतींची संमती न घेता सभागृहाबाहेर गेलेल्या मुंढे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी भाजपने मुंढे यांची पाठराखण करत विरोधकांची मागणी फेटाळून लावली. मुंढे निघून गेल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस तसेच मनसे नगरसेवकांनी मुंढेच्या कार्यपद्धतीसह, भारतीय जनता पक्षाच्या हतबलतेवरही जोरदार टिका केली. मात्र, मुंढे यांच्या निघून जाण्याने अडचणीत आलेल्या भाजपच्या कोणत्याही सदस्याला विरोधकांच्या टिकेला उत्तर देता आले नाही.

पीएमपीएमएलला 2016-17 या आर्थिक वर्षाची संचलन तूट 12 समान हत्यांमध्ये देण्यासाठी महापालिकेची खास सभा बोलाविण्यात आली होती. या सभेस मुंढे उपस्थित राहिले खरे मात्र, मुंढेच्या उपस्थितीने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला.मुंढे सभागृहात आल्यानंतर सकाळी सव्वा अकाराच्या सुमारास सभेस सुरूवात झाली. यावेळी मुंढे यांनी सभागृहात पीएमपीची सदस्यस्थिती आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. त्यानंतर सभाग़ृहातील इतर सदस्यांनी आपल्या भाषणास सुरूवात केली.

यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक धीरज घाटे, गोपाळ चिंतल यांची भाषणे झाली आणि त्यानंतर भाजप नगरसेविका पल्लवी जावळे यांची भाषणे झाली. जावळे यांच्या भाषनानंतर राजश्री शिळीमकर यांचे भाषण सुरो असताना; अचानक कोणालाही न सांगता मुंढे महापालिकेच्या सभागृहातून बाहेर पडले.महापौर सभागृहात उपस्थित नसल्याने उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मुंढे निघून गेल्यानंतर कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपमहापौर मुंढे हे तुम्हाला सांगून बाहेर गेले आहेत का ? अशा प्रश्‍न विचारला मात्र, मुंढे यांनी बाहेर जाताना कोणालाही कल्पना न दिल्याने डॉ. धेंडे यांना काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे मुंढे यांनी सरळ सरळ सभागृहाचा अपमान केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात मुंढे पळपूटे असल्याची जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच मुंढे हाय हाय अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत पालिकेची सभा अर्धवट सोडून गेलेल्या मुंढेवर कंपनी कायद्यानुसार, कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच मुंढेच्या या वर्तूनुकीच्या निषेधार्थ ही खास सभा तहकूब करावी अशी तहकूबी माजी उपमहापौर दिपक मानकर, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्यासह कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी दिली. मात्र, सत्ताधारी भाजपने ही तहकूबी फेटाळून लावली.

हा गोंधळ सुरू असतानाच; नगररस्त्यावरील खूळेवाडीला जाणारी बस बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, सुमन पठारे यांनी महापौरांच्या समोरच जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सभागृहात आणखीनच गोंधळ उडाला. सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या गोंधळानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर ही तहकूबी फेटाळून लावली. त्यानंतर झालेल्या भाषणांच्या वेळी सत्ताधारी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या कारभाराचे वाभाडेच काढले.मात्र, मुंडे यांच्या अचानक जाण्याने भाजपचीही चांगलीच कोंडी झाल्याने या टिकेला एकाही भाजप सदस्याला उत्तर देता आले नाही.

महापालिकेसाठी काळा दिवस

महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारे अधिकाऱ्याने सभागृह सोडून जाणे म्हणजे काळा दिवस असल्याची टिका विरोधकांनी केली. तसेच महापालिकेत सत्तेत असताना; पुणेकरांच्या हिताची बाजू सोडून मुंढे यांची पाठराखन करणाऱ्या भाजपला पुणेकरांविषयी आपूलकी नाही तर सूड उगविण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी केली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्यासह कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंढेनी सभागृहात दिलेल्या माहीती मधील तफावतच आकडेवारी तसेच कागदपत्रांसह सभागृहाच्या समोर आणली. मात्र, यावेळी विरोधकांनी भाजपचाही शेलक्‍या शब्दात समाचार घेतला.मात्र, विरोधकांच्या टिकेवर हसण्यापलिकडे त्यांच्या टिकेला कोणलाच उत्तर देता आले नाही.

नगरसेवकांच्या सूचना मुंढेना पाठविणार

सर्व सदस्यांची भाषणे झाल्यानंतर सभपतीपदी असलेल्या डॉ. धेंडे यांनीही मुंढे यांच्या या वर्तुनुकीचा निषेध केला. अशा प्रकारे सदस्यांच्या भावना तीव्र असताना; त्यांनी सभागृह सोडून जाणे योग्य नाही. त्यामुळे सदस्यांनी उपस्थित केलेले आक्षेप तसेच सूचना मुंढे यांना पाठवून त्यावर त्यांचा खुलासा मागविण्यात यावा असे आदेश डॉ. धेंडे यांनी यावेळी दिले. त्यानुसार, सदस्यांच्या भावना प्रशासनाकडून मुंढे यांना कळविल्या जाणार आहेत.

...Read More

V. S. News
ओबीसी आणि बलुतेदारांनी संघटीत लढा उभारावा – अमर साबळे

व्हीएस न्यूज - देशात ओबीसी व बलुतेदारांची संख्या मोठी आहे. त्यांनी संघटीत लढा उभा करावा. त्यांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार न्यायाची भूमिका घेत आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले.

विविध मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या शिष्टमंडळाने खासदार साबळे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदन संघाचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी दिले. यावेळी संघाचे सचिन राजेंद्र पंडित, प्रदेश निरीक्षक प्रदीप वाळुंजकर, शहराध्यक्ष नागेश भोपुलकर, संपर्कप्रमुख विशाल वाळुंजकर, सरला कानमपल्लीवार, अशोक पंडित, संतोष शिंदे, चेतन भालेराव, संदीप राऊत, गणेश वाळुंजकर, अनंत कानडे, नितीन कुटे आदी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाने बलुतेदारांना स्वतंत्र बजेट द्यावे, त्यांची जनगणना जाहीर करावी, क्रिमिलेअर मधून बलुतेदारांना बगळावे, बलुतेदारांसाठी व्यावसायिक, शैक्षणिक, प्रगतीचे धोरण ठरवावे, बलुतेदारांना सर्वत्र प्रतिनिधीत्व द्यावे,तसेच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न व राष्ट्रसंत सेना व नामदेव महाराज यांच्यासह भाई कोतवाल यांचे टपाल तिकीट सुरू करावेत, आदी मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन खासदार साबळे यांनी शिष्टमंडळाला दिले. सूत्रसंचालन विशाल वाळुंजकर यांनी केले. आभार नागेश भोपुलकर यांनी मानले. निवेदन सचिव राजेंद्र पंडित यांनी केले.

...Read More

V. S. News
पिंपरी महापालिकेच्या 21 डॉक्‍टरांच्या बदल्या

व्हीएस न्यूज महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील 21 डॉक्‍टरांच्या शहरांतर्गत अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या काही डॉक्‍टरांच्या शहरातंर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची भोसरी रुग्णालयातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. गोविंद तळपाडे यांची प्राधिकरणातून पिंपरीगाव दवाखान्यात, डॉ. वर्षा डांगे यांची कुटुंब नियोजन विभागातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. विकल्प भोई यांची आकुर्डी रुग्णालयातून बोपखेल दवाखान्यात, डॉ. सुनीता साळवे यांची यमुनानगर रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. गितांजली कोल्हे यांची यमुनानगर रुग्णालयातून वाल्हेकरवाडी दवाखान्यात, डॉ. सध्या भोईर यांची वाल्हेकरवाडी दवाखान्यातून म्हेत्रेवस्ती येथील दवाखान्यात बदली केली आहे.

डॉ. स्मिता नागरगोजे यांची नेहरुनगर येथील दवाखान्यातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. रामनाथ बच्छाव यांची भोसरी रुग्णालयातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. किशोरी नलवडे यांची थेरगाव रुग्णालयातून तालेरा रुग्णालयात, डॉ. आसावरी ढवळे यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालयात, डॉ. छाया शिंदे यांची यमुनानगर रुग्णालयातून नेहरुनगर दवाखान्यात, डॉ. राजीव शहारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. अंजली ढोणे यांची तालेरा रुग्णालयातून पुनावळे येथील दवाखान्यात बदली करण्यात आली आहे.

डॉ. श्रीराम भंडारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून सांगवी रुग्णालयात, डॉ. संजय पोटे यांची पिंपरीगावातील दवाखान्यातून प्राधिकरणातील दवाखान्यात, डॉ. राहुल साळुंखे यांची पोस्ट मार्टेम विभागातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. तृप्ती सांगळे यांची वायसीएम मधून वैद्यकीय मुख्य विभागात, डॉ. मेधा खरात यांची वायसीएमएच्‌ मधून भोसरी रुग्णालयात, डॉ. प्रकाश ताडे यांची भोसरी रुग्णालयातून सांगवी रुग्णालयात तर, डॉ. स्नेहा जगदाळे यांची सांगवी रुग्णालयातून भाटनगर येथील दवाखान्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बदली झालेल्या डॉक्‍टरांनी त्वरीत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

...Read More

V. S. News
पोलीस बंदोबस्तात पीएमपी बस आगाराबाहेर

व्हीएस न्यूज पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्न पर्पलशी असलेला करार संपुष्टात आणल्याने संतप्त झालेले कर्मचारी बुधवारी सकाळी (दि. 22) नेहरुनगर डेपोबाहेर एकत्र जमले. या कर्मचाऱ्यांनी मार्गावर जाणाऱ्या अनेक बस रोखून धरल्या. अखेर पोलीस बंदोबस्त मागवत सुरक्षेत पीएमपीच्या सर्व बस मार्गांवर रवाना करण्यात आल्या.

दोन महिन्यांचे वेतन थकल्याने पीएमपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.21) अचानक संप पुकारला. याचा फटका प्रवाशांना बसला. अनेक गाड्या मार्गांवर धावू न शकल्याने पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाला. तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार प्रसन्ना पर्पलशी असलेला करार रद्द केल्याने, कंत्राटी कामगार रोजंदारीपासून वंचित राहिले. दुसऱ्या दिवशी देखील या घटनेचे प्रतिसाद उमटले. सकाळी शेकडो कंत्राटी कर्मचारी नेहरुनगर बस आगारासमोर एकत्र जमा झाले. त्यांना प्रशासनाने कामावर रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने ते आणखी संतप्त झाले.

दोन महिन्यांचे वेतन थकीत असतानाच कामावार रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने कामगारांनी आगाराबाहेर येणाऱ्या बस काढण्यास विरोध दर्शविला. यामुळे पीएमपी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरिता त्यांनी पोलीस बंदोबस्त मागविला. त्यानंतर हळुहळू सर्व बस मार्गावर रवाना झाल्या. या बहुतांशी सर्व बस पीएमपीच्या कायम कर्मचाऱ्यांनी मार्गावर नेल्या. मात्र, ठेकेदाराच्या बस मार्गावर धावू न शकल्याने दुसऱ्या दिवशी देखील अनेक मार्गांवर बस फेऱ्यांची कमतरता जाणवत होती. याबाबत नेहरुनगर आगार व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

तीन दिवसांत थकीत वेतन देणार

संतप्त जमाव झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत पोलीस बंदोबस्तात बस बाहेर सोडण्यात आल्या. त्यानंतर प्रसन्न पर्पल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच यावर मार्ग काढला जाईल. आणि सर्व चालकांचा पगार येत्या तीन दिवसात मिळेल, असे आश्वासन प्रसन्न पर्पलच्या व्यवस्थापकांकडून मिळाले आहे, अशी माहिती या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली.

...Read More

V. S. News
प्रा. रवंदळे यांची टिपीओ असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग ऍन्ड प्लेसमेंट ऑफीसर्सच्या (टीपीओ) अध्यक्षपदी निवड झाली.

मुंबईतील खालापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने प्रा. रवंदळे यांची निवड करण्यात आली. राज्यातील 250 अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट ऑफीसर्स आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमता वृद्धिंगत करून त्यांना सुयोग्य ठिकाणी कॅम्पस मधून नोकरी मिळावी या उद्देशाने असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.

पुढील काळात राज्यातील सर्वंच विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे असोसिएशन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. असोसिएशनच्या कार्यकारी संचालकपदी सांगलीतील वालचंद महाविद्यालयाचे प्रा. संजय धायगुडे, सचिवपदी मुंबईच्या एससीओईचे प्रा. संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
चिंचवडमधून महाविद्यालयीन युवक बेपत्ता

व्हीएस न्यूज कॉलेजमधून जाऊन येतो, असे घरातून सांगून घराबाहेर पडलेला महाविद्यालयीन युवक बेपत्ता झाल्याची घटना कृष्णानगर चिंचवड येथे सोमवारी (दि.20) सकाळी सातच्या सुमारास घडली.

वैभव पांडुरंग बिराजदार (वय 17, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील पांडुरंग बिराजदार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वैभव हा निगडी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काल सकाळी सात वाजता कॉलेजला जात असल्याचे घरच्यांना सांगून तो निघाला. परंतु रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. वैभवच्या घरच्यांनी त्याच्या मित्र, वर्ग शिक्षक आणि इतरत्र त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
अल्पवयीन मुलाला मारहाण करुन लुटले

व्हीएस न्यूज एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला तीन अज्ञातांनी मारहाण करुन त्याच्या जवळील 5 हजार रुपये लुटले. नाशिक फाटा येथे मंगळवारी (दि. 21) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. जनार्दन रमेश गावीत (वय 14, रा. नाशिक) असे जखमी मुलाचे नाव आहे.

जनार्दन हा त्याच्या मित्रांसोबत गावी निघाला होता. मात्र, मित्र चढलेल्या गाडीत त्याला जागा मिळाली नाही. त्यामुळे तो नाशिक फाटा येथे दुसऱ्या गाडीची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी तीन अज्ञातांनी येऊन त्याला मारहाण केली व त्याच्याजवळ असलेले पाच हजार रुपये त्यांनी लुबाडले. त्याला मारहाण करुन त्यांनी दापोडी येथील सीएमई जवळ टाकून दिले. या घटनेत जनार्दनच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र केसरीसाठी पिंपळे सौदागरमध्ये निवड चाचणी

व्हीएस न्यूज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 61 वी राज्य अजिंक्‍यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 20 ते 24 डिसेंबर 2017 या कालावधीत मुळशी तालुक्‍यातील भुगाव येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कै. पंढरीनाथ फेंगसे यांच्या स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत या कुस्ती स्पर्धा येत्या रविवारी (दि.26) होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संजोयक नगरसेवक नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उपाध्यक्ष काळूराम कवीतके संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्‌घाटन रविवारी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, उपमहाराष्ट्र केसरी सागर गरुड हे उपस्थित राहणार आहेत. विजेत्या मल्लांना याच दिवशी सायंकाळी आठ वाजता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा कुमार गटात 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 या वजनी गटात मॅटवर होणार आहे. तर खुल्या गटात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 86 ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गटातील सामने मातीवर होतील. विविध गटात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या कुस्तीगीरास मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेणारा मल्ल पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारा असणे आवश्‍यक असून, याकरिता वयाचा दाखला आवश्‍यक आहे. कुमार गटातील मल्लाच जन्म तारीख दि. 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर2002 या दरम्यानची असणे आवश्‍यक आहे.

अर्जुन काटे यांना “जीवन गौरव’

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दामुआण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाउंडेशन यांचे वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

...Read More

V. S. News
शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ सिनेमा तत्काळ सुरु करा

छावा संघटनेचे सिनेमागृहांना निवेदन

व्हीएस न्यूज - शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ हा चित्रपट अद्याप सुरु केलेला नाही. काही संघटनाच्या विरोधामुळे हा चित्रपट सिनेमागृहात झळकलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने सिनेमागृह चालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यभर “दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटास सेन्सॉर बोर्ड व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही संघटनांचा विरोध न जुमानता हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करावा, तसेच “दशक्रिया’ चित्रपटास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पुर्ण संरक्षण देण्यात येईल, असे शहराध्यक्ष गणेश जाधव, अजय लखणे, सुशांत दुणगे, बलभीम जगदाळे, विशाल लेंडवे, राहूल माने यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
ऐनवेळच्या विषयाविरोधात न्यायालयात जाणार – राहुल कलाटे

व्हीएस न्यूज महापालिका विधी समितीने विषय पत्रिकेवरील डॉक्‍टर पदोन्नतीचा विषय तहकूब करुन ऐनवेळच्या विषयांना तत्काळ मंजुरी दिल्या आहेत. यापुढे स्थायी, विधीसह अन्य विषय समितीमध्ये नगरसदस्यांचे ऐनवेळेचे कुठलेच विषय घेण्यात येवू नयेत. जर कुठल्याही समितीत ऐनवेळेचे विषय घेवून मंजुरी दिल्यास याबाबत शिवसेनेकडून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना इशारा दिला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या विधी समिती सभापतींनी समिती सभेच्या अजेंड्यावर असलेले डॉक्‍टर पदोन्नतीचे दोन्ही विषय तहकूब केले. मात्र, समिती नगरसदस्यांकडून ऐनवेळेचे 6 विषय विधी सभेपुढे ठेवण्यात आले होते. त्यातील सहा पैकी पाच ऐनवेळचे विषय मंजूर करण्यात आले.

वाकड येथील रस्त्याचा स्थळ बदलायचा विषय आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडून विधी समितीकडे आला. त्या विषयाला डावलण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, यापुढे स्थायी, विधी व अन्य विषय समित्यांमध्ये कुठलाही ऐनवेळेचा विषय आणू नये किंवा मंजूर करु नये. जर यापुढे ऐनवेळेचे विषय मंजूर केल्यास “शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल. तसेच स्थायी, विधी समितीसह बैठकीत सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असाही इशारा कलाटे यांनी दिला आहे.

...Read More

V. S. News
भोसरीमध्ये इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी केंद्रीय परिषद

व्हीएस न्यूज - वाढत्या वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथील नवी दिल्लीतील इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेच्या पुढाकाराने इथेनॉल निर्मितीला गती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) भोसरी येथे परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेत इथेनॉल निर्मितीवर चर्चा केली जाणार आहे. याबाबतची माहिती माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एनके पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 20) दिली. यावेळी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अतुल मुळे, सीआयआरटीचे राजेंद्र सगर पाटील, वसंतदादा शुगर फॅक्‍टरिज व संशोधन केंद्राचे महानिदेशक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकार मेक इनच्या माध्यमातून भर देत आहे. आज देशात सर्व प्रकारची वाहने व कंपन्यांसाठी 82 टक्के इंधन आयात केले जाते. त्यातील केवळ 18 टक्के इथेनॉलचा साठा भारताकडे शिल्लक आहे. दहा वर्षापूर्वी दिवसाला 75 हजार दुचाकी तयार होत होत्या. आज रोजी एक कंपनी 3 लाख दुचाक्‍या दिवसाला विक्री करते. या वाढत्या वाहनांची संख्या विचारात घेता 18 टक्के इथेनॉलचा स्टॉक पुढील दहा वर्षात संपणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मित वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या परिषदेत कारखानदार, वाहन कंपन्या, इथेनॉल निर्मिती संस्था त्याचबरोबर शेतकरी वर्गाची मदत घेऊन इंधन निर्मिती वाढविण्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, विद्युत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!