व्हीएस न्यूज – दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार कमी पट असलेल्या रायगड जिल्ह्यातील ४२ शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. एकूण १०३ शाळा बंद करण्यात येणार असून उर्वरित शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच याही शाळा बंद करण्यात येणार आहेत.
कमी गुणवत्तेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ठेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान शालेय शिक्षण विभागाला करायचे नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळा बंद करण्यात येत नसून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जवळच्याच शाळेत समायोजन करण्यात येत आहे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्यातील काही शाळा ह्या वाडीवस्तीवर आहेत. तर काही शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत, जेथे विद्यार्थी संख्या शून्य असली तरी शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील राजिपच्या व खासगी अशा १०३ शाळा या ० ते १० पटसंख्येच्या आहेत. या शाळेतील ७१२ विद्यार्थ्यांचे १९२ शिक्षकांना जवळच्या शाळेत समायोजित करण्यात येणार आहे. रायगडातील १०३ शाळांचे समायोजन होणार आहे. काही ठिकाणी शाळा व्यवस्थापन समित्यांनी विरोध केल्यामुळे या शाळा बंद करण्यात आलेल्या नाहीत, असे असले तरी या समित्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्या बंद केल्या जातील, असे संकेत शिक्षण विभागाकडून मिळत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002