व्हीएस न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु असून आम्ही संबंधितांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांचे देश आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोठे योगदान असून जेव्हा राष्ट्रीय पातळीवर समस्या निर्माण होतात पवारांचा सल्ला त्या-त्यावेळी घेतला जातो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी पवारांवर जबाबदारी सोपवली होती. या देशात दुसरी कृषीक्रांती घडवण्याचे काम माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली पवार यांनी केले, असेही ते म्हणाले.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली, तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकणा-या माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संध्याकाळी आरोपीवर उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा पद्धतीची घाणेरडी पोस्ट मी माझ्या राजकीय जीवनात पाहिलेली नाही. अशा लोकांवर कारवाई करावी, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002