व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली असून त्यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
ज्यांचा हात या प्रकरणात असेल त्यांच्यावर जरुर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना दिले आहे. पण कुणालाही अटक करण्याआधी सगळे पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.