१०७ वर्षांच्या आजीबाई आहेत राहुल गांधी यांच्या नंबर वन फॅन... वाचा आणखी पुढे......
नवी दिल्ली
2017-12-26
व्हिएस न्यूज - ख्रिसमसच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नवी चाहती मिळाली असून राहुल गांधींची स्तुती करताना त्यांची ही चाहती थकत नाही तसेच त्यांना राहुल गांधी यांना भेटण्याचीही इच्छा आहे. राहुल गांधी यांची ही चाहती कोणी तरूणी नसून तब्बल १०७ वर्षांच्या आजीबाई आहेत. त्यांचा वाढदिवस ख्रिसमसच्या दिवशी होता. राहुल गांधी यांना त्याच दिवशी भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
२५ डिसेंबरला राहुल गांधी यांना टॅग करत राहुल गांधी यांची फॅन असणाऱ्या या आजींच्या नातीने ट्विट केले. ही संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली आहे. या आजीच्या नातीचे नाव दीपाली सिकंद असे असून तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज माझी आजी १०७ वर्षांची झाली. आजीची राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा आहे. त्यांना मी विचारले राहुल गांधींना भेटायचे का ? तर आजी आनंदाने म्हणाली, राहुल गांधी खूप हॅण्डसम आहेत. आजीचा फोटो दीपाली सिकंदने शेअर करत ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी दीपाली सिकंदच्या ट्विटला उत्तर दिले आहे. डिअर दीपाली तुमच्या सुंदर आजीला वाढदिवसाच्या आणि ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा. माझ्याकडून त्यांना गळाभेट द्या, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले. दीपाली सिकंद यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझ्या आजीला व्यक्तिगत रूपात राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हिच खरी माणूसकी आहे. खूप धन्यवाद. असे दीपालीने ट्विटमध्ये म्हटले आहे.