व्हीएस न्यूज – आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चिमटा काढला असून खडसे यांनी नांदुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नवीन वर्षात बोंड अळीचा प्रादूर्भाव होवू नये, अशी आशा व्यक्त करताना केवळ अभ्यास करण्यातच आमचा वेळ जातो असा टोला लगावला आहे.
खडसे यांच्या हस्ते नांदुरा नगर पालिकेच्या ५५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पक्षश्रेष्ठींवर एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे ते पक्ष नेत्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाविषयी कार्यक्रमानंतर पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना छेडले असता, पक्ष प्रवेशाच्या केवळ चर्चा आहेत. आपले या चर्चांनी मनोरंजन होत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.