सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर न्या. कर्णन यांची सुटका
कोलकाता
2017-12-21
व्हिएस न्यूज – कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस. कर्णन यांनी न्यायालयाचा अवमानना केल्याप्रकरणी सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. २० जून रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि इतर न्यायाधीशांवर न्या. कर्णन यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी यासाठी सीबीआय चौकशीचे निर्देशही दिले होते. दरम्यान केहर यांनी हे आरोप म्हणजे न्यायालयाचा अवमानना असल्याचे म्हटले होते. त्यानंतर कर्णन यांच्याविरोधात चौकशीचे आदेश ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिले होते.
या खंडपीठाचे न्या. कर्णन यांना निवृत्तीनंतर तुरूंगात पाठवावे का यावर एकमत झाले नव्हते. एक न्यायाधीश तुरूंगात जाणे म्हणजे न्याय व्यवस्थेवर हा कलंक असल्याचे मानले जाईल, असे काहींचे मत बनले होते. परंतु, नंतर खंडपीठाने सर्व शक्यता फेटाळून अवमानना कोण केली आहे फरक पडत नसल्याचे मत व्यक्त केले होते. न्या. कर्णन यांनी यापूर्वी भारताचे तत्कालीन मुख्य न्यायमुर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर ७ न्यायाधीशांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.