व्हीएस न्यूज - भाजप खासदार नेपालसिंह यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैन्याच्या जवानांचा अवमान करणारे विधान केले असून सैनिक म्हटले तर त्यांचे प्राण जाणारच. जगात असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याच्या जवान मरत नाही, असे संतापजनक विधान नेपालसिंह यांनी केले आहे. आता सर्वच स्तरातून नेपालसिंह यांच्यावर टीका होत असून सैन्यातील जवानांचा अपमान करणाऱ्या नेपालसिंह यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. ५ जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. उत्तर प्रदेशमधील रामपूरचे खासदार नेपालसिंह यांना या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. पण दहशतवादाऐवजी जवानांबाबत नेपालसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, सैनिक असल्याने त्यांचा जीव जाणारच. जगात असा कोणता देश आहे की जिथे सैन्यातील जवान मरत नाही. त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन करताना थेट गल्लीतील भांडणाचा दाखला दिला. नेपालसिंह यांची वाचाळगिरी येथेच थांबली नाही. पत्रकारांनाच त्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही असे डिव्हाईस मला दाखवा की ज्यामुळे माणूस मरणार नाही. बंदुकीची गोळीही परिणाम करु शकणार नाही, अशी वस्तू दाखवा, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002