व्हीएस न्यूज – सेन्सॉर बोर्डाने संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त पद्मावत चित्रपटाला मंजुरी दिली असेल तर चित्रपट गोव्यातील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यास सरकारला काहीही अडचण नसल्याची भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घेतली आहे. पद्मावतला भाजपची सत्ता असलेल्या राज्यात विरोध होत असताना पर्रिकराच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सेन्सॉर बोर्डाने प्रामाणित केले असेल तर आमचा काही विरोध नाही आणि त्यात हस्तक्षेपही करण्याचा प्रश्न नाही. पण राज्यात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यावर नक्कीच विचार केला जाईल, असा इशाराही पर्रिकरांनी दिला आहे. पण अद्याप चित्रपटाबाबतच्या प्रदर्शनाच्या सूचना मिळालेल्या नसल्याचेही ते म्हणाले. पर्रिकर म्हणाले, गोव्यातील पोलिसांनी पर्यटन काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. कारण चित्रपट प्रदर्शित या काळात झाला तर पोलिसांवर ताण पडेल. पोलीस कर्मचारी यावेळी पर्यटन स्थळांवर कर्तव्यास असणार आहेत. पर्यटकांची गर्दी संपल्यानंतर पोलिसांवर ताण पडणार नाही, असेही पर्रिकर यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002