व्हीएस न्यूज: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सिंधुदुर्गातील सोळाव्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात शिक्षकांना शाळाबाह्य कामातून लवकरच मुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य शिक्षकांना कामे करावी लागतात. शिक्षकांना ही कामे भविष्यात करावी लागणार नाहीत असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच राज्यातील मराठी शाळांसाठी आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डाची निर्मिती केली जाणार असून यासाठी राज्यातील शंभर शाळा पहिल्या टप्प्यात निवडण्यात आल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे ग्रामीण भागातल्या हुशार मराठी विद्यार्थ्यांनाही आंतराष्ट्रीय ज्ञान मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच तावडे म्हणाले आहेत. तावडे सिंधुदुर्गात झालेल्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात बोलत होते.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी शिक्षकांना अधिवेशनाला सिंधुदुर्गात आला असाल तर परत जाताना जवळ असलेल्या गोव्याला जरूर जा पण चुकीचे काही करु नका असा सल्ला दिला आहे. तर गोव्यात जाणाऱ्या शिक्षकांनी आपल्या ड्रायव्हरला सावध ठेवण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी वर्गात मुलांवर चांगले संस्कार करण्याची अपेक्षा असलेल्या शिक्षकांबाबत चांगले ऐकू येत नसल्याचे सांगत शिक्षकांना उपदेशाचे डोसही पाजले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002