व्हीएस न्यूज – सोमवारी रात्री दोन तासामध्ये हरियाणाच्या पलवलमधील वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याची घटना उघड झाली असून या सहाही हत्या एकाचा पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पलवलमध्ये सध्या एकाच वेळी सहा हत्येच्या या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे.
शहर पोलीस ठाण्यापासून १०० मीटरच्या अंतरावर सगळ्या हत्या झाल्या आहेत. या सगळ्या हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे वृत्त आहे. या हत्या लोखंडी रॉडने डोक्यात घाव करून करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन तासात सहा हत्या करणाऱ्या या सायको किलरचा फोटो कैद झाला आहे. आरोपीचा शोध या फोटोच्या आधारे घेतला जातो आहे. त्या सायको किलरच्या हातात सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोखंडी रॉड स्पष्ट दिसतो आहे. सोमवारी रात्री झालेल्या या हत्याकांडानंतर शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.