व्हीएस न्यूज - भाजपने काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांना दिलेले आश्वासन काही पूर्ण होताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना ३१ डिसेंबरपूर्वी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन वर्ष सुरु झाले तरी काहीही हालचाल होताना दिसत नसल्याने आश्वासन गाजर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळात ३१ डिसेंबर पूर्वी स्थान मिळाणार असल्याची माहिती दिली होती. पण ३१ डिसेंबरची मुदतही आता उलटून गेली आहे. त्यामुळे राणे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. राणे यांनी डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यात नागपूर येथे जाऊन यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी हा शब्द या भेटीत दिल्याचे राणे यांनी विशेष मुलाखतीत सांगितले होते. राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता होती. मात्र अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला.
भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही या पक्षाने घेतला. राणेंचा मंत्रीमंडळात समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच त्यांना दिले होते. राणेंचा मंत्रीमंडळात दिवाळीपूर्वी समावेश होईल, अशी तेव्हा चर्चा होती. पण तेव्हा राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ३१ डिसेंबरपूर्वीचा शब्द दिला होता. तो शब्दही पाळला न गेल्यानं भाजप राणेंना झुलवत ठेवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002