Breaking News

पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. |
V. S. News
मिनी मॅरेथॉनमध्ये रोहित मगदूम प्रथम

व्हीएस न्यूज - चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स-सायन्स ॲन्ड इंफर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (सीएसआयटी) वतीने आयोजित केलेल्या “रन फॉर पिस ॲन्ड युनिटी ऑफ इंडिया” या मिनी मॅरेथॉनमध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पावणेपाच किलोमीटरच्या या स्पर्धेत रोहित मगदूम याने प्रथम क्रमांक पटकविला.तर सचिन शिंगोडे, गजानन पाल हे अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकावर राहिले.

कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस निरीक्षक डी.के म्हसे, प्राचार्य डॉ. के.एम जाधव, क्रीडा शिक्षक सावित्री मांढरे आदी उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक अंतरकर यांनी विद्यार्थ्यांना शांतता व एकात्मतेविषयी शपथ दिली.

नामदेव ढाके म्हणाले कि, युवक हे देशाचे भविष्य आहे. युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावेत. देशांत युवकच परिवर्तन घडवून आणू शकतात. क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकात्मता टिकविण्याचे कार्य होत आहे. क्रीडा उपक्रमातून विकास घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आयबीएमआरचे प्रवेशद्वार ते मोरवाडी कोर्ट-आयुक्त बंगाला पुन्हा आयबीएमआर कॉलेज या मार्गाने विद्यार्थी धावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी भाटीया तर आभार प्रिया जंजलवार यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरीत वृक्षांचे पुनर्रोपण

व्हीएस न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, या करिता वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतू या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची जबाबदारी महामेट्रोच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. या ठिकाणी ४० वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे उपव्यवस्थापक भानुदास माने यांनी दिली.

एसटी आगाराच्या आवारात सकाळी प्रायोगिक तत्वावर दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि जागतिक स्तरावर मान्य केलेले वृक्ष पुनर्रोपण अशा दोन पद्धतीचा अवलंब केला आहे. पुनर्रोपण केलेले वृक्ष १०० टक्के जगतील याची दक्षता घेतली जाणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात किमान तीन आणि पुणे परिसरात किमान ३ हजार वृक्षांचे रोपण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. आळंदी-दिघी येथेही वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पिंपरी ते हॅरिस पुलापर्यंत १३५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. प्राधिकरणाने आकुर्डी येथे पाच एकर क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. तेथे १२५ वृक्षलागवड केली जाईल. एकूण ६०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. मेट्रो मार्गावर तीन ते चार वर्षापूर्वीची २०० झाडे आहेत. त्यातील मार्गात अडथळा ठरणाऱ्या ६० वृक्षांचे पिंपरीतील गुलाबपुष्प वाटिकेत पुनर्रोपण केले आहे.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र मिलिटरी फोर्स तर्फे १६ डिसेंबर रोजी विजय दिवस रॅलीचे आयोजन

व्हीएस न्यूज - १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो, दिनांक १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबर झालेल्या निर्णायक युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करून बांगलादेश ह्या स्वतंत्र देशाची निर्मिती केली.त्या दिवशी ९१००० पाकिस्तानी सैनिकांनी बिनशर्त शरणागती पत्करली.
महाराष्ट्र मिलिटरी फोर्स तर्फे ह्या दिवशी विजय दिवस रॅली चे आयोजन केले आहे. तसेच समाजातील विशेष कार्य करणाऱ्या मान्यवर लोकांचा विशेष सेवा पुरस्कार देउन गौरव केला जाणार आहे.
तरी ह्या दिवशी आपल्या देशाच्या सर्वोच्च गौरव दिन साजरा करण्यासाठी आपण गांधी भवन कोथरूड, पुणे येथे उपस्थित रहावे हि महाराष्ट्र मिलिटरी फोर्स महाराष्ट्र राज्य यांची विनंती आहे .
रॅली - महेश विद्यालय कोथरूड ते गांधी भवन. सकाळी ९-१०
कार्यक्रम - गांधी भवन येथे सकाळी ११ ते १.
आपल्या सेनादलाच्या कौतुक सोहोळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे हि विनंती.
...Read More

V. S. News
लग्नाला आलेल्या महिलेचे लाखाचे मंगळसुत्र चोरट्याने हिसकावले

व्हीएस न्यूज - एका नातेवाईकाच्या लग्नाला साताऱ्याहून वाकड येथे आलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल एक लाखांचे मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावले. ही घटना वाकड येथील मुंजाबानगर, येथे दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.
शोभा आनंद शिंदे (वय-32, रा. आसगाव, ता. जि. सातारा) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार डी. आर. लोंढे यांनी माहिती दिली.
शिंदे यांच्या एका नातेवाईकाच्या मुलाचे काळा खडक येथील रघुनंदन मंगल कार्यालय येथे रविवारी दुपारी लग्न होते. त्यासाठी त्या साताऱ्याहून आल्या होत्या. मुंजाबानगर येथून त्या पावणेचारच्या सुमारास पायी जात होत्या. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 1 लाख 5 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून चोरून नेले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
मोटारीत बसवून प्रवाशाला लुबाडले

व्हीएस न्यूज - कोल्हापुरला सोडण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी एका प्रवाशाला मोटारीत बसवून दमदाटी करत त्याच्याकडील रोख 1 हजार, मोबाईल असा 11 हजार रूपयांचा ऐवज लुबाडूण नेला. हा प्रकार 29 नोव्हेंबर रोजी रात्री तीन वाजता मुंबई-बैंगलोर हायवेवर घडला.
योगेश कुंभार (वय-27, रा. कोल्हापुर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेशला बहिणीच्या लग्नासाठी कोल्हापुर जायचे होते. दोन भामट्यांनी कोल्हापुरला सोडण्याच्या बहाण्याने योगेशला मोटारीत बसविले. दमदाटी करत त्याच्याकडील रोख 1 हजार, एक मोबाईल असा 11 हजार रूपयांचा ऐवज लुबाडूण नेला. योगेश बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत असल्यामुळे त्याने रविवारी फिर्याद दिली.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
मोरवाडीत अडीच लाखांची घरफोडी

व्हीएस न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शयनगृहातील कपाटीमधील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडन्सीत उघडकीस आली.
अविनाश सावंत (वय-53, रा. लक्ष्मण रेसिडन्सी, विंग बी, मोरवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांचा शनिवारी सकाळी नऊ ते रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत फ्लॅट कुलूप लावून बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटामधील रोख तीस हजार रूपये, सोन्याचे दागिने असा दोन लाख 35 हजार 855 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच सावंत यांचे शेजारी रामप्रसाद श्रीराम गुप्ता यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडण्याचे चोरट्याने अयशस्वी प्रयत्न केला.
फौजदार जी. एन. कडाळे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
आधार दुरुस्ती फक्त पाच मिनिटांत

जिल्हा प्रशासनाला यूआयडीएआयकडून ५० यंत्रे

व्हीएस न्यूज पुढील आठवडय़ापासून केवळ आधारकार्डमधील दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) वापरण्याकरिता जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही ५० यंत्रे दोन-तीन दिवसांत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे केवळ एका बोटांच्या ठशावरून पाच मिनिटांत आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यात येणार आहे.

गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्रांवर येणारे बहुतांश नागरिक आधारकार्डात जन्म दिनांक, मोबाईल क्रमांक, निवास पत्ता, छायाचित्र याबाबत दुरुस्ती करण्यासाठी गर्दी करत आहेत. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्तीचे काम करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेत केवळ २० ते २५ आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार दुरुस्तीकरिता यूआयडीएआयकडे यूसीएल यंत्रांची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून ५० यूसीएल यंत्र तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे येणार आहेत.

या यंत्रांद्वारे एका बोटाचा ठसा घेऊन पाच मिनिटांमध्ये दुरुस्ती करता येते. एका यंत्राद्वारे प्रतिदिन ७० ते ८० आधार दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुब्बुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीएआयकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आधारचे नोडल अधिकारी आणि तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.

यूसीएल डिव्हाइस काय आहे?

अपडेट क्लायंट लाइफ (यूसीएल किट) हे एक बायोमॅट्रिक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला लॅपटॉप आणि प्रिंटर जोडावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास यूसीएल यंत्र येणार असून महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच यंत्र बसविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. आधारची दुरुस्ती करताना छायाचित्राचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे.

...Read More

V. S. News
पोलीस कोठडीतील मृत्यूंमध्ये महाराष्ट्र नंबर वन!

व्हीएस न्यूज सांगलीतील पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरण राज्यातील पोलिसांना चांगलेच महाग पडले होते. असे असताना देशात सर्वाधिक कोठडीतील मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ‘क्राईम इन इंडिया २०१६’ च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया २०१६’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये देशातील पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोठडीत मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात झाल्याची नोंद एनसीआरबीने अहवालात केली आहे. देशात २०१६ मध्ये ९२ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. २१ प्रकरणांत पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशात सर्वाधिक कोठडीत मृत्यू महाराष्ट्र (१६) झाले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (११) आणि गुजरात (११) या राज्याचा क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोठडीत मृत्यू नोंदले गेले असून येथे घडलेल्या बारा घटनांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तर, तीन प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात किंवा कोठडीत घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून आले आहे. कोठडीत आत्महत्या केल्याच्या सर्वाधिक म्हणजे ३८ घटना झाल्या आहेत. त्यानंतर विविध आजारांमुळे २८ जणांचा कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. गुन्हेगारांसोबत कोठडीत असताना झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झाला. तर, तपासासाठी बाहेर घेऊन जाताना अपघात होऊन देखील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच कोठडीतून पळून जाताना चारजण ठार झाले आहेत.

पोलीस अधिकारी किंवा कर्मचा-यांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत मृत्यूच्या घटना आठ असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमूद केले आहे. कोठडीत असताना पळून गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशात कोठडीतून १३२० आरोपी पळून गेले आहेत. त्यापैकी ९५० जणांना अटक करण्यात आली. कोठडीतील आरोपी पळून जाण्यांमध्ये उत्तर प्रदेश मध्यप्रदेश (१३३) आघाडीवर आहे. त्यानंतर (२८२) आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादीच्या नागपूर ‘हल्लाबोल’ मोर्चात पिंपरी चिंचवड मधील ५०० कार्यकर्ते सहभागी होणार

व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला होणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील ५०० कार्यकर्ते सहभागी होणार असून ११ डिसेंबरला कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली आहे.

संजोग वाघेरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी फसली आहे. शेतक-यांना कर्जाचे पैसे अजून मिळाले नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यापर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेला विदर्भात शेतक-यांसह सर्वच घटकातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आमचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देखील काही पदाधिकारी हल्लाबोल पदयात्रेत सहभागी झाले आहेत. शेतक-यासह सर्वंच घटकातील नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत. आपल्या व्यथा पक्षाच्या नेत्यांना सांगत आहेत. त्यांचे प्रश्न समाजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे नेते करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामध्ये माजी आमदार, महापौर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका सहभागी होणार आहेत अशी माहिती संजोग वाघेरे यांनी दिली.

बैठकीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष पवक्ते फजल शेख, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, प्रदिप गायकवाड, शुक्रुल्ला पठाण, यतिन पारेख, आनंदा यादव,सी.आर. कांबळे, गंगा धेंडे, विश्रांती पाडाळे, पुष्पा शेळके, कविता खराडे, सविता खराडे, शहजादी सय्यद, मनिषा गटकळ, शकुंतला भाट, सचिन माने, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब जगताप आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

...Read More

V. S. News
दिघीत रिअल इस्टेट एजंटचा खून

व्हीएस न्यूज - एका रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दिघी येथे घडली. ही घटना शनिवारी (दि.९) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास दिघी येथील दत्तमंदीरा जवळ घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश अंताराम गंगणे (वय-40 रा. दत्तनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अरविंद वंजारी (रा. दिघी), तुषार (पूर्ण नाव माहित नाही), प्रमोद शेलार (रा. दिघी), निलेश कुदळे (रा. वडमुखवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश यांचा भाऊ सुरेश अंताराम गंगणे (वय-४५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गंगणे हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. काल रात्री आरोपी आणि मयत हे सर्वजण न्यु मोहर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वाएकच्या सुमारास आरोपी अरविंद आणि त्याचे भाचे तुषार, प्रमोद आणि निलेश या चौघांनी गणेशच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन गणेश यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
पंडीत ऑटोमोटिव्हच्या मालमत्ता विक्रीस औद्योगिक न्यायालयाची तात्पुर्ती मनाई

व्हीएस न्यूज - ताथवडे येथील पंडीत ऑटोमोटिव्ह कंपनीला औद्योगिक न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत कंपनीच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा तात्पुर्ता मनाई आदेश दिला आहे. हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, अँड. गौरव पोळ, शांताराम कदम, गजानन जोध, हमिद ईनामदार आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना कैलास कदम म्हणाले की, मे. पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. या कंपनी विरूध्द त्यांच्या काही कामगारांनी दि.३० नोव्हेंबर रोजी त्यांचे थकीत असलेले ५ महिन्यांचे वेतन, दिवाळी बोनस व इतर अनुषंगिक फायदे मिळावेत यासाठी औद्योगिक न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आदेश देताना न्यायालयाने कामगारांच्या नोकर्यांना संरक्षण दिले होते. तसेच ४ डिसेंबर रोजी कंपनीच्यावतीने त्यांच्या अधिकार्यांनी कामगारांची बदली करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी मनाई आदेश वाढवून देऊन कामगारांच्या नोकरीस संरक्षण दिले. तरीही दि.५ डिसेंबर रोजी पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. व्यवस्थापनाने सायंकाळी उशिराने तडकाफडकी टाळे ठोकल्याने ३०० कामगार रस्त्यावर आले आहेत.

न्यायालयात तक्रार अर्ज प्रलंबित असूनही कंपनीच्या अशा टोकाच्या भूमिकेमुळे कामगारांना त्यांच्या नोकरीबाबत आणि कंपनीने देय असलेल्या पगार, आणि इतर आर्थिक लाभ मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे व्यवस्थापना विरोधात हिंद कामगार संघटनेने ७ डिसेंबर रोजी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. कामगारांचे सर्व आर्थिक लाभ आणि देयके देईपर्यंत कंपनीच्या सर्व चल आणि अचल मालमत्तांची विक्री करण्यास मनाई करण्याबाबत व कंपनीची सर्व कागदपत्रे जप्त करण्याबाबत तात्पुर्ता मनाई करावी अशी विनंती करणारा अर्ज केला. त्या अर्जावर प्रथम औद्योगिक न्यायालय श्री.एस.व्ही.सुर्यवंशी यांनी कंपनीच्या वकिलांना जाब विचारला. परंतू कंपनीने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता अर्जावर जबाब देण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने त्यावर कंपनीने जर कामगारांना त्यांचे आर्थिक देय रक्कम दिली नाही तर कामगारांकडे काय पर्याय आहे असा सवाल करून पुढिल तारखेपर्यंत कंपनीने त्यांच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला. हिंद कामगार संघटने तर्फे अँड. गौरव पोळ यांनी कामकाज पाहिले. पुढील सुनावणी येत्या दि. ५ जानेवारी रोजी होणार असल्याचे अँड.पोळ यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून करू नये - ॲड. मंजुषा इधाटे

व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय असेही, त्या म्हणाल्या. यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!