व्हीएस न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुलींच्या कपड्यांवर, नोकरीवर आणि वैवाहिक आयुष्यावर निर्बंध लादणाऱ्यांना चपराक लगावली असून सर्वोच्च न्यायालयाने सज्ञान मुलीला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मत मांडले.
सर्वोच्च न्यायालयात तिरुअनंतरपुरममधील एका महिलेने तिच्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार संबंधित महिलेची १९ वर्षांची मुलगी असून ती तिच्या वडिलांसह कुवेत येथे राहते. पण पतीने माझ्या मुलीवर दबाव टाकल्यामुळेच कुवेतला ती निघून गेल्याचा त्या महिलेने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर शुक्रवारी निर्णय दिला. महिलेची मुलगी १९ वर्षांची असून न्यायालयात तिने स्वतः सांगितले होते की तिला कुवेतला वडिलांकडे राहायचे आहे, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.
सज्ञान असलेल्या मुलगी किंवा मुलाला त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार असून या प्रकरणातील मुलगी सज्ञान असून तिला संविधानाने स्वातंत्र्य दिले असल्यामुळे आई किंवा वडिलांनी यात भावनिक कारण पुढे करुन केलेला हस्तक्षेप अमान्यच असेल, असे न्यायालयाने सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002