व्हीएस न्यूज – जो हिंसाचार भीमा कोरेगावमध्ये उसळला त्यामागे हिंदुत्त्ववादी संघटना होत्या असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी भोपाळमध्ये या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील अशी टीका केली.
भाजपविरोधात एक लाठी रॅली मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांचीही त्या लाठी रॅलीला हजेरी होती. त्यांनी हे वक्तव्य यानंतर झालेल्या भाषणात केले आहे. समाजवादीचे नेते शरद यादव यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. या मंचावरून देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे असेही आवाहन करण्यात आले.
पोलिसांनी महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच दोषींना सोडून पीडितांवर कारवाई केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर ही सगळी कारवाई होते आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाराष्ट्र सरकारला भीमा कोरेगावच्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात केली. जर ही मागणी मान्य झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील हे विसरू नका असा इशाराही त्यांनी दिला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002