व्हीएस न्यूज - अयोध्येला जागतिक शांतता शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी भेट दिली असून त्यांनी राम जन्मभूमी व बाबरी मशिद वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी उपाय सुचविला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेला विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जागतिक शांतता विद्यापिठाच्या ११ प्रतिनिधींनी भेट दिली. या शिष्टमंडळात नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू विजय भटकर, जागतिक शांतता विद्यापीठाचे प्रमुख विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र एंडे, माजी केंद्रीय मंत्री अरीफ मोहम्मद खान फिरोझ भक्त अहमद आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिराज कुरेशी यांचासमावेश होता. वर्षानुवर्षे सुरू असलेला हा वाद सामंजस्याने सोडवण्यावर या शिष्टमंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भर देण्यात आला.श्रीराम ह्युमॅनिटी बिल्डिंग या वादग्रस्त जागी बांधण्याचा या शिष्टमंडळाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे या ठिकाणाहून जगाला विश्व शांती व मानवतेचा संदेश मिळेल, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.