बॅटमिंटनपटू सिंधुने ‘केबीसी’त जिंकलेले २५ लाख केले दान
हैदराबाद
2018-01-13
व्हीएस न्यूज –
बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधु हिने ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमातून जिंकलेले बक्षीसाचे २५ लाख रुपये एका कर्करोग रुग्णालयाला दान केले आहेत. कर्करोग पीडित रुग्णांना ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या आणि पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जून पुरस्काराने सन्मानित असलेल्या सिंधुची देणगी जीवदान ठरू शकते. ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये तिने यंदा २५ लाख रुपये जिंकले होते.
तेलुगु अभिनेता तथा बस्वतरकम इंडो अमेरिका कर्करोग रुग्णालय आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष एन. बालाकृष्णन याच्याकडे सिंधुने २५ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. ज्येष्ठ कलाकार तथा तेलुगु देसम पक्षाचे संस्थापक एन.टी. रामाराव यांचा एन. बालाकृष्णन हा मुलगा आहे. बालाकृष्णनने सिंधुच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. सिंधुचा निर्णय कर्करोग विरोधात लढण्यासाठी इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, असेही त्याने म्हटले.