व्हीएस न्यूज - सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उघडणार असून २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे ३६ वर्षीय धोनी उद्घाटन करणार आहे. त्याची परदेशात ही दुसरी अकादमी असेल. धोनी याबाबत बोलताना म्हणाला, खेळ हा कोणत्याही मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असून तुम्हाला फिट राहण्याशिवाय जीवनात नेतृत्व तसेच अन्य पैलू शिकायचे असतील तर खेळ हे चांगले माध्यम आहे. मैदानावरचे खेळ प्रत्येक मुलाला खेळलेच पाहिजेत. धोनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिली ग्लोबल क्रिकेट अकादमी अल कोज दुबईमध्ये सुरु केली होती. यासाठी त्याने पॅसिफिक स्पोर्ट्स क्लब आणि आरका स्पोर्ट्स क्लबसोबत भागीदारी केली होती.
धोनी स्वत: सिंगापूर क्रिकेट अकादमीसाठी करीकुलम डिझाईन करणार आहे. त्याच्यासोबत सिंगापूर राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार जीके दिव्या असणार आहे. सर्व वयोगटातील मुलांना अनुभवी प्रशिक्षकांसह ईस्ट कोस्ट रोडवरील सेंट पॅट्रिक स्कूलस्थित ही अकादमी प्रशिक्षण देणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत २०० मुलांनी आपली नावे नोंदवली आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002