देशवासीयांना राष्ट्रपती कोविंद यांच्या लोहरीच्या शुभेच्छा
नवी दिल्ली
2018-01-13
व्हीएस न्यूज – देशवासीयांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोहरी सणाच्या शुभेच्छा दिल्या असून त्यांनी लोहरी सणामुळे प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धता आणि निरोगी आयुष्य लाभो अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
पंजाब राज्यात लोहरी सण पारंपरिक स्वरुपात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवाचे शिख आणि हिंदू धर्मीयांमध्ये मोठे स्थान आहे. शेकोट्या पेटवून त्याभोवती फेर धरला जातो. तसेच लोकनृत्यांचे सादरीकरण केले जाते. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले जाते.