व्हिएस न्यूज – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकूण २५ विधेयके विचारात घेतली. महत्त्वाचे विधेयक झोपडपट्टीधारकांना दिलासा देणारे होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात साडेबारा लाख लोक घरापासून वंचित आहेत. त्या सर्वाना घरे मिळावीत यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दोन विधेयके संमत करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अधिवेशनाच्या समारोपानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधकांनी एक यात्रा काढली. काही मागण्या केल्या. मात्र त्यांनी मागण्या करण्याच्या अगोदरच आम्ही काही घोषणा केल्या होत्या. शेतक-यांच्यापाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेतक-यांना मदत करणा-या काही घोषणाही करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आतापर्यंत २३ हजार कोटींच्या अर्जाना मंजुरी दिली आहे. मागील सरकारने १५ वर्षात केलेली मदत आणि आम्ही तीन वर्षात केलेली मदत यात खूप फरक आहे. सरकारवर कुणीही नाराज नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.