नाशिक व नंदुरबारमधील भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू
नाशिक व नंदुरबार
2017-12-28
व्हीएस न्यूज - नाशिक व नंदुरबारमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाले असून या दोन्ही अपघातात 11 जणांना जीव गमवावा लागला आहे.नाशकात अॅपे रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने रिक्षातील सातही प्रवासी जागीच ठार झाले तर नंदुरबारमध्येदेखील मालवाहतुक करणारी गाडी व रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने 4 जण मृत्युमूखी पडले आहेत.
नाशकात 7 ठार
आज पहाटेच्या सुमारास सटाणा-मालेगावर रोडवर शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने रिक्षाल जोरदार धडक दिली.यामध्ये रिक्षातील सातही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.ट्रक मालेगावहून सटाण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.मात्र अपघात स्थळी सापडलेल्या खेळणी व इतर साहित्यावरुन ते व्यवसायिक असावेत असा अंदाज बांधला जात आहे.सध्या सटाण्यात यशवंत महाराजांची यात्रा सुरु असून या यात्रेत खेळणी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ते येत असावेत असा अंदाज आहे.
नंदुरबारमध्ये 4 मृत्युमूखी-
शहादा तालुक्यातील म्हसावद-आमोदा रस्त्यावर अॅपेरिक्षा आणि मालवाहतूक करणा-या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत.तर 11 जणांची स्थिती गंभीर आहे.यांपैकी तिघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.जखमीमध्ये आदिवासी कला पथकातील कलाकारांचाही समावेश आहे.जखमींवर शहादा आणि म्हसावद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.