व्हिएस न्यूज - ११ डिसेंबरला इटलीच्या टस्कनीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले.
रोममध्ये या नवविवाहित दाम्पत्याने हनीमून साजरा केला. आता विराट आणि अनुष्का भारतात परतल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांचे लग्न आणि देशभक्तीवरुन सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांच्यानंतर आता काश्मीर पार्टीचे नेते राकिफ वाणीनेही विराट-अनुष्कावर निशाणा साधला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विराट-अनुष्काने रोममध्ये हनीमून साजरा केल्यावरुन वाणीने त्यांच्यावर टीका केली आहे. विराट आणि अनुष्का ज्यांना चाहते विरुष्का असे म्हणतात. त्यांनी हनीमूनसाठी फिनलँड हे ठिकाण निवडले. भारतात अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे हे जोडपे हनीमूनसाठी जाऊ शकले असते. कारण हनीमूनसाठी काश्मीर ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते अशा ठिकाणी जाऊ शकले असते. यामुळे पर्यटनाला चालना मिळाली असती, असे वाणी म्हणाले.