व्हिएस न्यूज - सध्या ग्राहकांच्या गर्दीने राजकोटचा पतंग बाजार फुलून गेला असून बाजार आकर्षक रंगसंगतीचे तसेच नानाविध आकाराच्या पतंगांनी सजला आहे. पण यंदा या बाजारात पंतप्रधान मोदी यांची छबी असलेल्या पंतगाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
मकर संक्रातीला पतंग महोत्सवाचे आयोजन गुजरातमध्ये केले जाते. जगभरात गुजरातमधील हा पतंग महोत्सव प्रसिद्द आहे. याकाळात जगभरातील पर्यटक गुजरातला भेट देत असतात. यात आबालवृद्द मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्याकरता पंतग खरेदीची सर्वत्र लगबग सुरु आहे.