व्हीएस न्यूज - पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध ठरणार असल्यामुळे समुद्रकिनारी बसून निवांत दारु पिण्यासाठी गोव्याचा मार्ग धरणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
या नव्या नियमाची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली असून विशेष म्हणजे हा नियम दारुच्या सेवनामुळे नाही, तर दारुच्या रिकाम्या बाटल्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे. दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच गोव्यात सार्वजनिक ठिकाणी पडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
पर्रिकरांनी ही माहिती पणजीमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटनानंतर दिली. मुख्यमंत्र्यांनी येत्या १५ दिवसात कायद्यात तरतूद करुन त्याची फेब्रुवारी महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. गोव्यात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पर्यटकांची गर्दी होते. देशाच्या विविध भागातून आणि परदेशातून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर तसेच बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडेच टाकून जात असल्याचे आढळल्यामुळे कचरा उचलून साफ सफाई करण्याचे सरकारी यंत्रणेचे काम वाढले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002