सलमानच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, वरुण साकारणार मुख्य भूमिका
मुंबई
2017-12-25
व्हिएस न्यूज - आपल्या वडीलांप्रमाणे बॉलिवूड अभिनेता वरूण धवन हा इंडस्ट्रीत हिट ठरला आहे. एकेकाळी लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिग्दर्शक डेविड धवनने दिले होते. वरूण धवन आता तेच काम करत आहे. आतापर्यंत वरूणचे ९ चित्रपट रिलीज झाले असून त्यातील सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत.
वरूणचे यावर्षी दोन चित्रपट रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवां २’ हे दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले. डेविड धवन आणि वरूण धवन या जोडीने ‘जुडवां २’ मध्ये धमाल केली आणि सलमान खानचा ९० च्या दशतकातील या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाला या दशकातही सुपरहिट केले. पण आता असे वाटत आहे की, सलमानच्या चित्रपटाची चटक दोघांना लागली.
याबाबात मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि करिश्माच्या एका सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करण्याच्या तयारीत वरूण धवन आणि डेविड धवन आहे. दोघेही बरेच ‘बीवी नंबर १’ या चित्रपटाबाबत सिरीअस असल्याचे समजते. सलमानचे या चित्रपटात करिश्मासोबत लग्न होते आणि दिलफेक सलमानचे मन ऑफिसमधील एका मॉडलवर येतो. या मॉडलची भूमिका सुष्मिता सेनने साकारली होती. या चित्रपटात अनिल कपूर आणि तब्बूचीही भूमिका आहे.
आता ‘बीवी नंबर १’चा रिमेक बनवला जाणार आहे. वरून धवन ज्यात सलमानची भूमिका साकारेल. चित्रपटाचे चित्रीकरण २०१८ च्या मध्यात सुरू होईल. पण सध्याच या चित्रपटात करिश्मा आणि सुश्मिता सेनची भूमिका कोण साकारणात हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.