व्हीएस न्यूज – अखेर २५ जानेवारी रोजी बऱ्याच वादांचा सामना केलेला संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पद्मावत ( अगोदरचे शिर्षक पद्मावती) प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वायकॉम एटिनच्या प्रवक्त्याने जाहीर केली.
हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी राजपूत करणी सेनेसह अनेक संघटनांनी लावून धरली. त्यानंतर सेन्सॉरनेही आपली नाराजी निर्मात्यावर दाखवली होती. अखेर प्रदर्शन लांबणीवर पडले होते. पद्मावती हा चित्रपट पद्मावत नावाने २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे वायकॉम एटिनच्या प्रवक्त्याने सांगितले. दुसरीकडे संजय लीला भंसाली दिग्दर्शित ‘पद्मावत’ची रिलीज डेट घोषित होताच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी, हा चित्रपट राजस्थानात प्रदर्शित होणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता राजस्थानातील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. यावर वसुंधरा राजे यांनी राज्यातील जनतेच्या भावनेचा विचार करत हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
राजे एका सरकारी जाहिरातीत यांनी, महाराणी पद्मिनीचे बलिदान हे राज्याच्या मान-सन्मानाबरोबर आणि गौरवासोबत जोडले गेले आहे. त्यामुळे राणी पद्मिनी आमच्यासाठी केवळ इतिहासाचा एक आध्याय नाही, तर आमचा स्वाभिमान आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना निर्देशही दिले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002