विश्व विवेक फाऊंडेशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन
पिंपरी चिंचवड
2018-01-06
व्हीएस न्यूज - विश्व विवेक फाऊंडेशनच्या वतीने कै. अशोक नावंदर यांच्या 21 व्या स्मृती दिनानिमित्त रविवार दि. 7 जानेवारीला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नगरसेवक व विश्व विवेक फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक बाबू नायर यांनी प्रसिध्दीस दिले आहे. रविवारी सकाळी 9 वाजता निगडी प्राधिकरण सेक्टर 27 येथील संत तुकाराम उद्यान येथे खासदार अमर साबळे यांच्या हस्ते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे उद्घाटन होणार आहे. रक्तदात्यांनी या शिबीरास उपस्थित राहणाचे आवाहन नायर यांनी केले आहे.