व्हीएस न्यूज – आधारच्या विश्वासार्हतेवर नागरिकांच्या आधारचा डेटा सुरक्षित नसल्याचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे डेटा सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने सरकारकडून पाऊले उचलली जात आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) त्याअंतर्गत १२ अंकी आकड्यांच्या जागी ‘व्हर्च्युअल आयडी’ नावाने नवीन संकल्पना समोर आणली आहे.
आधारकार्ड धारक व्हर्च्युअल आयडी संकल्पनेद्वारे यूआयडीएआयच्या संकेतस्थळावरून आपली व्हर्च्युअल आयडी जनरेट करू शकतात. १२ आकडी बायोमॅट्रिक आयडी शेअरिंग न करता आधार कार्डधारक सिमकार्ड लिंक करण्यासोबतच अन्य कारणांसाठी या आयडीचा वापर करू शकतात. शिवाय या ‘व्हर्च्युअल आयडी’मुळे गोपनीयता राहणार आहे. आधार कार्ड धारकांना या नव्या संकल्पनेमुळे आधार क्रमांक शेअर न करता लिंक करण्याचा आणखी एक पर्याय मिळाला आहे, असा दावा यूआयडीएआयने केला आहे.
ढोबळ १६ आकडी क्रमांक ‘व्हर्च्युअल आयडी’चे असणार आहेत. आधार कार्ड धारकांना सत्य पडताळणीसाठी प्रमाणित करण्यात आलेल्या कंपनीला (उदा. मोबाईल) बायोमेट्रीक्स, नाव, पत्ता, छायाचित्रे द्यावे लागेल. एक यूजर कितीही ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करू शकतो. एक रद्द करून दुसरीही आयडी तयार करू शकतो, असे यूआयडीआयने सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002