व्हीएस न्यूज - परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या ०.६ ते १.१ कोटी आहे, असे २०१७ च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.
रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत. भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत. सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. २००० पासून ४९ टक्के वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे. विश्वासार्ह माहिती व पुराव्यांच्या आधारेच स्थलांतराबाबतचे गरसमज दूर करून स्थलांतर धोरणे ठरवणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक उपमहासचिव लिउ झेनमिन यांनी सांगितले. स्थलांतरामुळे काही देशांत लोकसंख्या वाढली असून, तेथे लोकसंख्या कमी असण्याचा कल बदलला आहे, २००० ते २०१५ दरम्यान उत्तर अमेरिकेत लोकसंख्यावाढीचा दर ४२ टक्के होता, तर ओशियानात तो ३१ टक्के होता. युरोपात २००० ते २०१५ दरम्यान स्थलांतराअभावी लोकसंख्या कमी झाली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002