व्हीएस न्यूज - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुणे, पिंपरी चिंचवड आणि आळंदी येथे भाजपची सत्ता यावी हे स्वप्न होते. या स्वप्नांची मागील वर्षात पुर्तता झाली आहे. त्यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समिती पिंपरी चिंचवड शहर समिती यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
समितीच्या वतीने बुधवार दि.३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता, थोपटे लॉन्स रहाटणी काळेवाडी रस्ता येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंतीताई उमरगेकर, पायलट रमीला रामकीसन लटपटे यांचा सत्कार ग्रामविकास व महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास पशू संवर्धनमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार सुजितसिंह ठाकूर, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, भाजपा संघटनमंत्री सुनिल कर्जतकर, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा संघटन मंत्री रवि अनासपुरे, भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, ज्येष्ठ नेते आझमभाऊ पानसरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजाताई मोरे, पीएमआरडीचे संचालक किरणकुमार गिते, पुणे मार्केट सभापती दिलीप खैरे आदी प्रमुख पाहुणे आणि पुणे, पिंपरी चिंचवड व आळंदीतील सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समिती पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनात भगवान सेना पिंपरी चिंचवड, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठान पुणे, बीड जिल्हा मित्र मंडळ, जय भगवान युवा फांऊडेशन, ब्रम्हचैतन्य फांऊडेशन, मराठवाडा जन विकास संघ पिंपरी चिचंवड, मराठवाडा मित्रमंडळ, भगवानबाबा मित्र मंडळ, लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठा पिंपरी चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंच पिंपरी चिंचवड आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमाच्या संयोजनात सदाशिव खाडे, योगिता नागरगोजे, माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, बाबू नायर, रघुनंदन घुले, अशोक सोनवणे,अरुण पवार, सुभाष दराडे, श्रीनिवास बढे, ज्ञानेश्वर नागरगोजे, सलीम शिकलगार, आबा नागरगोजे, गणेश ढाकणे, दीपक नागरगोजे आदींचा सहभाग आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002