सरकारच्या नव्या प्रस्तावाविरोधात ३ लाख डॉक्टर संपावर
नवी दिल्ली
2018-01-02
व्हीएस न्यूज - इंडियन मेडिकल असोसिएशनशी निगडीत देशभरातील सुमारे ३ लाख डॉक्टर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याच्या सरकारच्या नव्या प्रस्तावाविरोधात संपावर जाणार असल्यामुळे खासगी व सरकारी रूग्णालयातील ओपीडी ठप्प राहणार असल्यामुळे रूग्णांचे मोठे हाल होणार आहेत.
सरकार आज संसदेत या आयोगासाठी विधेयक आणणार असून हे विधेयक जर संमत झाले तर वैद्यकीय इतिहासातील हा काळा दिवस असेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उपचार या विधेयकामुळे महाग होतील आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल. वैद्यकीय महाविद्यालयांवर सरकारचे नियंत्रण हे विधेयक लागू झाल्यास मजबूत होईल, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येते. आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. आप्तकालीन सेवा मात्र बाधीत होणार नाही.
इंडियन मेडिकल कौन्सिलचा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७ अंतर्गत करण्यात येणाऱ्या तरतुदींना विरोध असून नव्या विधेयकानुसार आतापर्यंत खासगी वैद्यकीय महाविद्यालयात १५ टक्के जागांवरील शूल्क व्यवस्थापन ठरवत. पण आता व्यवस्थापनाला नव्या विधेयकानुसार ६० टक्के जागांचे शूल्क निश्चित करण्याचा अधिकार मिळेल.