व्हीएस न्यूज – राष्ट्रीय दलित अधिकार मंच संयोजक जिग्नेश मेवाणी यांच्यावर होत असलेल्या आरोपातून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी त्यांचा बचाव केला आहे. पुण्यात ३१ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप मेवाणी यांच्यावर करण्यात येत आहे.
भाजप सरकारचा गेल्या साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पाहिल्यास सत्य समोर येईल. जिग्नेश उनाच्या घटनेमध्ये नव्हता, जिग्नेश रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणामध्ये देखील नव्हता, असे सांगतानाच गेल्या काही वर्षांमध्ये दलितांना गैरवागणूक दिली जात असल्याचे सिब्बल म्हणाले.
महाराष्ट्र पोलिसांनी गुजरातचे आमदार आणि दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषण दिल्याची तक्रार मिळाल्याची माहिती दिली आहे. मेवानी भीमा-कोरेगाव युद्धाचा २०० वा विजय दिवस साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका युवकाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात बऱ्याच भागात तणाव निर्माण झाला होता. अनेक दलित संघटनांकडून भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सध्याकाळी हा बंद मागे घेण्यात आला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002