व्हीएस न्यूज - काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या असून या निवडणुकी विरोधात अतिरेक्यांनी फतवा काढला आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरने हा फतवा काढला असून निवडणूक लढविणाऱ्या डोळ्यात अॅसिड फेकरण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हत्या केल्याचा दावाही या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
कश्मीरमधील लोकशाहीला आव्हान देण्यासाठी अतिरेक्यांनी वारंवार अशा प्रकारचे धमक्या दिलेल्या आहेत. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची अद्याप पडताळण्यात करण्यात आलेली नाही. लोकांना धडा शिकवण्यासाठी यापूर्वी निवडणुकीत हत्या केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. या क्लीपमध्ये म्हटले आहे की, २०१६ मध्ये तुम्ही पाहिले आहे की पॅलेट गनमुळे किती युवकांना आपले डोळे गमवावे लागले. या वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की, जे लोक काश्मीर पंचायत समितीच्या निवडणुका लढवतील त्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकण्यात येईल.
हिज्बुलचा कमांडर रियाज नाइकोच्या नावाने ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मागील २८ वर्षांपासून आम्ही निवडणूक लढवणा-यांना धमकी देत आलो आहोत. परंतु, त्याचा परिणाम दिसून आला नाही. मागील निवडणुकीत तुम्ही पाहिले आहे की, किती जणांची हत्या झाली. काहींना भारतीय सुरक्षा संस्थांनी तर काहींना आम्ही मारले आहे. त्यामुळे निवडणुका लढविताना पूर्ण विचार करा, अशी धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी २०११ मध्ये धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही पंचायत निवडणुकीत सुमारे ८० टक्के मतदान झाले होते. दक्षिण काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी पाणि यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी ऑडिओ क्लिपबाबत ऐकले आहे. पण अजून ती पाहिलेली नाही. सध्या यावर मी कोणतीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002