व्हीएस न्यूज - दुबईत नोकरी करणारा हरिकृष्णन व्ही. नायर हा भारतीय ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीस जिंकल्याने एका रात्रीत कोट्यधीश झाला. बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम नायर यांना मिळाली.
रविवारी या लॉटरीची सोडत आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काढण्यात आली. डिसेंबरमध्ये ‘दि बिग टिकेट ड्रीम १२’ या मालिकेतील या लॉटरीच्या तिकिटांची विक्री केली गेली होती. ऑनलाइन किंवा विमानतळांवर या लॉटरीची तिकिटे खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांना मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले.