व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छ सर्वेक्षण ४ जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून शहर स्वछतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने महापालिकेतील आरोग्य, स्थापत्य, पाणीपुरवठा व जल:निसारण व उद्यान विभागासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक डॉ. उदय टेकाळे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सिताराम बहुरे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक व अभियंते आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशभरातून सुमारे ४ हजार ४१ शहरांचा सहभाग असणार आहे. सुमारे ४ हजार गुणांक या स्पर्धेत देण्यात येणार असून ३ टप्यामध्ये हे गुणांक होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत. डॉ. उदय टेकाळे यांनी यावेळी व्यक्त केले. सर्वेक्षण अंतर्गत संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता व हागणदारीमुक्तता, माहिती, शिक्षण व वर्तणूक बदल, कम्युनिकेशन (IEC), क्षमता बांधणी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ठ कार्य या उपक्रमांना महत्व देण्यात येणार असून शहरमध्ये थेट निरीक्षण नागरिक अभिप्राय माध्यमातून शहरी स्थानिक संस्था आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे, असेही डॉ. उदय टेकाळे यांनी सांगितले.
केंद्रशासनाने स्वच्छतेबाबत जाहीर केलेल्या स्वच्छता अॅपचा अधिकाधिक नागरिकांनी डाऊनलोड करून त्याचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच स्वच्छतेबाबत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी कालमर्यादित वेळेत सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. शहरातील शाळा, हॉटेल, मोहल्ला, सोसायट्या व मार्केट यांच्या स्वच्छतेबाबत स्पर्धा घेण्यात यावी व नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. के.पी.एम.जी.चे श्री. रघु गौडाव क्रिसिल चे अंकुर व्दिवेदी यांनी यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ बाबात सदरीकरण करून माहिती दिली. या सर्वेक्षानाअंतर्गत महापालिका सेवास्तरावरील प्रगती करिता एकूण १४०० गुणांक आहे. यामध्ये संकलन व वाहतूक (१४ मापदंड) ४२० गुणांक-३०%, प्रक्रिया विल्हेवाट (८ मापदंड) ४२० यासाठी ३०%, स्वच्छता हागणदारी मुक्तता (११ मापदंड) ३५० गुणांक २५%, माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदल (९ मापदंड) ७० गुणांक ५%, क्षमता बांधणी (६ मापदंड) ७० गुणांक ५%, नाविन्यक्रम उपक्रम आणि उत्कृष्ठ कार्य ७० गुणांक ५%, तसेच स्वतंत्र प्रामाणिकरणासाठी १२०० गुणांक आहेत. प्रत्यक्ष निरीक्षण (१८ मापदंड) यासाठी १४०० गुणांक आहेत. यामध्ये नागरिकाच्या प्रतिक्रिया (६+३ प्रश्न) नागरिकांच्या प्रतिक्रिया १००० गुणांक ७२ % व स्वच्छता अॅप साठी ४०० गुणांक २८ % इतके असेल.
व्हीएस न्यूज - साने चौक चिखली येथील भारतीय मूलनिवासी संघाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागासह भारतीय मूलनिवासी संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महासचिव अशोक मंगल, भारतीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सरोदय रमेश, उद्योजक बी. बी. वर्मा यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या जीवनाचे आपल्या उदबोधनात सविस्तर माहिती दिली.
यावेळी, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रवक्ता आयुष मंगल, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एस टी कांबळे, मिलिंद बनसोडे, संजय तरकसे, राज तुतारी, रतन बोरोले, सुशील मोरे, सुनील मोरे, सुजाता ठोसर, रोहन ठोसर, भाऊराव राऊत,विद्या राऊत, मायाताई चोपडे, मंजू सुधीर चव्हाण, दर्शनाताई मांडवे, माधुरी ताई गुप्ता, शकुंतला विजय पटेल, मुहम्मद अझार, हनुमान वाघमारे, निर्मला पाटील, बाळकृष्ण गायकवाड, शिला सिंग, हिराचंद गायकवाड, प्रल्हाद पवार, राहुल मधुकर कांबळे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - 'दुचाकीला कट मारल्याचे सांगून' दोन दुचाकीवरील भामट्यांनी एका तरूणाला एटीएममध्ये जबरदस्तीने नेत 11 हजार 680 रूपये काढण्यास भाग पाडले. रोख रकमेसह मोबाईल असा 29 हजार 680 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. हा प्रकार हिंजवडी येथे 25 नोव्हेंबर रोजी घड़ला.
सिध्दार्थ घोष (वय-27, रा. मुक्ताईनगर, हिंजवडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष हे 25 नोव्हेंबर रोजी हिंजवडीतील फेज-2 कडे दुचाकीवरून जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी घोष यांना कट मारल्याचे सांगून जबरदस्तीने एटीएममध्ये घेवून गेले. 11 हजार 680 रूपये काढण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा मोबाईलही जबरदस्तीने काढून घेवून 29 हजार 680 रूपयांची लुबाडणूक केली.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील बाजारपेठेतील बॅक ऑफ महाराष्ट्राचे एटीेएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत बॅकेचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एटीएम मशिनमध्ये किती रोकड होती याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अभियंत्याची फसवणूक होण्याची दोन दिवसातील दुसरी घटना उघडकीस
व्हीएस न्यूज - एका नामंकित पॉलिसी कंपनीत कामाला लावण्याचे आणि पाच लाख रूपयांची पॉलिसी मॉरगेज कर्ज मंजुर करून देण्याचे अमिष दाखवून तिघांनी एका अभियंता तरुणाची 1 लाख 85 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते 5 ऑक्टोबर या कालावधीत आकुर्डी येथे घडला. दरम्यान, गेल्या दोन दिवसातीस अभियंत्यांना फसवणूक करण्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलदिप जाधव (वय-28, रा. दत्तवाडी, आकुर्डी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांनी माहिती दिली. कुलदिप हा अभियंता आहे. तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. दिल्लीतील तीन आरोपींनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून एका नामांकित पॉलिसी कंपनीत नोकरी लावण्याचे आणि पाच लाख रूपयांचे पॉलीसी मॉरगेज कर्ज मंजुर करून देण्याचे आमिष दाखविले.
या अमिषाला बळी पडून कुलदिपने आरोपींच्या विविध बॅंक खात्यात व पेटीएमव्दारे 1 लाख 85 हजार रूपये भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोन भामट्यांनी अभियंता तरूणी रेखा अर्जुन (वय-25, रा. थेरगांव) हिला ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार थेरगांव येथे मंगळवारीच उघडकीस आला होता.
व्हीएस न्यूज - चिंचवडगावात पीएमपीचे बस स्थानक आहे. एमएच १२ एचबी ४०१ या क्रमाकांची पीएमपीची बस चिंचवड स्थानकात आली होती. स्थानकाबाहेर बस उभी होती. त्यावेळी पावणेदोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली.संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे....Read More
व्हीएस न्यूज - पुण्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शनिवार पेठेत पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पराग क्षीरसागर (वय 30 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
आज सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (वय 60 वर्ष) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांच्या हत्येनंतर मुलानेही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलं. मात्र त्याला वाचवण्यात आलं आहे. आरोपीला जुळा भाऊ असून तो देखील घटनेच्या वेळी घरातच होता. आरोपी परागचे आई-वडील नोकरी करत होते. त्याला दारुचं व्यसन होतं. शिवाय तो काही कामही करत नव्हता. त्यातूनच त्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी पराग क्षीरसागरला ताब्यात घेतलं असून विश्रामबाग पोलिस पुढील तपास सुरु आहे.
व्हीएस न्यूज - हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे लागलेल्या आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे. या आगीत ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. उरुळी कांचन,येथे अशा प्रकारच्या आगीची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून व्यापारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा गंगाराम जगताप (रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांचे नेत्रा फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानाला रात्रीच्या वेळी अचानक आग लागली होती. यावेळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन गाड्या व ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभागाच्या टँकरने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या भीषण आगीत हे फर्निचरचे संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत ९० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशाचप्रकारे साडी डेपो व फर्निचरच्या सात दुकानांना आग लागून साधारणत: दोन कोटींचे नुकसान झाले होते. पंधरा दिवसात या दुसऱ्या आगीच्या घटनेने व्यापारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनेत मध्यरात्रीच्या वेळीच आग लागली असल्याने ही आग लागली की लावली गेली याबाबत शंका उपस्थित होत आहे.
व्हीएस न्यूज - ब्लड कॅन्सर सारखा मोठा आजार, दर दोन महिन्याला बदलावे लागणारे रक्त आणि त्यासाठी प्रचंड महागड्या उपचारासाठी चक्क वयाच्या १७ व्या वर्षापासून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निगडी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने (वय-२१, राहणार कोथरुड, पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातल्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी सध्या गस्त वाढवली आहे. ही गस्त सुरू असतानाच निगडी पोलिसांनी मुकेश उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने या २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि पोलिसांना धक्काच बसला. १७ व्या वर्षापासून त्याने घरफोडी करायला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले. घरफोडी आणि इतर असे तब्बल ३२ गुन्हे त्याच्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आणखी तपास केल्यावर तो घरफोड्या का करत होता हे त्याने सांगितले. त्याचे कारण ऐकून पोलीस ही चक्रावले आहेत. मुकेशला ब्लड कॅन्सर असल्याने त्याला दर दोन महिन्याला रक्त बदलावे लागते. एवढे महागडे उपचार करण्यासाठी तो चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. पोलीस आता त्याच्या या दाव्याचा तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांपासून निगडी प्राधिकरणात भरदिवसा घरात घुसून एका चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील सराईत चोराला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.
मुकेश उर्फ मुन्ना ऊर्फ धन्या उर्फ धनंजय (वय-21 रा सुटरदरा, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 13 लाख 57 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचा तडीपार गुन्हेगार असून त्याच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर औवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस पथकाने केली.
व्हीएस न्यूज - मंत्रालयात शिपायाची नोकरी लावतो असे सांगून एका इसमाने चिखलीच्या तरुणाला एक लाख रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.
हेमंत रासकर (वय-47 रा. विठ्ठलवाडी देहुगाव) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी याकुब देवाशीश पैलवान (वय-22 रा. घरकुल चिखली) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे वडील कस्टममध्ये ऑफीसर आहेत. त्यांच्या ओळखीने मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून आरोपीने याकुब यांच्याकडून मे ते नोव्हेंबर या काळात एक लाख रुपये घेतले. मात्र सहा महिने झाले तरी नोकरी लावली नाही तसेच पैसे मागण्यसाठी गेले असता मारहाण करु अशी धमकीही आरोपीने दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002