व्हिएस न्यूज – विजय रुपानी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली असून त्यांची गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. रुपानी यांच्या नावाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. तर उपमुख्यमंत्रीपदी नितीन पटेल यांची निवड झाली आहे.
भाजपने गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण भाजपचे मताधिक्क्य आणि जागा या निवडणुकीत ब-यापैकी घटल्या आहेत. १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपला या निवडणुकीत फक्त ९९ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने २०१२मध्ये गुजरात निवडणुकीत ११५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. २०१२ मध्ये ६१ जागा जिंकणारी काँग्रेस ८८ जागांपर्यंत पोहोचली.
आज गुजरात भाजपला पटेल मतदारांची नाराजी आणि आणखी दीडवर्षांनी २०१९ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मोदींसारखी जनमानसाची पकड घेणा-या नेत्याची आवश्यकता आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गुजरातमध्ये घटलेला जनाधार परवडणारा नाही. यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक भाजपने विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवली.