रूफ टॉप पार्ट्याना विरोध करणाऱ्यांच्या रुफला ‘टॉप’ आहे का?
मुंबई
2018-01-06
व्हीएस न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला कमला मिल दुर्घटनेनंतर रूफ टॉप पार्ट्याना विरोध करणाऱ्यांच्या रुफला ‘टॉप’ आहे का? असा उपरोधिक टोला लगावला आहे.
शिवसेनेचा कमला मिल दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांवर करण्यात येणाऱ्या कारवाईला पाठिंबा आहे. पण बांधकामाच्या अधिकृततेची खातरजमा कारवाईपूर्वी करावी, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कमला मिल दुर्घटना होण्याआधी कमला मिल परिसरात गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव यांनी यावर भाष्य करताना मंत्रालयाला आग लागली तेव्हा मुख्यमंत्री तिथे होते त्यामुळे आगीच्या दुर्घटनेला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनाला दुर्घटनेला जबाबदार आरोपींचा शोध घेण्याकरता बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळे प्रशासनाची दुरावस्था समोर आल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच दोषी आरोपी आहेत की दहशतवादी? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.