व्हीएस न्यूज - महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून ७१८० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी राज्यपाल सी. विद्यसागर राव यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या राज्यपाल परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
राष्ट्रपती भवनात झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये नवभारत २०२२ मधील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास त्याचबरोबर राज्य आणि राजभवनाच्या माध्यमांचा पुढाकारातून करण्यात आलेले उपक्रम याविषयी चर्चा करण्यात आली.
सन २०२२मध्ये नवभारताच्या विकासाचे लक्ष्य साधण्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना भारतीय राज्यघटनेच्या ७३ आणि ७४व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेले अधिकार बहाल करावे, जेणेकरून सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देणे त्यांना शक्य होईल अशी मागणी राज्यपालांनी ‘सार्वजनिक सेवेमधील आमूलाग्र बदल’ या विषयावरील परिसंवादात केली. राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठवाडा, विदर्भातील १४ जिल्ह्यमधील ११४ सिंचन प्रकल्प अपूर्ण असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठय़ा निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विशे, बाब म्हणून केंद्राने हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निदी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्यपालांनी यावेळी केली. राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्य सुविधा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतील अॅम्ब्युलन्स सेवा पुरविताना विशेष करून गरोदर मातांना बाळंतपणासाठी नेताना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
मुंबईतील राजभवनमध्ये असलेल्या बंकरमध्ये आधुनिक म्युझियम करण्यात येणार असून त्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास,संस्कृती आणि स्वातंत्र्य लढय़ामध्ये असलेला त्याचा सहभाग याविषयी माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. केंद्रीय पर्यटन विभागाने या बंकरच्या संवर्धनासाठी आणि म्युझियमच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002