प्रभू रामांसाठी लोकरीचे कपडे आणि हिटर द्यावे – विहिंप
अयोध्या
2017-12-22
व्हिएस न्यूज – प्रभू रामांसाठी लोकरीचे कपडे आणि एका रुम हिटरची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली असून फैजाबादच्या विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात परिषदेने तशी याचिका सादर केली आहे. राममंदिर वादामध्ये याप्रकरणामुळे आणखी ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत असून, सध्या हिवाळ्यातही या मुद्द्यावरून वातावरण गरम झाले आहे.
थंडीचे दिवस सध्या सुरू असल्यामुळे या याचिकेमधून श्रीरामांना थंडी वाजू नये यासाठी काही गरम कपडे आणि मंदिराचा गाभारा गरम ठेवण्यासाठी हिटरची मागणी करण्यात आली आहे. एका पुजाऱ्यांने यावर राम मंदिरामध्ये हिटर लावण्यास विरोध केला आहे. कारण, सध्या रामांची मूर्ती ज्या ठिकणी ठेवण्यात आली आहे आणि हिटरमुळे तिथे आग लागण्याची शक्यता असल्यामुळे त्या पुजाऱ्यांनी हिटरची मागणी म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा एक स्टंट असल्याची टीका केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय विश्व हिंदू परिषदेच्या मागणीची पुर्तता ही अशक्य आहे. पण अशी मागणी करणारे मागील २५ वर्षात काय झोपले होते काय, असा सवाल करत हा केवळ प्रसिद्धीचा प्रकार असल्याचे एका पुजाऱ्याने म्हटले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात असे प्रकार झालेले दिसून येत नाहीत. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्येच अशा प्रकारच्या याचिका करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.